16 April 2025 11:06 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Adani Power Share Price | 48% टक्के परतावा मिळवा, संधी सोडू नका, अदानी पॉवर शेअर टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIPOWER Trident Share Price | संयम ठेवल्यास हा पेनी स्टॉक श्रीमंत करू शकतो, यापूर्वी दिला 5322 टक्के परतावा - NSE: TRIDENT SBI Home Loan | एसबीआय बँकेच्या कर्जाचे दर कमी झाले, आता गृहकर्जासाठी किती व्याज द्यावे लागेल पहा Horoscope Today | 16 एप्रिल 2025, तुमच्यासाठी बुधवारचा दिवस कसा असेल? तुमचे बुधवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार बुधवार 16 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Power Share Price | पॉवर कंपनीचा पेनी स्टॉक पुन्हा तुफान तेजीत, शॉर्ट टर्म टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RPOWER Vodafone Idea Share Price | हा पेनी स्टॉक मालामाल करणार, सध्याच्या लेव्हल पासून 63 टक्के परतावा मिळेल - NSE: IDEA
x

Parenting | मुलांना वेळेचे नियोजन असं शिकवा आणि अनुभवा फायदे - नक्की वाचा

 How to Teach Your Kids Time Management Skills

मुंबई, ०५ सप्टेंबर | अनेकदा पालक आपल्या कामात व्यग्र असताना आपल्या मुलाच्या वेळेचे नियोजन कसे होईल हि गोष्ट विसरतात किंवा त्यांना अनेक कार्यशाळेत घातले जाते जेणेकरून त्यांचा वेळ गुंतून राहील. पण आपण या गोष्टीचा विचार केला पाहिजे कि वेळ गुंतून राहणे म्हणजे तो योग्य घालवणे नसून त्यातसुद्धा त्याचे नियोजन करणे फार महत्वाचे आहे.

मुलांना वेळेचे नियोजन असं शिकवा आणि अनुभवा फायदे – How to Teach Your Kids Time Management Skills :

वेळेचे नियोजन कारणे मध्ये योग्य वेळी जेवणे आणि झोपणे हे देखील येते. तसेच कितीव वेळ मोबाइल वापरणे , किती वेळ अभ्यास करणे आणि किती वेळ आराम करणे हे देखील अंतर्भूत असते. त्यामुळे सकाळपासून ते रात्रीपर्यंत आपण काय काय केले याचा जमाखर्च राखणे म्हणजे वेळेचे नियोजन करणे होय. सतत काम करणे म्हणजे चांगले असे नव्हे तर ते काम तुम्ही किती वेळात पूर्ण करून ,किती आनंद प्राप्त करता हे पाहणे देखील तितकेच महत्वाचे आहे.

वेळेचे नियोजन जर अगोदरच आणि कमी वयात करायला शिकवले तर भविष्यात या गोष्टीचे अनेक फायदे पाहायला मिळतात. दिवसभरातील बराचसा वेळ आपण विनाकारण आणि नकळत फुकट घालवत असतो; कारण आपण वेळेचे नियोजन केलेले नसते. सर्वसाधारणपणे अध्र्या तासाच्या कामासाठी आपला एक ते दीड तास इतका वेळ वाया जातो; कारण आपण ती कृती अल्प वेळेत करण्याचे नियोजन केलेले नसते. अशा प्रकारे दिवसाचे बहुमूल्य ३ ते ५ तास आणि सुट्टीच्या दिवशी तर त्याहूनही अधिक वेळ आपण व्यर्थ घालवतो.

वेळेचे नियोजन कसे करावे ?
वेळेच्या नियोजनासंबंधी असे म्हणता येईल की, कमी महत्त्वाच्या गोष्टींवर आपण ८० टक्के वेळेचा वापर करून २० टक्के परिणाम मिळवतो, तर महत्त्वाच्या गोष्टींसाठी आपण फक्त २० टक्के वेळ घालवतो. त्यामुळे आपल्याला वेळ पुरत नाही. वेळेचे नियोजन करतांना आपल्याला सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंत कोणत्या कृती करायच्या आहेत, त्यांची यादी बनवावी. त्यानुसार प्रत्येक कृती किती वेळेत पूर्ण करणार, ते निश्चित करावे. याला ‘नियोजन’ असे म्हणतात. वेळेचे नियोजन करतांना पुढील बाबी लक्षात घेतल्यास ते करणे सोपे जाईल.

* उद्दिष्टे ठरवा.

* त्यातील दीर्घकालीन आणि लगेच साध्य होणारी उद्दिष्टे वेगळी करा.

* आता तुमच्याकडे असणार्‍या प्रलंबित कृती आणि पुढे करावयाच्या कृती यांची सूची करा.

* या सूचीचे तातडीची आणि महत्त्वाची कामे, तातडीची पण कमी महत्त्वाची कामे, महत्त्वाची पण कमी तातडीची कामे आणि इतर असे वर्गीकरण करा.

* त्यातील तातडीची आणि महत्त्वाची कामे करण्यासाठी प्राधान्य द्या. त्यानंतर पुढच्या क्रमाची कामे हाती घेतल्यास नियोजन सोपे जाईल.

* प्रत्येक वेळी उपलब्ध वेळेचा सदुपयोग कसा करू, याचा विचार करा. प्रतीक्षा वेळ ही देणगी समजा.

* हाती घेतलेले काम अधिकाधिक पूर्ण करण्याचा प्रयत्न करा.

* प्रत्येक गोष्ट लक्षपूर्वक ऐका, उदा. एखादा निरोप घेतांना, तो आपल्याला नीट समजला आहे ना, याची खातरजमा करून घ्या.

* एखाद्या व्यक्तीला निरोप देतांना त्याला तो नीट समजला आहे ना, याची खातरजमा करून घ्या.

Tips to Teach Kids Time Management :

नियोजनाप्रमाणे कृती करणे:
या निश्चित केलेल्या वेळेप्रमाणेच सर्व कृती करणे, म्हणजेच नियोजनाप्रमाणे कृती करणे. नियोजनाप्रमाणे प्रत्येक गोष्ट काटेकोरपणे करण्याचा प्रयत्न केल्यास वेळेची अधिक बचत होऊन अल्प वेळेत आपली अधिक कामे होतात. अशा प्रकारे वेळेचा वापर आपण अनेक चांगल्या गोष्टी करण्यासाठी करू शकतो.

वाया जाणारा वेळ वाचवण्यासाठी दैनंदिनी:
कोणत्या गोष्टींत आपला वेळ वाया जातो, याचा अभ्यास करणे आवश्यक आहे. तरच आपण वेळेच्या अपव्ययावर नियंत्रण ठेवू शकतो. त्यासाठी स्वतःच्या दिनक्रमाच्या दैनंदिनीचे लिखाण करा. त्यामध्ये वाया गेलेल्या वेळाची कारणे लिहून त्यावर उपाययोजना करा !

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: How to Teach Your Kids Time Management Skills.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Parenting(11)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या