28 January 2025 9:40 AM
अँप डाउनलोड

विक्रीकर निरीक्षक पूर्व परीक्षा (२२ डिसेंबर २०१३)

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 100 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
इंग्रजांनी भारतात त्यांचे शासन असताना कशाच्या लागवडीस प्रोत्साहन दिले नाही ?
प्रश्न
2
खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ? अ) विधानसभेत सामान्यतः पहिला तास प्रश्नोत्तरांचा असतो. ब) विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात कोणत्याही कामकाजाच्या दिवशी कोणत्याही खात्यात प्रश्न विचारले जातात.
प्रश्न
3
लांबदुरीची बैलेस्टिक मिसाइल पृथ्वीच्या वायूमंडळात प्रवेश करणारी टेक्नोलॉजी विकसित करण्यासाठी उल्लेखनीय योगदान करणारे वैज्ञानिक डॉ. वी.जी. शेखरन यांना कोणता पुरस्कार प्राप्त झाला आहे ?
प्रश्न
4
पुढील कोणत्या सामाजिक-धार्मिक चळवळी मुंबईत स्थापन झाल्या नाहीत ?
प्रश्न
5
खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?
प्रश्न
6
जादूटोणा प्रतिबंधक अध्यादेश महाराष्ट्रात केव्हा लागू करण्यात आला ?
प्रश्न
7
खालीलपैकी कोणती वाक्ये अर्टशियन विहिरी संदर्भात सत्य आहेत ?
प्रश्न
8
नागरीकरणाच्या प्रक्रियेत मानवी वसाहतीचा विकासानुसार क्रम सांगा : अ) महानगर                    ब)नगर क)शहर                        ड)सत्रनगर
प्रश्न
9
खालील विधाने पहा : अ) ११ फेब्रुवारी हा दिवस जागतिक मातृभाषा दिन म्हणून साजरा केला जातो. ब) भारतात अधिकृत मान्यताप्राप्त भाषांची संख्या २२ आहे. वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहेत ?
प्रश्न
10
राष्ट्रीय वस्तू उत्पादन धोरणासंदर्भात खालील विधाने विचारात घ्या. अ)या धोरणाची अमलबजावणी २०११ मध्ये झाली. ब)या धोरणाप्रमाणे स्थूल देशांर्गात उत्पादित वस्तू उत्पादनाचा हिस्सा ६० % पर्यत वाढवायचा आहे. क)या धोरणाचे उद्यिष्ट राष्ट्रीय गुंतवणूक आणि वस्तू उत्पादन क्षेत्र निर्माण करणे आहे. वरील कोणते/ती विधाने /ने बरोबर आहेत ?
प्रश्न
11
तारापूर अणुउर्जा प्रकल्पासंबंधी कोणती विधाने बरोबर आहेत ? अ) भारतामधील पहिला अणुउर्जा प्रकल्प. ब) आशियामधील सर्वात मोठा अणुउर्जा प्रकल्प. क) अमेरिकन तंत्रावर आधारित भारतातील पहिला अणुउर्जा प्रकल्प. ड) फ्रान्सच्या सहाय्याने अणुउर्जा प्रकल्पाची सुरुवात.
प्रश्न
12
ब्रिटीशानी वासुदेव बळवंत फडके यांना कोणत्या कारागृहात ठेवले होते ?
प्रश्न
13
खालीलपैकी खगोलशास्त्रीय वस्तूंचा त्यांच्या आकारमानाप्रमाणे योग्य चढता क्रम कोणता ?
प्रश्न
14
तरुण तेजपाल इतक्यात बातम्यात होते. त्यांच्याबाबत खालील कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/त ? अ) तरुण तेजपाल हे तेहेलका या प्रत्येक महिन्याला निघणाऱ्या मासिकाचे मुख्य संपादक होते. ब) तेहेलकाची मालकी अनंत मिडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडे आहे.
प्रश्न
15
खालील चित्र पहा आणि जोडपे कोणत्या आदिवासी जमातीचे आहे ते सांगा.Question title
प्रश्न
16
नकाराधिकार (राईट टू रिजेक्ट) म्हणजे : अ) मतदारांना सर्व उमेदवार नाकारण्याचा संपूर्ण हक्क ब) त्यामुळे निवडणूक प्रक्रियेत सर्वांगीन बदल व सुधारणा होईल आणि राजकीय पक्षांना स्वच्छ प्रतिमेच्या उमेदवारांना उभे करणे भाग पडेल. क) मतदानाचा कायदेशीर अधिकार आहे तर नकाराधिकार मुलभूत अधिकार आहे (सर्वोच्च न्यायालयाच्या मतानुसार) ड) त्यामुळे निवडणुकीत शुद्धता, पारदर्शकता व जिवंतपणा वाढेल. वरील पैकी कोणते विधान असत्य आहे ?
