महत्वाच्या बातम्या
-
'तुम्हाला फक्त स्वतःचीच काळजी आहे, पंतप्रधान मोदी साहेब', असे पत्र लिहून कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या, राज्य सरकारवरही दोष
Farmer Suicide | कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या आणि तुटलेल्या दशरथ एल. केदारी या शेतकऱ्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त (१७ सप्टेंबर) अभिनंदन केले आणि त्यानंतर तलावात उडी घेऊन आपले जीवन संपवले. केदारी यांनी एक सुसाईड नोटही मागे ठेवली होती, ज्यात लिहिले होते की, “आम्ही काय करू शकतो? तुम्हाला फक्त स्वत:ची काळजी आहे मोदी साहेब. आम्ही भीक मागत नाही आहोत, पण आपल्यामुळे काय बरोबर आहे?, आम्हाला एमएसपी दिली पाहिजे कारण सावकार आम्हाला धमकावत आहेत. शेतकऱ्यांसारखी जोखीम कोणी घेत नाही, आमच्या तक्रारी घेऊन आम्ही कुठे जाऊ?
2 वर्षांपूर्वी -
Udayanraje Bhosale On ED | कारवाई करणार असाल तर ED'ने यावं, अन्यथा येऊ नये - उदयनराजे
राज्यात मागील काही दिवसांपासून ED, आयकर विभाग आणि CBI अशा विविध संस्थांकडून राजकीय विरोधक व्यक्तींच्या विरोधात कारवाई केल्या जात आहेत. सदर कारवाईत महाराष्ट्र केंद्रस्थानी ठेवण्यात आला असून त्यात सत्ता गेल्याची आग भाजप नेत्यांच्या (Udayanraje Bhosale On ED) मनात अजून फेटत आहे.
3 वर्षांपूर्वी -
Sharad Pawar | 3 हजार कोटी न दिल्याने कोळसा पुरवठा थांबवला | मग राज्याचा 35 हजार कोटी GST कसा थांबवता? - शरद पवार
राष्ट्रवादीचे सर्वेसेवा शरद पवार आज पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत. पिंपरी चिंचवड महानगपालिका राज्यातील एक महत्वाची महापालिका समजली जाते आणि त्यासाठी पवारांनी इकडे विशेष लक्ष घातल्याचं पाहायला मिळतंय. याच वेळी आयोजित पत्रकार परिषदेत पवारांनी (Sharad Pawar) भाजपाला अनेक मुद्यांवरून लक्ष केलं आहे.
3 वर्षांपूर्वी -
Shivpratishtan Sambhaji Bhide | गुलामी, नरकात राहणाऱ्या निर्लज्ज लोकांचा देश म्हणजे हिंदुस्थान - संभाजी भिडे
वादग्रस्त वक्तव्यांनी खळबळ उडवून देणारे शिवप्रतिष्ठान संघटनेचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी आज अजून एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. पारतंत्र्य, गुलामी, दास्याच्या नरकात राहणाऱ्या बेशरम लोकांचा, एक अब्ज 23 कोटी लोकांचा हा (Shivpratishtan Sambhaji Bhide) देश आहे. दीर्घ काळ परक्यांचा मार खात, दास्यत्व स्वीकारत, खरकटं उष्टं खात, निर्लज्ज लोकांचा देश म्हणजे हिंदुस्थान आहे” असं वक्तव्य संभाजी भिडे यांनी सांगलीत केलं.
3 वर्षांपूर्वी -
Sharad Pawar and Gadkari | ऊसापासून इथेनॉल ऐवजी हायड्रोजन गॅस निर्माण करण्याची गरज | पवारांचा सल्ला
नगर जिल्ह्यातील विविध विकासकामांच्या भूमीपूजनासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार एकाच मंचावर (Sharad Pawar and Gadkari) आले होते. त्यावेळी शरद पवारांनी नितीन गडकरींच्या कार्यशैलीचं मुक्तकंठाने कौतुक केलं. पेट्रोल-डीझेलच्या वाढते दर आणि प्रदुषणाच्या समस्येच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे साखर कारखान्यात इथेनॉल निर्मितीवर भर देण्यास सांगत आहेत.
