Parenting | लहान मुलांना खेळण्यासाठी कोणत्या प्रकारची खेळणी द्यावी? - नक्की वाचा

मुंबई ०८ ऑगस्ट | आपण असे पाहिले आहे कि बर्याच मुलांजवळ कोणतीही खेळणी नसतात तरीही ते खेळण्यांनी भरलेल्या मुलांपेक्षा स्वतःला जास्त व्यस्त ठेवतात. खेळण्यांची खरंच गरज आहे का याचा आधी विचार करा. पण मला माहित आहे कि आजच्या काळात जेव्हा सर्व मुलांकडे खेळणी असतात आणि कंपन्या आपल्या मुलांवर वारंवार लक्ष्य ठेऊन असतात अश्या परिस्थितीत खेळणी टाळणे थोडे अवघड आहे. पण जर जगात एवढी मुलं खेळण्याशिवाय रहात आहे तर आपली मुलं का नाही?
१. खरंतर मुलांमध्ये स्वतःला व्यस्त ठेवण्याची कला असते. मुलांच्या आयुष्यात जेव्हा आपण ‘खेळणं’ हा प्रकार पहिल्यांदा आणतो तेव्हा त्यांना त्याची सवय लागण्याची शक्यता असते . ते खरंच फोन वर व्यस्त राहिले असते का जर तुम्ही त्यांना फोन हा प्रकार वारंवार दाखवला नसता? त्यांच्यासाठी तर फोन हे एक अद्भुत खेळणं आहे विचार करा.
२. तरीही जर तुम्हाला खेळणं द्यायचं असेल तर:
खेळण्यांचे विभाजन
* शांत खेळण्यासाठी (कोणालाही त्रास होऊ नये असं)
* हालचाल होईल अश्या खेळासाठी
* एकटे खेळण्यासाठी
* इतरांसह खेळण्यासाठी
* घरात खेळण्यासाठी
* बाहेर खेळण्यासाठी
३. पालकांनी खेळणी निवडली तर उत्तम. इतरांच्या मुलांना खेळणी देणे टाळा जरी तुम्ही त्यांचे नातेवाईक असाल. खेळणं भेट म्हणून देणे हे मुलांसाठी एकप्रकारचा कचरा आहे! स्वतःला बरं वाटण्यासाठी (स्वार्थ/अहंकार/बंधन/कर्तव्य म्हणून ) खेळणं देणे टाळा. (किंवा जर तुम्हाला द्यायचच आहे तर पालकांना विचारून द्या)
४. अशी खेळणी ज्यामध्ये ते सहभागी होऊ शकतात. बॅटरीवर चालणारे खेळ ज्यामध्ये मुलं फक्त खेळण्याकडे बघणार (त्यांचा त्या खेळण्याबरोबर काहीच involvement नसेल) असे खेळणी देणे टाळा. जर कार दिली तर त्या कार ला उघडून बघता आलं पाहिजे किंवा जर बाहुली दिली तर मुलं त्या बाहुली सोबत स्वतः च्या कल्पने चा वापर करून नवीन कथा किंवा छोटंसं जग तय्यार करतील.
५. ‘Puzzle, Lego’ अश्या प्रकारचे खेळ जे एकापेक्षा जास्त प्रकारात खेळले जाऊ शकतात किंवा ज्याचे वेलवेगळे उपाय असतील.
६. मुलं त्यांच्या स्पर्शाने खेळू शकतील असे खेळ – Clay, माती, वाळू, पाणी. जरी असे खेळ पालकांसाठी गैरसोयीचे असेल तरी मुलांचा मातीसोबत असलेला स्पर्श त्यांना पृथ्वी सोबत जोडून ठेवतं. आपण सर्व या माती मधूनच तर आलो आहोत!
७. खेळणं मुलाचा भाग आहे कि मुलं खेळण्याचा भाग? खेळामध्ये तुमची मुलं फोकस मध्ये आहे कि ते खेळणं?
८. बोलणारे, आवाज करणारे, नाचणारे, खेळणे टाळा. बोलणं,आवाज देणं, नाचणं या सर्व गोष्टी तुम्ही तुमच्या मुलासोबत करूच शकता. जास्त प्रकाश देणारे झगमगनारे खेळ हि टाळा कारण ते मुलांना खऱ्या खेळा पासून विचलित करण्याचे काम करतात.
९. नाट्यमय खेळ हि देऊ शकता ज्यामध्ये त्यांच्या कल्पना शक्ती चा वापर होईल
* भांडी-कुंडी (Kitchen-Kitchen)
* डॉक्टर-डॉक्टर
* फायर फायटर
* घर-घर
* ट्रेन-ट्रेन
* इत्यादी
पंरतु महत्वाचं म्हणजे त्यांना डिजिटल खेळणी देणं टाळा.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
Parenting Title: Which kind of toys should give to kids in Marathi news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
Reliance Share Price | 1640 रुपये टार्गेट प्राईस, सध्या 1187 रुपयांवर ट्रेड करतोय, फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE
-
Vedanta Share Price | यापूर्वी 10,623 टक्के परतावा दिला, पुढे अजून कमाई होणार, फायद्याची अपडेट आली - NSE: VEDL
-
Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, ही आहे टार्गेट प्राईस - NSE: YESBANK
-
Yes Bank Share Price | रॉकेट तेजीचे संकेत, 17 रुपयांचा शेअर मालामाल करणार, टॉप ब्रोकिंग हाऊस बुलिश - NSE: YESBANK