प्रश्न
17
………..ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी असून पित्तरस स्त्रवते.
प्रश्न
18
‘श्रीपाद शेषाद्री प्रकरण’ ज्या समाजसुधारकांशी संबंधित होते. त्याचे नाव ओळखा.
प्रश्न
19
कोणत्या उद्योगात कार्बन ब्लॅक प्रमुख कच्चा माल म्हणून वापरले जाते ?
प्रश्न
20
‘: :’ या चिन्हाच्या डावीकडील पदांमध्ये विशिष्ट संबंध आहे. तोच संबंध या चिन्हाच्या उजवीकडील पदांमध्येही आहे ‘: :’ या चिन्हाच्या डावीकडील एक पद गाळलेले आहे. ते दिलेल्या पर्यायांमधून शोधा.APOC :?:: ITSK : MVUN
प्रश्न
21
खालीलपैकी कोणत्या समितीने प्राधान्य क्षेत्रासाठीचा कर्जपुरवठा ४० टक्क्यावरून १० टक्क्यावर कमी करण्याची शिफारस केली ?
प्रश्न
22
खाली दिलेल्या अक्षांस आणि दिवसांचा कालावधी यांच्या जोड्या लावा. अक्षांस                         दिवसांचा कालावधी अ) 0°                           I. २० तास ब) 41°                         II.२४ तास क)63°                         III.१५ तास ड)                   IV.१२ तासQuestion title
प्रश्न
23
खालील दिलेल्या पर्यायातून भारतातील संरचनात्मक बेरोजगारीची करणे शोधा. अ)कामरहित वृद्धी ब)श्रमशक्ती वर्गात वाढ क)अनुसूचित तंत्रज्ञान ड)अनुसूचित शिक्षण प्रणाली
प्रश्न
24
हिंदुस्थान सरकारच्या १९३५ च्या कायद्याची पार्श्वभूमी कोणत्या घटनांनी तयार केली ? अ) मूडीमन समिती आणि तिचा अहवाल ब) सायमन कमिशन क) नेहरू रिपोर्ट ड) बरिस्टर जीन्नांचे १४ मुद्दे वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
प्रश्न
25
अयोग्य जोडी निवडा.
प्रश्न
26
खालखालील पदावलीची किंमत काढा ?Question title
प्रश्न
27
एकूण स्थूल देशान्तर्गत (घरेलू) उत्पादनात शेती क्षेत्रात सहभाग, १९००-२००० किंमतीवर, टक्केवारीच्या स्वरुपात १९५० -५१ च्या ५६.५ पासून २०१२ -२०१३ च्या १३.६ पर्यंत घसरला आहे. यात शेतीच्या व्याख्येत काय सम्मिलित आहे ?
प्रश्न
28
खालील संख्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती ?Question title
प्रश्न
29
सार्वजनिक सभागृहात किंवा प्रेक्षागृहात ध्वनी विषयक दर्जा हा निकृष्ट ठरण्याचे कारण …..असते.
प्रश्न
30
१९०६ च्या भारतीय राष्ट्रीय सभेच्या कोलकाता अधिवेशनात अध्यक्ष पदावरून बोलताना दादाभाई नौरोजी यांनी ‘स्वराज्य’ शब्द उघडपणे वापरला आणि या अधिवेशनात. अ) राष्ट्रगीत म्हणून ‘वन्दे मातरम्’ प्रथमच गायले गेले. ब) संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव पारित करण्यात आला. क) मवाळ मार्गाचा स्वीकार करण्यात आला. ड) बरिस्टर जिन्ना भारतीय राष्ट्रीय सभेच्या कार्यात सहभागी झाले. वरीलपैकी कोणती विधाने चुकीचा आहेत ?