3 वर्षांपूर्वी -
Shirdi Airport | शिर्डी विमानतळाजवळ सर्व सुविधांयुक्त शहर वसवणार | मुख्यमंत्र्यांची मंजुरी
विमानतळाच्या (Shirdi Airport) सभोवतालचा परिसर विकसित करून सर्व सुविधायुक्त शहर वसविण्यासाठी शिर्डीची निवड करण्यात यावी तसेच महाराष्ट्रातील एक उत्तम विकास केंद्र या ठिकाणी वसवावे, अशी सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. बुधवारी ते महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत बोलत होते.
3 वर्षांपूर्वी -
भाजपमध्ये गेलेल्या लोकांना CBI, ED आणि आयकर विभागाचं संरक्षण आहे का? | आम्ही भाजप नेत्यांची यादी देतो - जयंत पाटील
महाविकास आघाडीच्या नेत्यांवर सुरू असलेल्या ईडीच्या कारवाईवरून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे. भाजपमध्ये गेलेल्या लोकांना सीबीआय, ईडी आणि आयकर विभाग या एजन्सींचे संरक्षण आहे का? आम्ही अशा लोकांची यादी देतो त्यांच्यावर ईडी काय कारवाई करणार?, असा सवाल जयंत पाटील यांनी केला आहे.
3 वर्षांपूर्वी -
युवकांच्या भविष्याशी खेळू होऊ नये | ST'चा प्रवास खर्चही सरकारच्या माध्यमातून देण्याबाबत विचार करावा - आ. रोहित पवार
आरोग्य विभागाची परीक्षा रद्द झालेली नसून पुढे ढकलण्यात आलेली आहे. जाहीर केलेल्या जागा कोणत्याही परिस्थिती भरणारच आहे. कंपनीने असमर्थता दाखविल्यमुळे परीक्षा रद्द करण्याची नामुष्की ओढावली. पण विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागला. मी विद्यार्थ्यांची माफी मागतो. पण विद्यार्थ्यांनी काळजी करु नये. येत्या काहीच दिवसांत परीक्षेच्या तारखेची घोषणा केली जाईल, असं स्पष्टीकरण आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलं.
3 वर्षांपूर्वी -
पेट्रोलपंपवर १०० लिटरने पेट्रोल भरताना तुम्ही त्यांच्याकडे बघायचं, मग ते म्हणतात कशी तुझी जिरवली - अजित पवार
पेट्रोल-डिझेल दरात आज कोणतेही बदल झालेले नाहीत. IOCL वेबसाइटनुसार, आज शनिवारी देशभरात इंधन दर स्थिर आहे. यापूर्वी शुक्रवारी डिझेलच्या दरात 22 पैसे प्रति लीटरपर्यंत वाढ झाली होती. तर पेट्रोल दर स्थिर ठेवण्यात आले होते. पेट्रोल किंमतीत कोणतेही बदल करण्यात आलेले नव्हते. या वाढीसह आज राजधानी दिल्लीत एक लीटर पेट्रोलचा दर 101.19 रुपये आणि डिझेलचा भाव 88.82 रुपये प्रति लीटर आहे.
3 वर्षांपूर्वी -
उद्या सोमैय्यांचा पारनेर येथे 'आरोप पर्यटन दौरा' | कारखाना विक्री प्रकरणी सोमय्या पारनेरला जाणार
नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील पारनेर सहकारी साखर कारखान्याच्या विक्री व्यवहाराची चौकशी व पाहणी करण्यासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या गुरुवारी पारनेरला भेट देणार आहेत. दरम्यान नगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रिफांवर आरोप केल्यानंतर सध्या सोमय्या चर्चेचे केंद्रबिंदू बनलेले आहे. यातच त्यांचा आता पारनेर दौरा हा विशेष चर्चेचा ठरणार आहे. क्रांती शुगरकडे पैसे नसतानाही ३२ कोटींना हा कारखाना कसा विकत घेतला असा प्रश्न उपस्थित करत सहकारी बँकेने कारखाना विक्रीची प्रक्रिया संशयास्पदरित्या राबवली असल्याचा आक्षेप बचाव समितीचा आहे.
