महत्वाच्या बातम्या
-
सातारा दौरा रद्द करण्यावर शरद पवारांचा खुलासा
उदयनराजे भोसले यांनी एनसीपीच्या खासदारकीचा राजीनामा देत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यानंतर सातारमध्ये पोटनिवडणूक घ्यावी लागली. यामध्ये श्रीनिवास पाटील यांच्या बाजूने जनतेने कौल दिला. उदयनराजेंनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्याने एनसीपी’साठी देखील ही लढाई प्रतिष्ठेची बनली. एनसीपीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सातारामध्ये सभा घेतली होती. धो धो पावसात पवारांच्या सभेची चर्चा राज्यभरात झाली. त्यानंतर उदयनराजेंचा दारुण पराभव झाला. यानंतर श्रीनिवास पाटील यांचे अभिनंदन करण्यासाठी तसेच सातारकर जनतेचे आभार मानण्यासाठी मी स्वत: जाणार असल्याचे शरद पवार यांनी म्हटले होते. पण हा कार्यक्रम त्यांनी रद्द केला.
5 वर्षांपूर्वी -
सातारा: पवार नीतीसमोर यापुढे कॉलर खाली; यापूर्वीची मतं सुद्धा राष्ट्रवादीची असल्याचं सिद्ध
विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी सारी तयारी पूर्ण झाली असून, सुमारे २५ हजार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मतमोजणीच्या कामाकरिता नेमणूक करण्यात आली आहे. आज दुपारी १२ वाजेपर्यंत सर्व कौल हाती येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. महायुती की आघाडीची सत्ता येणार हे काही वेळातच स्पष्ट होणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
साताऱ्यात घडाळ्याचं बटन दाबलं तर व्हीव्हीपॅटमध्ये कमळ चिन्ह दिसायचं
विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी राज्यभरात मतदान पार पडलं. मात्र जवळपास ६५ ठिकाणी ईव्हीएम संबंधित तक्रारी नोंदविण्यात आल्या होत्या. आधीच देशभरात ईव्हीएम’ला अनुसरून अनेकांच्या तक्रारी असताना देखील यावेळी सुद्धा तेच प्रकार समोर आले आहेत. मात्र यातील धक्कादायक गोष्ट म्हणजे मागील अनेक निवडणुकांमध्ये जेव्हा कोणतही बटण दाबलं जात तेव्हा ते मत काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी किंवा मनसे या पक्षांना जाण्याची उदाहरणं समोर न येता, ज्या तक्रारी आल्या त्या बटण दाबल्यावर फिरणारं मत भाजपाला म्हणजे कमळाकडेच कसं वर्ग होतं हा संशोधनाचा विषय बनला आहे.
5 वर्षांपूर्वी -
पिंपरीत बोगस मतदान करणाऱ्या ५ परप्रांतीयांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे
आज सकाळपासूनच अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण असल्याचं पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे मतदानाला देखील खूप कमी प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याचं दिसत आहे. अनेक ठिकाणी मतदान केंद्रावर वीज नसल्याने मेणबत्या लावून मतदान प्रक्रिया पार पडली जाते आहे. अजून थोडया वेळाने नेमक्या प्रतिसादाचा अंदाज येईल असं निवडणूक कर्मचारी मत व्यक्त करत आहेत.
5 वर्षांपूर्वी -
अजित पवार कुटुंबीयांनी काटेवाडीत आपला मतदानाचा हक्क बजावला.
संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या राज्य विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदानाला सुरूवात झाली आहे. राज्यातील अनेक भागांत कोसळणाऱ्या पावसामुळे निवडणूक यंत्रणांना रविवारी दिवसभर तारेवरची कसरत करावी लागली. राज्यातील ३,२३७ उमेदवारांचे भवितव्य आज ठरणार आहे. राज्य विधानसभेच्या २८८ जागा तर सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठी सोमवारी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होईल. राज्यात ८ कोटी ९८ लाख ३९ हजार ६०० मतदार आहेत. मतदान निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असून, सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
5 वर्षांपूर्वी -
ज्या पेढ्यावरून मोदींची खिल्ली उडवली त्या 'सातारी कंदी पेढ्याचा' हार मोदींना घालणार?
राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश करून खासदारकीचा राजीनामा देखील दिला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीसोबतच सातारा लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक देखील होणार आहे. तत्पूर्वी राष्ट्रवादीकडून उदयनराजेंना थांबवण्यासाठी करण्यात आलेले प्रयत्न अपयशी ठरले. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी देखील उदयनराजेंशी संपर्क करुन मनधरणी करण्याचा प्रयत्न केला मात्र राजेंनी ‘मी जातोय. मला संपर्क करु नका’, असं सांगितल्याची माहिती मुंडे यांनी दिली होती.