प्रश्न
31
महाराष्ट्र शासनाची ‘मनोधैर्य’ योजना विचारात घ्या. अ) सदर योजना सर्व महिला व बालकांसाठी आहे . ब) सदर योजना बलात्कार व असिड हल्ल्यात बली पडलेल्या महिलांच्या पूनर्वसनासाठी आहे. क) किमान Rs. ५०,००० ते २ लाख व कमाल ३ लाख रुपये अर्थसहाय्य. ड) या योजनेची अंमलबजावणी १५ ऑगस्ट २०१२ पासून करण्यात आली. वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
प्रश्न
32
खालील दोन विधानांपैकी कोणते बरोबर आहे ? अ) डॉ.पी.सी. अलेक्झांडर महाराष्ट्राचे आतापावेतोचे सर्वात अधिक काळ राज्यपाल होते : सुमारे १० वर्षे. ब) श्री शरदचंद्र पवार महाराष्ट्राचे आतापावेतो सर्वात अधिक काळ मुख्यमंत्री राहिले. त्यांचाही कालावधी सुमारे १० वर्ष होता.
प्रश्न
33
तेराव्या वित्त आयोगाने दिनांक ३० डिसेंबर २००९ रोजी सादर केलेल्या अहवालाबाबत काय खरे आहे ? अ)तेराव्या वित्त आयोगाने सध्याची केंद्र व राज्यांमधील कराची विभागणी करणारी वैधानिक पद्धत न्याय्य मानली आहे: बरेच सरळ कर केंद्राने लादणे व संकलन करणे नंतर ते राज्यांबरोबर वाटने. ब)गरीब राज्यांना अन्न, खते व पेट्रोलियम या तीन मुख्य सबसिडीज (उपदाने) मुले फायदा होतो कारण त्यांना त्यातून पुरेसा आधार/ भाग मिळतो आणि म्हणून आहे तर या त्या चालू रहावयास हव्यात.
प्रश्न
34
एका माध्यमाकडून दुसऱ्या माध्यमाकडे प्रकाशाचे वक्र किरण जात असताना, त्याला ………..म्हणून ओळखले जाते.
प्रश्न
35
सन १९५६ च्या औद्योगिक धोरणाने पूर्ण विचारांती व जोमाने चालू झालेली ओद्योगिकरणाची प्रक्रिया पंचवार्षिक योजनेत तितक्यात जोशात राबविली गेली. जीत विविध उद्योगांची क्षमता वाढविण्यावर भरीव खर्च केला गेला. त्यामुळेच मागील ५० वर्षात. अ) औद्योगिक उत्पादन ५ गुणे वाढली. ब) भारत जगातील पाचवे सर्वात अधिक औद्योगिक राष्ट्र झाले. आता सांगा की :
प्रश्न
36
समुद्राची खोली मोजण्यासाठी ………..वापरतात.
प्रश्न
37
रघुराम राजन पनेलने प्रस्तावित केलेल्या घटकराज्यांच्या वर्गीकरणाप्रमाणे खालीलपैकी कोणती जोडी बरोबर आहे ? राज्य      वर्ग
प्रश्न
38
प्रत्येकाच्या बाहेर चार संख्या असलेली तीन वर्तुळे आहेत. पहिल्या दोन वर्तुळात विशिष्ट नियमानुसार संख्या भरलेल्या आहेत. तिसऱ्या वर्तुळात प्रश्नार्थक (?) चिन्ह आहे. दिलेल्या पर्यायांपैकी संख्या प्रश्नचिन्हाच्या (?) जागी तंतोतंत बसते. ते शोधा.Question title
प्रश्न
39
खालीलपैकी कोणत्या धातूके मध्ये तांबे व लोखंड आहेत ?
प्रश्न
40
जुलै २०१३ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने गुन्हेगार लोकप्रतिनिधीचे (खासदार-आमदार) सदस्यत्व निकाल लागलेल्या दिवशी रद्द करण्याबाबतचा निर्णय दिला. त्यानुसार………..पेक्षा जास्त शिक्षा झालेल्या लोकप्रतिनिधीना हा निर्णय लागू होणार आहे.
प्रश्न
41
योग्य कथन/ कथने ओळखा. अ) डॉ.आंबेडकर यांनी संवीधानाच्या भाग 3 चा उल्लेख ‘सर्वात टिकात्मक भाग’ असा केला आहे. ब) तामिळनाडूमध्ये एकूण आरक्षण कोटा ६९% आहे.
प्रश्न
42
प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या कोणती ?५, २५, ६१, ११३, ?