3 वर्षांपूर्वी -
सोमैयांकडून आरोप पर्यटनाला धार्मिक रंग | गणेश विसर्जनापासून रोखलं, हिंदूला रोखलं, आंबेबाईच्या दर्शनापासून रोखल्याची बोंब
गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारचे मंत्री आणि नेत्यांवर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप करण्याचं सत्र किरीट सोमय्या यांनी सुरू केलं आहे. आजही ते कराडमध्ये पत्रकार परिषद घेत आहेत. यावेळी ते कोणता नवा गौप्यस्फोट करणार, ठाकरे सरकारवर निशाणा साधत ते काय बोलणार हे पाहण्यासारखं होतं. किरीट सोमय्या यांचा कोल्हापूर दौरा रोखणं, पोलिसांनी नोटीस बजावणं या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आजच्या पत्रकार परिषदेकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं. यावेळी बोलताना सोमय्या यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारला धारेवर धरत प्रश्नांची सरबत्ती केली आहे.
3 वर्षांपूर्वी -
किरीट सोमैयांची 'आरोप पर्यटन यात्रा' कराडमध्येच संपली | पत्रकार परिषदेची शक्यता
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप केल्यानंतर किरीट सौमैया कोल्हापूरला यायला निघाले होते. मात्र राष्ट्रवादीने त्यांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेत आंदोलनाचा इशारा दिला. त्यानंतर मात्र प्रशासन आणि पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर भाजप नेते किरीट सोमैय्या अखेर कराड येथेच उतरले आहेत. कोल्हापूरचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे यांनी त्यांना विनंती केल्यानंतर ते आज पहाटे महालक्ष्मी एक्सप्रेसमधून कराड स्थानकात उतरले आहेत. माझे भांडण प्रशासनाशी नाही, त्यामुळे प्रशासन अडचणीत येत असेल तर मी येणार नाही, असा पवित्रा सोमैया यांनी घेतला. त्यामुळे आता कोल्हापुरात राष्ट्रवादी आणि भाजप मध्ये होणारा संघर्ष तात्पुरता टळला आहे, शिवाय राष्ट्रवादीचा मोर्चा सुद्धा आता रद्द झाला आहे.
3 वर्षांपूर्वी -
आ. निलेश लंकेचं पुढील भविष्य अतिशय उज्ज्वल | राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून त्यांना मोठी संधी मिळणार - अमोल मिटकरी
कोरोनाच्या काळात सर्व रुग्णालये फुल असताना आ. निलेश लंके यांनी कोवीड सेंटर सुरु करून हजारो लोकांचे प्राण वाचवत अनेक कुटुंब उद्धवस्त होण्यापासून वाचवले. आमदार लंके यांचे पुढील भविष्य अतिशय उज्जवल आहे. राष्ट्रवादीला एक साजेसा आमदार लोकांनी दिला आहे. राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून आमदार निलेश लंके यांना मोठी संधी मिळणार असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे विधान परीषद अध्यक्ष अमोल मिटकरी यांनी केले.
3 वर्षांपूर्वी -
कर्जत-जामखेड | राम शिंदे समर्थक नामदेव राऊत लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार
कर्जत-जामखेड मतदारसंघात भाजपचे माजी मंत्री राम शिंदे यांचा पराभव करून रोहित पवार आमदार झाले आणि स्थानिक पातळीवर राम शिंदे यांच्या एकूण राजकारणाला उतरती कळा लागली आहे. त्यात राम शिंदे यांना अजून एक राजकीय धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण कर्जत नगर परिषदेचे प्रथम नगराध्यक्ष आणि नगरसेवक नामदेव राऊत यांनी प्राथमिक आणि सक्रीय सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे.
3 वर्षांपूर्वी -
सहकारी बँकामधील केंद्राच्या हस्तक्षेपाविरोधात न्यायालयात जाणार - उपमुख्यमंत्री
मध्यवर्ती सहकारी बँकांच्या बाबतीत केंद्र सरकारने बरेच बदल केले आहेत. जिल्ह्याचा अशा बँका चालवण्याचा अधिकार केंद्राने काढून घेतला आहे. अध्यक्ष व संचालक निवडीमध्ये देखील केंद्राचा हस्तक्षेप वाढला आहे. त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. याच्या विरोधात आम्ही न्यायालयात जाणार आहोत, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. बारामती येथे शनिवारी (दि. १८) एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते.
