27 January 2025 9:49 AM
अँप डाउनलोड

तलाठी भरती सराव पेपर VOL-41

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
ताशी ३६ कि. मी. वेगाने जाणारी आगगाडी ५०० मीटर लांबीच्या एका पुलास २ मिनिटांत ओलांडते. तर त्या आगगाडीची लांबी किती असावी?
प्रश्न
2
एका शंकूच्या तळाची त्रिज्या ३ सें.मी. आणि लांब उंची ४ सें. मी. आहे. तर त्यांची तिरकस उंची किती असेल?
प्रश्न
3
‘मूर्तिपूजक’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?
प्रश्न
4
क्रम पूर्ण करा.‍ EQ, GS, IU, KW, …….
प्रश्न
5
२ मीटर + २ डेकामीटर + २ सेंटीमीटर = किती मीटर?
प्रश्न
6
एका रकमेची द. सा. द. शे. १० दराने सरळव्याजाने ३ वर्षांची रास १,५६० रु. होते आणि ४ वर्षांची रास १, ६८० रु. होते. तर ती रक्कम कोणती असावी?
प्रश्न
7
‘पथ’ या शब्दास समानार्थी असणारा शब्द सांगा.
प्रश्न
8
योग्य पर्याय निवडा : भाकडकथा
प्रश्न
9
पंचगंगा नदीच्या काठावर वसलेले शहर ……… आहे.
प्रश्न
10
कर्झन वायली या इंग्रज अधिकाऱ्याचा वध ………. या क्रांतीकाराने केला.
प्रश्न
11
यापैकी ‘सामासिक’ शब्द ओळखा.
प्रश्न
12
‘दररोज स्वच्छ कपडे घालावे’ या वाक्यातील विशेषण ओळखा.
प्रश्न
13
एका मशीनची किंमत १०,००,००० रुपये आहे. त्या किमतीत दरवर्षी १२ टक्के दराने घट होते. तर २ वर्षांनी मशीनची किंमत काय होईल?
प्रश्न
14
जर ‘HOT’ हा शब्द ‘९१६२१’ असा लिहितात तर ‘B’ हा शब्द कसा लिहावा?
प्रश्न
15
‘खडाष्टक’ म्हणजे काय?
प्रश्न
16
राजाला मुकुट शोभतो. या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात सांगा.
प्रश्न
17
८ मजुर २० वस्तू ४ दिवसांत करतात. तर १० मजूर ५० वस्तू किती दिवसांत करतील?
प्रश्न
18
ठाणे जिल्ह्यातील ‘मोडकसागर’ हे धरण ………… या नदीवर बांधण्यात आले आहे.
प्रश्न
19
वर्धा व वैनगंगा या नद्यांचा संगम होऊन ………… हि नदी प्रवहित होते.
प्रश्न
20
‘बाई विद्यार्थ्यांना गणित शिकवितात.’ या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात सांगा.
प्रश्न
21
‘विद्याधन’ या शब्दाचा विग्रह दर्शविणारा पर्याय निवडा.
प्रश्न
22
चार वर्षांपूर्वी आईचे वय मुलीच्या वयाच्या तिप्पट होते. आज मुलीचे वय १६ वर्ष असल्यास मुलगी आणि आई यांच्या वयांचे गुणोत्तर काय असावे?
प्रश्न
23
मी एक संख्या मनात धरली. तिच्यातून ९ वजा केले. वजाबाकीला १९ ने गुणले. गुणाकार ८३६ आला, तर मी मनात धरलेली संख्या ………. असेल.
प्रश्न
24
भारतातील शिक्षण क्षेत्रात ‘ थेट परकीय गुंतवणुकी’ची कमाल मर्यादा …….. आहे.
प्रश्न
25
महात्मा गांधींचा जन्म कोणत्या दिवशी झाला?

राहुन गेलेल्या बातम्या

x