5 वर्षांपूर्वी -
१३ वर्ष मंत्रीपद दिल्यानंतर काम करता येणार नसेल तर बांगड्या भरा: शरद पवार
विधानसभा निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्प्यात आल्यानं आरोप-प्रत्यारोपांना धार चढली असून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सर्वाधिक आक्रमकपणे सत्ताधाऱ्यांवर हल्ले चढवत आहेत. श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार व माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्यावर तोफ डागताना पवार यांनी आज त्यांना बांगड्या भरण्याचा सल्ला दिला.
5 वर्षांपूर्वी -
मुख्यमंत्री तेल लावल्यावर कसे दिसता जरा कळू द्या; तेल लावलेला फोटो प्रसिद्ध करावा: जयंत पाटील
तेल लावलेला पैलवान विषयावरून राष्ट्र्वादीने आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जोरदार खिल्ली उडविण्यास सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विरोधक कमजोर दिसत असल्याने निवडणूक एकतर्फी होणार असं वाटू लागल्याने ते सभांमध्ये वारंवार त्याचा उल्लेख करत आहेत. युतीशी सामना करण्यासाठी तुल्यबळ विरोधकच शिल्लक न राहिल्याने निवडणूक एकतर्फी होणार आणि आमच्या विरुद्ध तूल्यबळ विरोधक म्हणजे पैलवानंच नसल्याचं मुख्यमंत्री टोला लगावत आहेत.
5 वर्षांपूर्वी -
सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत उदयनराजे 2 लाख मतांनी पराभूत होणार: पृथ्वीराज चव्हाण
विधानसभा निवडणुकीसोबतच सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठीही मतदान पार पडणार आहे. भाजपाकडून निवडणूक लढविणारे छत्रपती उदयनराजे भोसले पोटनिवडणुकीत 2 लाख मतांनी पराभूत होणार असा दावा काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. मोदी-शहा कोणीही आले तरी उदयनराजेंचा पराभव निश्चित आहे असा टोला पृथ्वीराज चव्हाणांनी लगावला आहे.
5 वर्षांपूर्वी -
१० रु. थाळी मग राज्य विचारतं आहे, झुणका भाकर आणि शिववड्याचं काय झालं? अमोल कोल्हे
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून लोकांना १० रुपयात सकस जेवण देऊ असं वचननाम्यात जाहीर करण्यात आलं आहे. त्यावरुन विरोधकांनी शिवसेनेवर टीका सुरु केली आहे. १० रुपये थाळी देणार असं शिवसेना म्हणते मग १२ कोटी महाराष्ट्राचं विचारतो, झुणका भाकरचं काय झालं? शिववडा त्याचं काय झालं? तरीही म्हणत असतील तर गेल्या 5 वर्षात तुम्ही काय केलं? याची उत्तर द्या असं राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवसेनेला सांगितलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
राज्य चालवायला दिलंय की स्वयंपाकाला; पवारांचा उद्धव ठाकरेंना टोला
राज्यात सत्ता आल्यावर अवघ्या दहा रुपयांमध्ये भरपेट जेवण देऊ, अशी घोषणा करणाऱ्या शिवसेनेला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी टोला लगावला आहे. तुम्हाला राज्य चालवायला दिलंय की स्वयंपाक करायला, असा खोचक सवाल त्यांनी विचारला. ते शनिवारी बार्शी येथील प्रचारसभेत बोलत होते.
5 वर्षांपूर्वी -
बेरोजगारांना संधी कशी देता येईल याच्यासाठी शिवसेना काम करत आहे: उद्धव ठाकरे
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष आता थकले असून भविष्यात दोन्ही पक्ष एकाच व्यासपीठावर दिसतील, अशी भविष्यवाणी सुशीलकुमार शिंदे यांनी केली होती. त्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जोरदार टोला लगावला आहे. ‘शिंदे म्हणाले की दोन्ही काँग्रेस पक्ष थकले आहेत, कदाचित खाऊन-खाऊन थकले असतील, अशी मिश्किल टिप्पणी उद्धव ठाकरे यांनी केली. संगमनेरमध्ये भाजप-शिवसेनेच्या प्रचारसभेत ते बोलत होते.
5 वर्षांपूर्वी -
शेतकऱ्यांनो, भाजपला दारात सुद्धा उभं करू नका: शरद पवारांचं आवाहन
भाजप सरकारला शेतीबाबत आस्था नाही. यांच्या राज्यात १६ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. शेतकऱ्यांना दोन पैसे मिळण्याची वेळ आली की यांनी कांदा निर्यातबंदी करून टाकली. या सरकारनं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान केलंय. त्यांना मतदानासाठी दारातही उभे करू नका,’ असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज शेतकऱ्यांना केलं.
5 वर्षांपूर्वी -
पिंपरी: राज यांच्या सभेकडे प्रसार माध्यमं केंद्रित होण्याच्या चिंतेने उद्धव यांची सभा रद्द?
निवडणूक आली की नेत्यांची जाहीर सभांमधूनच जुगलबंदी सुरू होती. त्यात जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आमने सामने आल्यानंतर ही जुगलबंदी टोकाला पोहचते. विधानसभा निवडणुकीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुण्यात पहिली जाहीर सभा घेणार आहेत. त्याचवेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव हे पिंपरी चिंचवडमध्ये शिवसैनिकांना संबोधित करणार होते.