3 वर्षांपूर्वी -
Sambhaji Bhide Meet Eknath Shinde | उदयनराजेंच्या पाठोपाठ संभाजी भिडेगुरुजी एकनाथ शिंदेंच्या भेटीला
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडेगुरुजी यांनी शिवसेनेचे नेते व राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची महाबळेश्वर तालुक्यातील दरे तर्फ तांब या गावी जाऊन भेट घेतली. भाजप खासदार उदयनराजेंच्या भेटीनंतर लगेच भिडेगुरुजींनी मंत्री शिंदे यांची भेट घेतल्याने राजकीय निरीक्षकांनी भुवया उंचावल्या आहेत. मंत्री एकनाथ शिंदे यांच्या शेतीची भिडेगुरुजी यांनी पहाणी केली. शिंदे यांच्या शेतात गुरुजींच्या हस्ते फणसाचे रोप लावून वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे उपस्थित होते.
3 वर्षांपूर्वी -
Udayanraje Vs Shivendra Raje | आम्ही नुसता शब्द देत नाही तर पाळतोही | उदयनराजेंचा शिवेंद्रराजेंना अप्रत्यक्ष टोला
खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यातील शीतुयद्ध सर्वश्रुत आहे. सध्या दोघेही भाजपमधून प्रतिनिधित्व करत असले तरी स्थानिक राजकारणात मात्र वारंवार एकमेकांना शह-काटशह देताना दिसून येतात. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शीतयुद्धाचा प्रत्यय पुन्हा एकदा सातारकरांना पाहायला मिळाला आहे. ‘महाराष्ट्रात सातारा विकास आघाडी एकमेव अशी आघाडी असेल जी केलेली कामे लोकांपुढे जाहीरपणे मांडते. कारण, आम्ही केवळ शब्द देत नाही, तर तो पाळतो देखील, असा टोला खासदार उदयनराजे भोसले यांनी पालिका निवडणुकांच्या तोंडावर आमदार शिवेंद्रसिंहराजे यांचे नाव न घेता लगावला आहे.
3 वर्षांपूर्वी -
शरद पवारांनी काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र यावं - बाळासाहेब थोरात
काँग्रेसची अवस्था एखाद्या जमीनदारासारखी झाली आहे, असं विधान राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केलं होतं. पवारांच्या या विधानाशी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी असहमती दर्शविली आहे. तसेच पवारांनी काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र यावं असं खुलं आवतनच बाळासाहेब थोरात यांनी शरद पवार यांना दिलं आहे. त्यामुळे थोरात यांच्या या आवतनावर राष्ट्रवादीकडून काय प्रतिक्रिया येते याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते.
3 वर्षांपूर्वी -
OBC Reservation | मुख्यमंत्री स्तरावर आयोजित सर्वपक्षीय बैठकीत ओबीसी आरक्षणावर चर्चा होईल - जयंत पाटील
राज्यातील ओबीसी आरक्षण पुन्हा लागू करण्याबाबत लवकरच मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली पुन्हा सर्वपक्षीय बैठक पार पडणार आहे. त्या बैठकीत आरक्षणाच्या बाबतीत निर्णय़ होईल, अशी प्रतिक्रिया जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे. कोणत्याही स्थानिक स्वराज संस्थेतील ओबीसी आरक्षण कमी होता कामा नये, ही सरकारची भूमिका असल्याचेही मंत्री पाटील यांनी स्पष्ट केले. ते सांगलीच्या कवठेमहांकाळ तालुक्यातील ढालगाव येथे बोलत होते.
3 वर्षांपूर्वी -
भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्रासाठी राज्य सरकारच्या विरोधात मोठे आंदोलन करणार - अण्णा हजारे
केंद्रात ज्या पद्धतीने लोकपाल कायदा झाला आहे, त्याच धर्तीवर राज्यात सशक्त लोकायुक्त कायदा व्हावा, या मागणीसाठी समाजसेवक अण्णा हजारे यांनी राज्यातील उद्धव ठाकरे सरकार विरोधात आंदोलनाचा बिगुल दिला आहे. भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, त्यासाठी सशक्त आणि स्वायत्त लोकायुक्त गरजेचा आहे.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार