28 January 2025 9:25 AM
अँप डाउनलोड

विक्रीकर निरीक्षक पूर्व परीक्षा (२६ मे २०१२)

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 148 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
डिसेंबर २०११ मध्ये डरबन शिखर परिषद कोणत्या जागतिक समस्येवर चर्चा करण्याकरिता बोलविण्यात आली होती ?
प्रश्न
2
तीन क्रमवार सम संख्यांची बेरीज १२६ आहे. तर सर्वात लहान व सर्वात मोठ्या संख्येतील फरक किती ?
प्रश्न
3
खालीलपैकी कोणते विधान विंध्य प्रणालीला लागू पडत नाही ?
प्रश्न
4
एका प्रदर्शनाचे प्रवेश तिकीट मुलासाठी रु. ५ आणि प्रौढासाठी रु.१५ आहे. या प्रदर्शनाला १३ व्यक्तींचा समुहाने भेट दिली आणि त्यासाठी त्यांनी प्रवेश तिकीट खरेदीसाठी रु.११५ दिले तर सदर समूहामध्ये ……….आहेत.
प्रश्न
5
जो पदार्थ रासायनिक अभिक्रियेत प्रत्यक्ष भाग घेत नाही, पण त्याच्या केवळ उपस्थितीमुळे रासायनिक अभिक्रियेचा वेग वाढतो, त्याला ……….म्हणतात.
प्रश्न
6
तांदूळ उत्पादनात भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो ?
प्रश्न
7
जुलै २०११ मध्ये कोणता देश नव्याने उदयाला आला ?
प्रश्न
8
……………….लोकसंख्या असणाऱ्या गावांसाठी एकत्रितपणे गट ग्रामपंचायत स्थापन करता येते.
प्रश्न
9
‘सेन्ट्रल हिंदू कॉलेज’ ची स्थापना कोणी केली ?
प्रश्न
10
खालील क्रमिकेचे n वे पद ६८ आहे, तर n ची किमत किती ?५,८,११,१४ ………..
प्रश्न
11
लोखंडाचे गंजणे ही …………अभिक्रिया आहे .
प्रश्न
12
महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही ?
प्रश्न
13
महाराष्ट्रात ठिंबक जलसिंचन पद्धती कोणत्या पिकासाठी जास्त उपयुक्त ठरली आहे ?
प्रश्न
14
Question title
प्रश्न
15
माथेरान हा प्रसिद्ध घाटमाथा ………..जवळ आहे.
प्रश्न
16
कवायतीसाठी मुलांच्या जेवढया रांगा आहेत, तेवढीच मुले प्रत्येक रांगेत आहेत. जर एकूण मुले ४८४ असतील तर कवायतीसाठी केलेल्या रांगा किती ?
प्रश्न
17
क्ष-किरण किंवा किरणोत्सर्जी पदार्थ यांच्या सहाय्याने कर्करोगावर उपचार करण्याच्या पद्धतीला ……..म्हणतात.
प्रश्न
18
एक व्यक्ती ७२ किमी अंतराचा प्रवास ४ तासात पूर्ण करतो. तर त्याची सरासरी चाल…….आहे .
प्रश्न
19
इ.स. १८८५-१८८९ या काळात कोणत्या महाविद्यालयात राजर्षि शाहू महाराजांनी शिक्षण पूर्ण केले ?
प्रश्न
20
एका आयताकृती भ्रमणध्वनी संचाची लांबी त्याच्या रुंदीपेक्षा ३ ने जास्त आहे. जर त्याची परिमिती ३४ सेमी असेल, तर त्या भ्रमणध्वनी संचाची लांबी ………..आहे.
प्रश्न
21
दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत ………. ला अग्रक्रम देण्यात आला.
प्रश्न
22
संविधान सभेचे कायदेविषयक सल्लागार कोण होते ?
प्रश्न
23
इ.स. १९२५ च्या केंद्रीय कार्यकारी मंडळाचे सभापती कोण होते ?
प्रश्न
24
७,११,१५,१९ ………….ही अंकगणिती श्रेणी आहे. तिच्या ६० पर्यंतच्या पदांची बेरीज ……….आहे.
प्रश्न
25
भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते ?
प्रश्न
26
खालीलपैकी कोणते वैशिष्ट्ये भारतातील शहरी वसाहतींना लागू पडत नाही ?
प्रश्न
27
भारतीय उद्योगाच्या विकासाचा विचार करण्यासाठी ‘औद्योगिक आयोग’ कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आला ?
प्रश्न
28
सनदी सेवकांना ……………….बनण्याची परवानगी नाही .
प्रश्न
29
महाराष्ट्र राज्यात जंगलाखालील क्षेत्रात प्रमाण ………..आहे .
प्रश्न
30
मुअम्मर गद्दाफी हा कोणत्या देशाचा हुकुमशहा होता ?
प्रश्न
31
भारताची पहिली पंचवार्षिक योजना केव्हापासून सुरु झाली ?
प्रश्न
32
जायकवाडी मत्स्य बीज केन्द्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ?
प्रश्न
33
शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती ?
प्रश्न
34
महाराष्ट्रातील ग्राम -पंचायतीचा कारभार …….च्या ‘मुंबई ग्रामपंचायत कायदा’ व त्यातील वेळोवेळी झालेल्या बदलानुसार चालतो.
प्रश्न
35
जुलै २००९ पासून महाराष्ट्राचे राज्य निवडणूक आयुक्त कोण आहेत ?
प्रश्न
36
खालीलपैकी कोणत्या ठिकाणी दैनिक सरासरी तापमान कक्षा जास्त आहे ?
प्रश्न
37
लहान मुलांमध्ये रातांधळेपणा हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो ?
प्रश्न
38
मानवी शरीराला जवळपास किती किलोमीटर लांबीच्या रक्त वाहिन्या असतात ?
प्रश्न
39
सन २०११ च्या शिरगणती अहवालानुसार खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे ?
प्रश्न
40
विधवांच्या शिक्षणासाठी ‘अनाथ बालिकाश्रम’ कोणी स्थापन केले ?
प्रश्न
41
वारंवारतेचे S.I. एकक काय आहे ?
प्रश्न
42
आंग सान स्यू की यांच्याबाबतीत खालीलपैकी कोणते कथन बरोबर आहे ?
प्रश्न
43
Question title
प्रश्न
44
दि.२१ डिसेंबर १९०९ रोजी जक्सन वर कोणी गोळ्या झाडल्या ?
प्रश्न
45
२००१ च्या शिरगणतीनुसार महाराष्ट्रातील लोकसंख्येच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा कोणता ?
प्रश्न
46
एका अपूर्णांकाचा छेद त्याच्या अंशापेक्षा ४ ने मोठा आहे. त्या अपूर्णांकाच्या अंशामध्ये ११ मिळवले व छेदातून १ वजा केल्यास मिळणाऱ्या अपूर्णांकाची किंमत ७/३ होते, तर मुळचा अपूर्णांक ………..आहे.
प्रश्न
47
भारतात राष्ट्रपतीच्या निवडणूकीत मतदार कोण असतात ?
प्रश्न
48
महात्मा फुले व युवराज ड्युक ऑफ कॅनाट यांची भेट कोणत्या वर्षी झाली होती ?
प्रश्न
49
महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता जागतिक प्रकल्प बांधा -वापरा आणि हस्तांतरण करा या बाबतीत अयशस्वी ठरला ?
प्रश्न
50
महाराष्ट्र नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण किती आहे ?
प्रश्न
51
मालाने ५ खुर्च्या व २ टेबल रु. १६२५ ला खरेदी केले. रेश्माने २ खुर्च्या व १ टेबल रु. ७५० ला खरेदी केले. तर एका खुर्चीची व एका टेबलची किंमत अनुक्रमे ……………….आहे .
प्रश्न
52
भारतीय राज्यघटनेचे कलम ‘५१ अ’ कशा संबंधी आहे ?
प्रश्न
53
‘बंदिस्त वर्ग म्हणजे जात होय’ ही व्याख्या कोणी केली ?
प्रश्न
54
पाण्यात वाढणाऱ्या परंतु अपुष्प असणाऱ्या शैवाल या वनस्पतीचे नाव काय ?
प्रश्न
55
महाराष्ट्र राज्याची निर्मिती …………रोजी झाली.
प्रश्न
56
महाराष्ट्रात ‘पंचायत राज’ या मध्ये स्त्रियासाठी किती टक्के जागा राखीव असतात ?
प्रश्न
57
मुळा, गाजर, बीट या कोणत्या वनस्पती आहेत ?
प्रश्न
58
राष्ट्रीय कॉंग्रेस सभेच्या इ.स. १८८६ च्या कलकत्ता अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते ?
प्रश्न
59
मॅग्नेशियमची संयुजा २ आहे व क्लोरिनची संयुजा १ आहे. तर मग्नेशियम क्लोराईडचे रेणुसुत्र काय ?
प्रश्न
60
२०११ मधील अर्जुन पुरस्कार खालीलपैकी कोणाला मिळाला ?
प्रश्न
61
10 kg वस्तुमान असलेला पदार्थ जमिनीपासून १० मी उंच नेला. त्याठिकाणी गुरुत्वीय त्वरण 9.8 m/s² असेल, तर त्या पदार्थाला प्राप्त झालेली स्थितीज ऊर्जा किती ?
प्रश्न
62
चूक जोडी ओळखा .
प्रश्न
63
२७३ *४ या संख्येला ११ ने पूर्ण भाग जाण्यासाठी *च्या ठिकाणी खालीलपैकी कोणता अंक असावा ?
प्रश्न
64
ताई महाराज प्रकरणी राजर्षि छत्रपती शाहू व लोकमान्य टिळक यांची चर्चा केव्हा झाली ?
प्रश्न
65
बियांच्या कडक कवचामध्ये कोणत्या ऊती आढळतात ?
प्रश्न
66
सप्टेंबर २०११ मध्ये रशियात झालेल्या बुद्धिबळ वर्ल्डकप स्पर्धेचा विजेता कोण ?
प्रश्न
67
‘संवाद कौमुदी’ हे वृत्तपत्र कोणी सुरु केले ?
प्रश्न
68
आधुनिक आवर्तसारणी कशावर आधारित आहे ?
प्रश्न
69
चिकणमातीपासून बनवलेल्या एका शंकुची उंची २४ सेमी आणि पायाची त्रिज्या ६ सेमी आहे. त्याचा आकार बदलून गोल तयार केला तर त्या गोलाची त्रिज्या किती ?
प्रश्न
70
खालीलपैकी कोणता हक्क हा भारतीय संविधानाच्या मुलभूत हक्कात नाही ?
प्रश्न
71
भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस राष्ट्रवादी होती कारण .
प्रश्न
72
भारतीय मुळच्या श्रीमती कमला प्रसाद बिस्सेसर या कोणत्या देशाच्या पंतप्रधान आहेत ?
प्रश्न
73
सातपुडा पर्वतरांगेमुळे ……..व ……… नद्यांची खोरी वेगळी झाली आहेत .
प्रश्न
74
१२ ते २६ फेब्रुवारी २०११ दरम्यान भारतातील ………..राज्यात ३४ व्या राष्ट्रीय खेळाचे आयोजित करण्यात आले.
प्रश्न
75
पंचायत समितीच्या कोणत्याही सभासदाचे सदस्यत्व राज्य शासन गैरवर्तवणूकीच्या कारणास्तव संपुष्टात आणू शकते जर पंचायत समितीने तसा प्रस्ताव हजर व मतदानात भाग घेणाऱ्या …………सभासदांच्या होकारासह पाठविला तर.
प्रश्न
76
‘आत्मीय सभा’ कोठे स्थापन करण्यात आली होती ?
प्रश्न
77
सर्वात अधिक बालकामगार असणारा देश कोणता ?
प्रश्न
78
बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना कोणी केली ?
प्रश्न
79
कोकणात आर्द्रतेचे पप्रमाण नेहमी जास्त असण्याचे कारण कोणते ?
प्रश्न
80
एका दोन-अंकी संख्येतील एकक व दशक स्थानाच्या अंकांचा गुणाकार १२ आहे. जर त्या संख्येत ३६ ही संख्या मिळविली तर मुळच्या संख्येतील अंकांची अदलाबदल होते, तर ती संख्या कोणती ?
प्रश्न
81
भारतीय प्रमाण वेळ आणि ग्रीनविच प्रमाण वेळ यांच्यात ……..अंतर आहे .
प्रश्न
82
अकराव्या पंचवार्षिक योजनेचे प्रमुख उद्धिष्ट कोणते ?
प्रश्न
83
‘शिका, संघर्ष करा व संघटित व्हा’ हे कोणाचे ब्रीदवाक्य होते ?
प्रश्न
84
पुढील विधाने पाहा : A) प्रत्येक जिल्हा परिषदेला राज्य शासनाने नेमणूक केलेला एक मुख्य कार्यकारी अधिकारी असतो. B) जर एखाद्या जिल्हा परिषदेने मुख्य कार्यकारी अधिकारीस परत घेण्याकरता दोन-तृतीयांश मताधिक्याने कळविल्यास तसे करणे राज्य शासनास भाग पडते.
प्रश्न
85
भारतीय ‘नागरिकत्व कायदा’ केव्हा बनविण्यात आला ?
प्रश्न
86
रमेशला सुरेशच्या पगाराच्या निमपट तर महेशला रमेशच्या पगाराच्या तिप्पट पगार आहे. जर महेशचा पगार रु. ४५०० असल्यास सुरेशच्या पगार किती ?
प्रश्न
87
“भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न ” हा ग्रंथ कोणी लिहिला ?
प्रश्न
88
महाराष्ट्रातील कोणत्या व्यक्तीचे जन्म-शताब्दी वर्ष २०१२ मध्ये साजरे करण्यात येत आहे ?
प्रश्न
89
ग्रामपंचायतीची तपासणी करण्याचे अधिकारी कोणाकडे आहेत ?
प्रश्न
90
१९१९ च्या माँटफोर्ड कायद्यानुसार केंद्रीय कायदेमंडळाच्या कनिष्ठ व वरिष्ठ सभागृहाची सभासद संख्या अनुक्रमे किती ठरली होती ?
प्रश्न
91
१,३,४ या अंकापासून तयार होणाऱ्या सर्व तीन-अंकी संख्यांची बेरीज किती ?
प्रश्न
92
‘इंडिया हाउस’ ची स्थापना कोणी केली ?
प्रश्न
93
बिनविरोध निवडून येणाऱ्या लोकसभेच्या पहिल्या महिला सभापती कोण ?
प्रश्न
94
‘समता संघा’ ची स्थापना कोणी केली ?
प्रश्न
95
२०११-२०२० हे दशक संयुक्त राष्ट्रांकडून ………..दशक म्हणून साजरे केले जात आहे .
प्रश्न
96
नीलाने एका ‘महिला बचत गटात’ फेब्रुवारी २०१० महिन्याच्या पहिल्या दिवशी रु.२, दुसऱ्या दिवशी रु.४, तिसऱ्या दिवशी रु.६, अशा तऱ्हेने पैसे गुंतवल्यास तिची फेब्रुवारी २०१० अखेरीस एकूण बचत किती ?
प्रश्न
97
खालीलपैकी कोणते राष्ट्र BRICS चे सदस्य नाही ?
प्रश्न
98
महर्षि धोंडो केशव कर्वे यांना भारत सरकारने कोणती पदवी देऊन गौरविले ?
प्रश्न
99
१४ वी राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स परिषद कुठे आयोजित करण्यात आली होती ?
प्रश्न
100
‘नेटीव्ह फीमेल स्कूलची’ स्थापना कोणी केली होती ?
प्रश्न
101
स्वामी विवेकानंद यांनी ‘रामकृष्ण मिशनची’ स्थापना कोणत्या वर्षी केली ?
प्रश्न
102
ईशान्य (उत्तर-पूर्वी) रेल्वेचे मुख्यालय कुठे आहे ?
प्रश्न
103
इ.स. १९१९ च्या कायद्यानुसार घेतलेल्या निवडणुकीत केंद्रीय कायदेमंडळातील सर्वात मोठा पक्ष कोणता होता ?
प्रश्न
104
एका अपूर्णांक संख्येच्या अंशाला २ ने गुणले व छेद २ ने वाढवला तर तो अपूर्णांक ६/७ होतो त्याएेवजी छेदाला २ ने गुणले व अंश २ ने वाढवला तर तो अपूर्णांक १/२ होतो. तर तो अपूर्णांक कोणता ?
प्रश्न
105
लोकायुक्त संस्था १९७२ साली स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ?
प्रश्न
106
धनविधेयक ………..प्रस्तुत केले जाते.
प्रश्न
107
खालीलपैकी कोणते वृत्तपत्र डॉ. बाबासाहेब आंबेडकरानी सुरु केले नव्हते ?
प्रश्न
108
महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेला शेवटचा ग्रंथ कोणता ?
प्रश्न
109
२ ऑक्टोंबर १९७२ रोजी दूरदर्शन केंद्र कुठे सुरु झाले ?
प्रश्न
110
४, १०, १२, २४ या प्रत्येक संख्येत कोणती संख्या मिळवली असता येणाऱ्या संख्या प्रमाणात येतील ?
प्रश्न
111
‘तैनाती फौजेची” पद्धत कोणी सुरु केली ?
प्रश्न
112
गांधीजीनी असहकार चळवळ थांबविण्याचे कारण काय ?
प्रश्न
113
महर्षि धोंडो केशव कर्वे यांनी कोणत्या महाविद्यालयात गणिताचा प्राध्यापक म्हणून नोकरी केली ?
प्रश्न
114
१०० वाॅट व २४० व्होल्ट दिव्याचा विद्युतरोध …………असेल.
प्रश्न
115
‘अलंकार मिमांसा’ नावाचा लेख कोणी लिहिला ?
प्रश्न
116
टाटा उद्योग समुहाचे नवे प्रमुख कोण ?
प्रश्न
117
मुख्यमंत्री हा राज्यपाल आणि …..यांच्यातील दुवा आहे.
प्रश्न
118
माहितीचा अधिकार अधिनियम २००५ हा या हेतूने करण्यात आला. अ) शासनाच्या कार्यात पारदर्शकता आणि जबाबदारी वाढावी म्हणून ब) भ्रष्टाचार रोखणे क) नोकरशाहीवर जनतेचा अंकुश निर्माण करणे ड) लोकशाही खऱ्या अर्थाने जनतेसाठी कार्यान्वित करणे. वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ?
प्रश्न
119
इ.स. १९१७ मध्ये प्राथमिक शिक्षकांना प्रशिक्षण देणारे महाविद्यालय कोणी सुरु केले ?
प्रश्न
120
पंचायत समितीचा मुख्य प्रशासकीय अधिकारी आणि सचिव कोण असतो ?
प्रश्न
121
आगरकरांनी कोणत्या तत्वाचा आधार घेऊन सुधारणेचा पुरस्कार केला होता ?
प्रश्न
122
जर ६० वाॅटचा विद्युत बल्ब २२० व्होल्ट विभवांतर असलेल्या स्त्रोतास जोडला तर त्यामधून वाहणारी विद्युत धारा किती ?