5 वर्षांपूर्वी -
गोपीचंद पडळकर ढाण्या वाघ; बारामतीतून निवडणूक लढवावी: देवेंद्र फडणवीस
भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून गोपीचंद पडळकर हे बारामती विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे अजित पवार यांच्या विरोधात लढणार असल्याचे जवळजवळ स्पष्ट झाले आहे. पडळकर यांनी बारामतून लढावे, याबाबत लवकर पक्षश्रेष्ठींशी बोलून निर्णय जाहीर करू, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले आहे. गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यांचे स्वागत केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली. यावेळी काँग्रेसचे आमदार काशिराम पावरा आणि शिरपूर काग्रेसचे अध्यक्ष प्रभाकर चव्हाण यांनीही भाजपत प्रवेश केला.
5 वर्षांपूर्वी -
भाजपकडून वंचित पक्ष फोडण्यास सुरुवात; गोपीचंद पडळकर भाजपात जाणार
गोपीचंद पडळकर यांनी भाजप प्रवेश करण्याचा निर्णय़ घेतला असून येत्या दोन दिवसांत ते भाजपमध्ये जाणार आहेत. प्रत्येक निवडणुकीत त्यांच्या नावाबद्दल विविध तर्क लढविण्यात येतात. मात्र विधानसभा निवडणूक तोंडावर आलेली असताना पडळकर काय करणार याबद्दल उत्सुकता होती. तो निर्णय़ त्यांनी आता घेतला आहे. सांगली जिल्ह्यातील खानापूर मतदारसंघातून ते निवडणूक लढविणार आहेत.
5 वर्षांपूर्वी -
सातारा लोकसभा पोटनिवडणुक विधानसभेसोबत अचानक जाहीर झाल्याने चर्चा रंगली
देशातील अनेक ठिकाणी पोटनिवडणुका होणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. परंतु सातारा लोकसभा पोटनिवडणुकीची घोषणा मात्र केली नव्हती. सातारा लोकसभा पोटनिवडणुकीची तारीख जाहीर झाली आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांसोबतच ही पोटनिवडणूक होणार आहे. त्यामुळे या जागेसाठीही २१ ऑक्टोबरला मतदान होईल आणि २४ ऑक्टोबरला मतमोजणी होईल.
5 वर्षांपूर्वी -
उदयनराजेंना धक्का! देशभरातील ६४ मतदारसंघात पोटनिवडणूक; साताऱ्याबाबत घोषणा नाही
महाराष्ट्र, हरयाणातील विधानसभा निवडणुकांसह देशभरातील ६४ मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे. यासाठीदेखील २१ ऑक्टोबर रोजी मतदान घेतले जाईल आणि २४ ऑक्टोबर रोजी मतदान होईल. भाजपात प्रवेश करताना उदयनराजे भोसले यांनी काही अटी ठेवल्याचं सांगण्यात येत होतं. त्यानुसार लोकसभेची पोटनिवडणूक ही विधानसभेसोबत घेण्यात यावी अशीही अट होती.
5 वर्षांपूर्वी -
तेव्हा महाराज स्वत:च्या स्वार्थासाठी दिल्लीला गेले नव्हते; इथे मात्र स्वतःच्या स्वार्थासाठी गेले
साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस आणि पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर हल्लाबोल सुरू केला आहे. एनसीपीने अन्याय केल्याचा पुर्नउच्चार उदयनराजे यांच्याकडून केला जात आहे. दरम्यान, भारतीय जनता पक्ष प्रवेशावरून शरद पवार यांनी उदयनराजे यांना इतिहासाचा दाखला देत आरसा दाखवला आहे. “महाराज स्वत:च्या स्वार्थासाठी दिल्लीश्वरांचे अधीन झाले नव्हते. महाराज औरंगजेबाच्या भेटीला गेले. त्यानंतरही खचून न जाता त्यांनी स्वत: हिंदवी स्वराज्य निर्माण केलं”, असे खडेबोल शरद पवार यांनी उदयनराजेंना सुनावले.
5 वर्षांपूर्वी -
'सातारचे राजे' असा उल्लेख करत शिवसेनेकडून उदयनराजेंची खिल्ली
उदयनराजे भोसले हे शिवरायांचे १३ वे वंशज आहेत म्हणून त्यांना समाजात मान आहे. त्यामुळे उदयनराजेंना जाळ्यात ओढल्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजाची मते पदरात पडतील असे भाजपचे गणित आहे, पण शिवराय हे फक्त एका जातीचे नव्हेत, तर सर्व जाती-धर्माच्या लोकांचे दैवत आहे. त्यामुळे शिवरायांचे तेरावे वंशज एका जातीच्या राजकारणाचे ‘मोहरे’ म्हणून राजकारणात वापरले जात असतील तर तो शिवरायांचा अपमान ठरेल,’ अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News