प्रश्न
43
ग्रामसेवकाच्या संदर्भातील योग्य विधान निवडा. अ) ते ग्रामपंचायतिचे दैनदिन काम पार पडतात. ब) त्यांची नेमणूक राज्य शासनाकडून होते. क) ते ग्रामपंचायतीची महत्वाची कागदपत्र व हिशेब सांभाळतात. ड) ते पंचायत समितीच्या सभांच्या नोंदी ठेवतात.
प्रश्न
44
४ ने पूर्ण भाग जाणाऱ्या तीन-अंकी संख्या किती आहेत ?
प्रश्न
45
‘द गुड रोड’ बाबतच्या खालील विधानाचा विचार करा : अ) हे चित्रपटाचे नाव आहे.\ ब) ग्यान कोरिया यांनी तो दिग्दर्शक केला आहे. क) चित्रपटाने यावर्षीचा सर्वोत्कृष्ट फिचर फिल्म म्हणून राष्ट्रीय अवार्ड मिळवला आहे. ड) हा दुसरा गुजराती चित्रपट आहे कि ज्याचे पुढील वर्षाच्या ऑस्कर पारितोषिकासाठी सर्वोत्तम परदेशीय चित्रपट विभागासाठी अधिकृत नामांकन केले जात आहे. वरीलपैकी कोणते विधान /विधाने बरोबर आहेत ?
प्रश्न
46
खालीलपैकी कोणत्या सुधारणांवर महाराष्ट्रात इ.स. १८४९ मध्ये स्थापन झालेल्या ‘परमहंस मंडळी’ चा भर होता ? अ) जातीबंधने तोडणे          ब) विधवा पुनर्विवाह क) स्त्री शिक्षण            ड) मूर्तीपूजा बंदी
प्रश्न
47
खालील समीकरण बरोबर येण्यासाठी कोणती दोन गणितीय चिन्हे आपापसात बदलणे आवश्यक आहे ?12 ÷ 2 – 6 x 3 + 8 = 16
प्रश्न
48
पुढील भूआकारांचा नीट विचार करा. अ)पाणपोया                        ब)हम्मादा क)भूछत्र खडक                          ड)यारदाग वरीलपैकी कोणते भूआकार वाऱ्याच्या क्षरण कार्यामुळे तयार झालेले आहेत ?
प्रश्न
49
प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ?Question title
प्रश्न
50
जगातील सर्वात वेगवान सुपर काम्प्युटर ‘Tianhe -2’ हा ………….या देशाने बनविला आहे.
प्रश्न
51
ह्दयविकाराच्या झटका येऊ नये म्हणून …………….हे औषध वापरतात.
प्रश्न
52
अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाचे अवमूल्यन थांबवण्यासाठी ‘स्वयंदुरस्ती रचनात्मक’ उपाय असे : अ) संगणक आज्ञावली, यंत्रसामग्री आणि मोटारींची निर्यात वाढ.
प्रश्न
53
ड्रमलीन काय आहेत ?
प्रश्न
54
डांबराच्या गोळ्यांचा आकार काही दिवसांनी कमी होतो, कारण त्याचे
प्रश्न
55
खालीलपैकी कोणत्या केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रात उपक्रमांना, जागतिक दिग्गज म्हणून त्यांचे कार्य विस्तृत करण्यासाठी, भारत सरकारने महारत्न दर्जा दिला आहे ?
प्रश्न
56
विधान (अ) : भारताच्या राज्यघटनेत ‘अल्पसंख्य’ शब्दाची व्याख्या नाही. कारण (ब) : अल्पसंख्याक आयोग ही बिगर घटनात्मक संस्था आहे.
प्रश्न
57
कृत्रिम पाय असूनही माउंट एवरेस्ट वर विजय प्रास्त करणारी जगाची पहिली महिला पर्वतारोहक अरुणिमा सिन्हाला तिच्या या कार्यात कोणत्या संस्थेने सहकार्य केले ?
प्रश्न
58
रेडी बंदर हे ………….च्या निर्यातीसाठी प्रसिद्ध आहे.
प्रश्न
59
स्टेनलेस स्टील हे कशाचे संमिश्र आहे ?
प्रश्न
60
गॅबियन तापाचे प्रमुख लक्षण खालीलपैकी कोणते ?
प्रश्न
61
सर अलन ह्यूम यांनी अखिल भारतीय राष्ट्रीय संघटना स्थापन करण्यासाठी प्रयत्न का केले ? अ) ते विचाराने उदारमतवादी होते. ब) त्यांना भारतीय लोकांबद्दल तळमळ होती. क) त्यांना भारतीय लोकांना सन्मानाने वागवावे, असे वाटत होते. ड) त्यांना भारतीयांना प्रशासनात सहभाग द्यावा, असे वाटत होते. वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
प्रश्न
62
एका  अक्षर मालिकेची विविध पदे दिलेली आहेत. त्यापैकी प्रश्नार्थक चिन्हाने (?) दर्शविलेले पद गाळलेले आहे. ते गाळलेले पद, दिलेल्या पर्यायांमधून शोधा. ak, eo, is, (?), qa, ue
प्रश्न
63
डॉ. नरेंद्र दाभोळकरांनी कोणता ग्रंथ लिहिला नाही ?
प्रश्न
64
भारताला स्वातंत्र्य देण्याबद्दल ब्रिटीशांच्या धोरणात बदल झाला कारण अ) ब्रिटनमध्ये झालेले सत्तांतर ब) भारतात राष्ट्वादास आलेले उधाण क) द्वितीय जागतिक महायुद्धाचा परिणाम
प्रश्न
65
खालीलपैकी कोणती संकल्पना राष्ट्रीय नमुना पाहणी व्दारा रचली गेली आणि मान्यताप्राप्त ठरली आणि नियोजन आयोगाव्दारे बेकारीच्या प्रश्नातील विविधता पडताळण्यासाठी स्वीकारली गेली ? अ)सर्वसाधारण बेकारीची स्थिती ब)वर्तमान दैनिक बेकारीची स्थिती क)वर्तमान साप्ताहिक बेकारीची स्थिती ड)सर्वसाधारण मासिक बेकारीची स्थिती
प्रश्न
66
तरुण सागर यांच्या बाबतच्या खालील विधानांचा विचार करा : अ) तरुण सागर हे बुद्ध मुनी आहेत . ब) त्यांनी ‘कडवे प्रवचन’ नावाचे पुस्तक लिहिले. क) हे पुस्तक जगात सर्वात मोठे असून त्याचे आकारमान ३०’ x २४’ असून वजन २००० किलोग्राम आहे. ड) त्याची नोंद ‘लिम्का बुक’ मध्ये केली आहे. वरीलपैकी कोणते विधान/विधाने चुकीचे आहे ?
प्रश्न
67
‘गरिबी हटाओ’ घोषणेने कोणती पंचवार्षिक योजना सुरु करण्यात आली ?
प्रश्न
68
ग्रामीण मजदूरांकरिताच्या राष्ट्रीय कमिशन प्रमाणे : अ) नवीन धोरणांमुळे मोठ्या शेतकऱ्यांचा फायदा झाला आहे, लहान शेतकरी मागे पडले कारण त्यांच्याकडे अवक्श्यक साधनसंपत्ती, ज्ञान नाही व आपत्तीला तोंड देण्याची क्षमता नाही. ब)ग्रामीण गरिबांना शेतीमध्ये मालक शेतकरी म्हणून सामावून घेतले पाहिजे.
प्रश्न
69
एकापेक्षा अधिक वेगवेगळ्या कालावधीकरिता कोण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले नाहीत ?
प्रश्न
70
भारतातील कोणकोणत्या राज्यावरून कर्कवृत्त जाते ?
प्रश्न
71
पुढील दोन विधानांचा विचार करा : अ)जगातील सर्व देशांमध्ये भारतात सर्वात अधिक क्षेत्र सिंचनाखाली आहे. ब)भारतातील सिंचन क्षमता योजनापूर्व म्हणजे १९५०-५१ च्या २३ दशलक्ष हेक्टरपासून १९९६-९७ च्या ८९ दशलक्ष हेक्टर पावेतो वाढली आहे. आता सांगा कि.
प्रश्न
72
घरातील वीज परिपथ जोडणी ही समांतर जोडणी असते कारण.
प्रश्न
73
मंचावर A,B,C व D या चार राजकीय पक्षांच्या प्रवक्त्यांना बसविण्याची जबाबदारी श्री गर्ग यांच्यावर आहे. या प्रवक्त्याबरोबर एक समन्वयक ही आहे. समन्वयकासह प्रवक्त्यांची नावे जेरे, हमीद, खेमू, थापा व पटेल अशी आहेत. समन्वयकाने मधल्या म्हणजे तिसऱ्या आसनावरच बसायला हवे. C पक्षाच्या प्रवक्त्याला D या पक्षाच्या प्रवक्त्याचा शेजारी बसायचे नाही. पटेल हे A या पक्षाचे प्रतिनिधित्व करतात. B व C या पक्षांचे प्रवक्ते समन्वयकांच्या दोन्ही बाजूंना बसतील. हमीद हे समन्वयक नाहीत व ते खेमू आणि थापा यांच्यामध्ये बसतील. समन्वयक खेमू किंवा पटेल यांच्या शेजारी बसणारा नाहीत. जेरे हे C या पक्षाचे प्रवक्ते आहेत व ते चौथ्या आसनावर बसतील. कोण समन्वयक आहे ?
प्रश्न
74
२०११-१२ मध्ये भारताच्या रुपयाप्रमाणे खालीलपैकी कोणत्या विकसनशील अर्थव्यवस्थांच्या चलनाचे अवमूल्यन झाले ?
प्रश्न
75
Question title
प्रश्न
76
योग्य कथन/कथने ओळखा. अ) पृथ्थकरणीयतेचा सिद्धांत निर्धारित करतो की, एखादा संपूर्ण कायदा अथवा त्याचा काही भाग संविधानाच्या विरुध्द आहे. ब) विकसनशील निर्वचनाचा सिद्धांत हा संविधानाचे निर्वचन करताना सतत परिवर्तनशील सामाजिक विधिविषयक संदर्भ ध्यानात ठेवतो.
प्रश्न
77
मानवी शरीरातील जवळजवळ …………..किलोमीटर लांबीच्या रक्तवाहिन्या असतात.
प्रश्न
78
भारतीय राष्ट्रीय कांग्रेसच्या उदयास कोणत्या बाबी कारणीभूत ठरल्या ? अ) पाश्चात्य शिक्षणाचा प्रभाव व राष्ट्रीय भावनेचा उदय. ब) भारतीय नागरी सेवा परीक्षेसाठी वयोमर्यादा २१ वरून १९ वर्षे पर्यंत खाली आणणे. क) लॉर्ड लिटनच्या लोकप्रिय बाबी.
प्रश्न
79
एका सांकेतिक भाषेत KOLHAPUR हा शब्द PLOSZKFI असा लिहितात तर त्याच सांकेतिक भाषेत TASGAON हा शब्द कसा लिहिला जाईल ?
प्रश्न
80
खालील दोन स्पर्धापैकी कोणती भारतीय उदयोन्मुख बॅडमिंटन खेळाडू पी.व्ही.सिंधू हिने सन २०१३ मध्ये जिंकली ?अ)मकाऊ खुली ग्रड प्रिक्स गोल्ड . ब)मलेशिया खुली स्पर्धा.
प्रश्न
81
पर्वतीय वाऱ्याना चिनूक वारे असे कोणत्या विभागात म्हणतात ?
प्रश्न
82
………………….वस्तूचे वजन सर्वात जास्त असते.
प्रश्न
83
……….% सौरशक्ती पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत पोहोचत नाही.
प्रश्न
84
भू-संपादन विधीनियम २०१३ बाबत खालील विधाने विचारात घ्या. अ) खाजगी प्रकल्पासाठी भू-संपादन ८०% जमीन मालकांची संमती आवश्यक. ब) सार्वजनिक प्रकल्पासाठी भू-संपादन ७०% जमीन मालकांची संमती आवश्यक. क) शहरीकरणासाठी भू-संपादन केल्यास २०% विकसित जमीन मूळ जमीन मालकास राखून ठेवणे विकासकावर बंधनकारक. वरील कोणते विधान चुकीचे आहे ?
प्रश्न
85
मुंबई महानगरपालिका क्षेत्रात जकाती ऐवजी स्थानिक संस्था कर (LBT) लागू होण्याची तारीख.
प्रश्न
86
खालीलपैकी कोणती भाषा भारताची अधिकृत भाषा नाही ?
