28 January 2025 7:59 AM
अँप डाउनलोड

ठाणे शहर पोलीस भरती २०१७

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 100 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
‘त्रिस्तरीय पंचायत राज’ ची संकल्पना कोणत्या समितीने मांडली?
प्रश्न
2
चादरींच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेले शहर कोणते?
प्रश्न
3
‘आंबोली’ हे पर्यटन स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे?
प्रश्न
4
महाराष्ट्राचे एकूण प्रशासकीय विभाग किती आहेत?
प्रश्न
5
भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत?
प्रश्न
6
भारतीय राज्य घटनेनुसार जम्मू कश्मीर राज्याच्या विधानसभेची मुदत किती असते?
प्रश्न
7
यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा) कोठे आहे?
प्रश्न
8
भारतीय लष्करामध्ये अतुलनीय शौर्याबद्दल शांततेच्या काळात दिला जाणारा सर्वोच्च सन्मान कोणता?
प्रश्न
9
‘जीभेला हाड नसणे’ याचा अर्थ काय?
प्रश्न
10
सचिनने ५ एकदिवशीय सामन्यात अनुक्रमे ५७, ५२, १०२, ४३ आणि ८६ धावा काढल्या, तर सचिनच्या धावांची एकूण सरासरी किती?
प्रश्न
11
‘दी ईनसायडर’ या आत्मचरित्राचे लेखक कोण?
प्रश्न
12
सध्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष कोण आहेत?
प्रश्न
13
विद्वान या पुल्लिंग शब्दाचा स्त्रीलिंग शब्द कोणता?
प्रश्न
14
कवी विष्णु वामन शिरवाडकर यांचे टोपण नाव काय आहे?
प्रश्न
15
महाराष्ट्राचे मुख्य सचिव कोण आहेत?
प्रश्न
16
स्वतःशीच केलेले भाषण म्हणजे?
प्रश्न
17
भारताचे कॅबिनेट सचिवालय कोणाच्या अधिपत्याखाली काम करते?
प्रश्न
18
महाराष्ट्राचे अर्थमंत्री कोण आहेत?
प्रश्न
19
सन २०१६ मध्ये मा. पंतप्रधान यांनी कोणत्या दिवशी पाचशे व हजार रुपयांच्या चलनी नोटा रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला?
प्रश्न
20
भारताचे विद्यमान सरन्यायाधीश कोण आहेत?
प्रश्न
21
पोलीस पाटलांची नेमणूक करण्याचे अधिकार कोणास असते?
प्रश्न
22
‘थेंब थेंब तळे साचे’ या म्हणीचा अर्थ काय?
प्रश्न
23
हिराची दर महिन्याची बचत रु. ६५० आहे. दरवर्षी ८४% व्याज त्याच्या खात्यावर जमा होते. तर प्रत्येक महिन्याला व्याज किती येते?
प्रश्न
24
भारताचे अॅटर्नी जनरल कोण आहेत?
प्रश्न
25
जर डॉक्टरांनी तुम्हाला ४ गोळ्या दर अर्ध्या तासाने एक याप्रमाणे घ्यायला सांगितल्या, तर त्या सर्व गोळ्या संपविण्यासाठी तुम्हाला किती वेळ लागेल?
प्रश्न
26
राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण आहेत?
प्रश्न
27
‘श्री गणेशा करणे’ याचा अर्थ काय?
प्रश्न
28
१०० ते ३०० पर्यंत १३ ने भाग जाणाऱ्या संख्या किती?
प्रश्न
29
केसरी हे वर्तमानपत्र कोणी सुरु केले?
प्रश्न
30
महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात दारूबंदी लागू करण्यात आली आहे?
प्रश्न
31
जगदीश, राजेश व पंकज यांनी सुरु केलेल्या सॉफ्टवेअरच्या व्यवसायात ८४००० रुपयांचा नफा झाला. त्यांनी अनुक्रमे २ : ३ : ७ या प्रमाणत नफ्याचे वाटप केले, तर राजेशचा वाटा किती?
प्रश्न
32
महाराष्ट्र विधानपरिषदेचे अध्यक्ष कोण आहेत?
प्रश्न
33
‘खडा टाकणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ कोणता?
प्रश्न
34
एका टोपलीत १०८ आंबे आहेत. ते काही मुलांना समान वाटले. जर ६ मुले जास्त असती तर प्रत्येज मुलाला ३ आंबे कमी आले असते तर एकूण मुले किती होती?
प्रश्न
35
सध्या राज्यसभेचे अध्यक्ष कोण आहेत?
प्रश्न
36
खगोल शास्त्राच्या संशोधनासाठी प्रसिद्ध असलेली आयुका हि संशोधन संस्था कोठे आहे?
प्रश्न
37
महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वोच्च पद कोणते?
प्रश्न
38
भारतामध्ये केंद्रीय माहिती अधिकार अधिनियम कोणत्या साली लागू करण्यात आला?
प्रश्न
39
भारताचे संरक्षण मंत्री कोण आहेत?
प्रश्न
40
‘तोरणमाळ’ हे थंड हवेचे ठिकाण कोठे आहे?
प्रश्न
41
भारतीय राज्यघटनेबाबत कोणते विधान चुकीचे आहे?
प्रश्न
42
‘डोळ्यावर कातडे ओढणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ कोणता?
प्रश्न
43
माय फ्रोजन टर्ब्युलन्स इन काश्मीर या पुस्तकाचे लेखक कोण?
प्रश्न
44
मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण?
प्रश्न
45
‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ या ग्रंथाचे लेखक कोण आहेत?
प्रश्न
46
निती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण आहेत?
प्रश्न
47
पत्रकारितेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पत्रकांना दिला जाणारा दर्पण पुरस्कार कोणाच्या स्मृतीप्रित्यर्थ दिला जातो?
प्रश्न
48
जीना हाऊस या नावाने ओळखली जाणारी वास्तू कोठे आहे?
प्रश्न
49
भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष कोण?
प्रश्न
50
स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री कोण?
प्रश्न
51
अष्टपैलू या शब्दाचा अर्थ कोणता?
प्रश्न
52
महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत?
प्रश्न
53
‘जैतापूर अणुविद्युत प्रकल्प’ कोणत्या जिल्ह्यात प्रस्तावित आहे?
प्रश्न
54
रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली?
प्रश्न
55
‘अंथरून पाहून पाय पसरावे’ या म्हणीचा अर्थ सांगा.
प्रश्न
56
क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा देशात कितवा क्रमांक लागतो?
प्रश्न
57
भावार्थ दिपीका या ग्रंथाचे लेखक कोण?
प्रश्न
58
भारतरत्न या सन्मानाचे पहिले बिगरभारतीय मानकरी कोण?
प्रश्न
59
पंतप्रधानाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोण आहेत?
प्रश्न
60
‘वराती मागून घोडे’ या म्हणीचा अर्थ काय?
प्रश्न
61
माधवने एका पसंस्थेतून ३६००० रु. द.सा.द.शे. १२.५ दराने कर्जाऊ घेतले. तर त्याला अडीच वर्षाचे मुदतीत किती पैसे परत करावे लागतील?
प्रश्न
62
चालू वर्षीय अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे संपन्न झाले?
प्रश्न
63
‘अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ कोणता?
प्रश्न
64
शिखांचे १० वे गुरु गुरुगोविंदसिंहजी यांची समाधी कोठे आहे?
प्रश्न
65
भारताचे राष्ट्रपती १२ नामवंत व्यक्तींची नेमणूक कोणत्या सभागृहासाठी करतात?
प्रश्न
66
निरर्थक गोष्टी व गप्पा याला काय म्हणतात?
प्रश्न
67
‘द्रविडी प्राणायम करणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ कोणता?
प्रश्न
68
रमेशला ४०० पैकी ३०४ गुण, गोविंदला ५०० पैकी ३८५ गुण, रीनाला ३०० पैकी २७३ गुण, तर विणाला २०० पैकी १६४ गुण मिळाले तर कोणाची प्रगती सर्वात जास्त आहे?
प्रश्न
69
खालीलपैकी कोणत्या नेत्यास सन २०१५ मध्ये भारतरत्न हा सर्वोच्च सन्मान बहाल करण्यात आला?
प्रश्न
70
एका वर्गातील २५% टक्के मुले गणितात, ३७% मुले इंग्रजीत उत्तीर्ण झाली. १३% मुले दोन्ही विषयात उत्तीर्ण झाली. तर किती % मुले ह्या दोन्ही विषयात अनुत्तीर्ण झाली?
प्रश्न
71
जगातील सर्वात उंचावरील टपाल कार्यालय भारतातील कोणत्या राज्यात आहे?
प्रश्न
72
कर्णाचा अवतार या अलंकारिक शब्दाचा अर्थ कोणता?
प्रश्न
73
माय प्रेसिडेंशीयल इयर्स हे पुस्तक कोणी लिहिले?
प्रश्न
74
‘चरैवेती चरैवेती’ या आत्माचरित्राचे लेखक कोण?
प्रश्न
75
महाराष्ट्रातील सर्वाधिक नक्षलग्रस्त जिल्हा कोणता?
प्रश्न
76
पैठण येथील जलाशयाचे नाव काय आहे?
प्रश्न
77
खंडेराव पाटलांनी जुना ट्रॅक्टर ८५००० रुपयाला खरेदी करतांना मध्यस्थास ३% कमिशन दिले. तर त्यांना  ट्रॅक्टरसाठी एकूण किती रुपये मोजावे लागले?
प्रश्न
78
‘थंड फराळ करणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ कोणता?
प्रश्न
79
राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष कोण असतात?
प्रश्न
80
महाराष्ट्रातील वनक्षेत्राचे प्रमाण सगळ्यात जास्त असलेला जिल्हा कोणता?
प्रश्न
81
रमेशला गणित आणि इंग्रजीत सरासरी ८१ गुण मिळाले. इंग्रजी आणि विज्ञामध्ये सरासरी 78 गुण मिळाले आणि विज्ञान व गणितात सरासरी ९३ गुण मिळाले, तर रमेशला किती गुण मिळाले?
प्रश्न
82
२५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल साजरा केला जाणारा …….
प्रश्न
83
देशातील पहिला सरकारी साखर कारखाना कोठे सुरु झाला?
प्रश्न
84
एका संस्थेत मुलामुलींचे प्रमाण ८ : ५ असे आहे. जर मुलींची संख्या एकूण १६० आहे, तर संस्थेतील एकूण विद्यार्थ्यांची संख्या किती?
प्रश्न
85
‘तोंडचे पाणी पळणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ कोणता?
प्रश्न
86
घटना समितीचे अध्यक्ष होते?
प्रश्न
87
प्रतापगड किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?
प्रश्न
88
सहा सिताफळांच्या किंमतीत दोन आंबे येतात आणि एका कलिंगडच्या किंमतीत तीन आंबे येतात. एकाने १८ रु. देऊन दोन कलिंगडे घेतली. तर त्याने आणखी घेतलेल्या ४ आंब्यांची व १० सिताफळांची किंमत किती?
प्रश्न
89
फिल्म अॅन्ड टेलिव्हिजन इन्स्टीट्युट कोठे आहे?
प्रश्न
90
चार क्रमवार सम संख्यांची बेरीज ६० आहे तर त्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती?
प्रश्न
91
मुलाच्या जन्माच्या वेळी अनंताचे वय ३२ वर्षे होते. ५ वर्षांनी अनंताचे वय त्याच्या मुलाच्या तिप्पट होईल. तर अनंत व त्याच्या मुलाची आजची अनुक्रमे वये किती?
प्रश्न
92
‘सुपारी देणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ कोणता?
प्रश्न
93
रिझर्व बॅंकेचे गव्हर्नर कोण आहेत?
प्रश्न
94
मुंबईचे पोलीस आयुक्त कोण आहेत?
प्रश्न
95
उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री कोण आहेत?
प्रश्न
96
‘विंग्ज ऑफ फायर’ या पुस्तकाचे लेखक कोण?
प्रश्न
97
भारताचे भूदल प्रमुख कोण आहेत?
प्रश्न
98
नियोजन आयोग बरखास्त करून कोणत्या आयोगाची स्थापना करण्यात आली?
प्रश्न
99
‘परित्यक्ता’ म्हणजे काय?
प्रश्न
100
भारताचे गृहमंत्री कोण आहेत?

राहुन गेलेल्या बातम्या

x