प्रश्न
123
‘लुकींग बँक’ हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?
प्रश्न
124
एक मोल पदार्थ म्हणजे किती रेणू ?
प्रश्न
125
महाराष्ट्र शासनाने महिलांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थेत आरक्षण शेवटी केव्हा वाढविले ?
प्रश्न
126
…………..हा लैंगिकरित्या पारेषित होणार रोग नाही .
प्रश्न
127
महाराष्ट्रातील मेंढा-लेखा हे भारतातील आदिवासी हक्क जतन करून बांबुतोड करणारे भारतातील पहिले गाव ठरले. ही चळवळ संसाधनांच्या जागतिकीकरणाच्या विरोधातील आहे. हे गाव महाराष्ट्रात ……….. आहे.
प्रश्न
128
अण्णा हजारे यांनी लोकपाल विधयेकासाठी १३ दिवसांचे उपोषण कुठे केले ?
प्रश्न
129
कोकणात रेल्वे प्रकल्पासाठी ‘कोकण रेल्वे कोर्पोरेशनची’ स्थापना केव्हा करण्यात आली ?
प्रश्न
130
Question title
प्रश्न
131
“ऑल इंडिया ट्रेड युनियन कॉंग्रेसचे” (AITUC) पहिले अध्यक्ष कोण होते ?
प्रश्न
132
२०११ साली नोबेल पुरस्कार प्राप्त करणारी तवक्कुल करमान ही कोणत्या देशाची क्रांतीची माता म्हणून ओळखली जाते ?
प्रश्न
133
खालीलपैकी गोदावरीची कोणती उपनदी नाही ?
प्रश्न
134
खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचा पर्जन्यछायेच्या क्षेत्रात समावेश होतो ?
प्रश्न
135
राजर्षि छत्रपती शाहू महाराजांनी काढलेले पहिले वसतिगृह कोणते ?
प्रश्न
136
केंद्रीय शिक्षण सल्लागार मंडळाने ठरवील्यानुसार ………..वर्गापर्यतच्या मुलांना ‘मोफत व सक्तीचे शिक्षण’ देण्यात येणार आहे .
प्रश्न
137
भारतीय राज्यघटनेमध्ये किती प्रकारच्या आणीबाणीचा उल्लेख आढळतो ?
प्रश्न
138
१ एप्रिल २०१२ पासून भारतात किती सेवाकर लागू करण्यात आला आहे ?
प्रश्न
139
“कॉमन विल” व “न्यू इंडिया” ही वृत्तपत्रे कोणी सुरु केली होती ?
प्रश्न
140
खालीलपैकी कोणती शिफारस सायमन कमिशनने केली नव्हती ?
प्रश्न
141
“बहिष्कृत हितकारणी सभा” या संस्थेची स्थापना कोणी केली होती ?
प्रश्न
142
माओवाद्यांनी अपहरण केलेले श्री अलेक्स पॉल मेनन कोणत्या राज्याचे जिल्हाधिकारी आहेत ?
प्रश्न
143
मुस्लीम लीगची स्थापना कोठे झाली ?
प्रश्न
144
‘पेशी’ हे नाव कोणत्या शास्त्रज्ञाने प्रथम वापरात आणले ?
प्रश्न
145
दोन नैसर्गिक संख्यांची बेरीज ८ आहे. जर त्यांच्या व्युत्क्रम संख्यांची बेरीज ८/ १५ असेल, तर त्या दोन संख्या कोणत्या ?
प्रश्न
146
सकाळी सूर्यप्रकाशामध्ये त्वचेच्या खाली कोणते जीवनसत्व तयार होते ?
प्रश्न
147
कर्झन वायली याला गोळी घालून कोणी ठार मारले ?
प्रश्न
148
ग्रामसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय काय आहे ?

राहुन गेलेल्या बातम्या

x