प्रश्न
87
जोड्या लावा : पर्यटन स्थळ                         प्रसिद्ध ठिकाण अ)लोणावळा                        I.गाविलगड किल्ला ब)पन्हाळा                           II.लिंगमळा धबधबा क)चिखलदरा                        III.तुंगार्ली सरोवर ड)महाबळेश्वर                       IV.तबल उद्यान
प्रश्न
88
योग्य जोडी निवडा. समिती         शिफारस अ)तेंडूलकर समिती          -ग्रामीण दारिद्र्य -रेषेची फेरनिश्चिती ब)नरसिंहम समिती           -बँकिंग क्षेत्रातील सुधारणा क)चक्रवर्ती समिती           -कर सुधारणा ड)चेलय्या समिती           -वित्तीय क्षेत्रातील सुधारणा
प्रश्न
89
अस्पृश्यता ‘लष्करात व पोलिसात’ नोकऱ्या मिळाव्यात म्हणून सासवडच्या सभेत कोणी मागणी केली ? अ) शिवराम जानबा कांबळे ब) डॉ.बाबासाहेब आंबेडकर क) अड बी.सी.कांबळे ड) गोपाळबुवा वलंगकर
प्रश्न
90
विंचू हा …………प्राणी आहे.
प्रश्न
91
सन २०१२-१३ या वर्षासाठी भारतातील थेट विदेशी गुंतवणुकीतील हिश्यानुसार पुढील देशांची घटत्या क्रमाने मांडणी करा. अ)जपान                         ब)सिंगापूर क)नेदरलँड्स                      ड)मॉरीशअस
प्रश्न
92
पुढे दिलेल्या समीकरण संचालीत M या चलासाठी उचित संख्या दिलेल्या पर्यायांकडून निवडा : X + Y = Z       Z + P = T T + X = M       Y + P + M = 100 X = 8
प्रश्न
93
खालीलपैकी कोणत्या संस्थांनी स्थापना दादाभाई नौरोजी यांनी केली होती ? अ. ज्ञान प्रसारक मंडळी ब. बाम्बे असोसिएशन क. लंडन इंडियन असोसिएशन ड. ईस्ट इंडिया असोसिएशन
प्रश्न
94
‘डेटाल’ मधील हा मुख्य घटक असतो.
प्रश्न
95
चार विद्यार्थ्यांची उंची W,X,Y,Z अशी आहे आणि 2X = W+Z, 2W=X+Y, 2Y =W तर त्यांच्या उंचीनुसार क्रम कसा असेल ?
प्रश्न
96
ब्राम्हो समाज (काही सदस्याना अमुलाग्र सुधारणाच्या पाठपुराव्यामुले )१८६६ मध्ये दोन भागात विभागला गेला. ते दोन भाग होते : अ) देवेन्द्रचंद्र टागोरचा ब्राम्हो समाज ऑफ इंडिया . ब) केशवचंद्र सेन यांच्या आदी ब्राम्हो समाज वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे ?
प्रश्न
97
२०११ या वर्षीच्या मानव विकास निर्देशांक मुल्याकाच्या उतरत्या क्रमात पुढील देशांची मांडणी करा. अ) नार्वे    ब)ऑस्ट्रेलिया   क)चीन   ड)भारत
प्रश्न
98
मित्राने पाठविलेल्या सांकेतिक संदेशातील काही शब्दांचे मेल्विनने पुढील प्रकारे विसंकेतन केले:zalftrinem  –  energyplaytrinemdrik – playgroundtrinemasky – playtimeजर त्याला पुढील पर्याय उपलब्ध असतील तर sometime या शब्दासाठी तो कोणता पर्याय निवडील ?
प्रश्न
99
भारतात रेल्वेचे जाळे उभारण्याकरिता लॉर्ड डलहौसीने नियोजन केले कारण. अ) भारताच्या अंतर्गत भागातून निर्यातीसाठी कच्चा माल मिळविण्यात सहजता यावी. ब) ब्रिटीश भांडवली गुंतवणुकीवर नफा कमविण्याकरिता मार्ग उपलब्ध करून देण्यासाठी . क) भारतात स्वस्त व सहज वाहतूक उपलब्ध व्हावी याकरिता.
प्रश्न
100
जोड्या लावा :   जिल्हा                       डोंगर अ)औरंगाबाद                        I.गाळणा डोंगर ब)नांदेड                           II.वेरूळ डोंगर क)गडचिरोली                        III.मुदखेड डोंगर क)धुळे                             IV.सुरजगड डोंगर

राहुन गेलेल्या बातम्या

x