महत्वाच्या बातम्या
-
मोदींच्या हत्येचा कट रचल्याच्या बातम्या म्हणजे नवे सहानुभूती कार्ड : शरद पवार
मी जेव्हा एका सीआयडीच्या निवृत्त पोलिस अधिकाऱ्याशी बोललो तेव्हा त्यांनी माहिती दिली की, जेव्हा अशा प्रकारची धमकीची पत्रे येतात तेव्हा त्याची वाच्यता प्रसार माध्यमांमध्ये केली जात नाही. तर थेट सुरक्षा यंत्रणांना त्याची माहिती देऊन सतर्क केलं जातं असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले. त्यामुळे नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आलेली धमकीची पत्रं ही निव्वळ स्टंटबाजी आहे अशी थेट टीका त्यांनी पुण्यातील राष्ट्रवादीच्या हल्लाबोल यात्रेत केली.
7 वर्षांपूर्वी -
ओबीसींच्या आरक्षणासाठी मी शिवसेना सोडली, शिवसेना अडचणीत?
पुण्यातील राष्ट्रवादीच्या हल्लाबोल यात्रेत उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित करताना छगन भुजबळ यांनी भाषणा दरम्यान एक धक्का दायक खुलासा केला. भुजबळ म्हणाले की, ओबीसी आरक्षणासाठीच मी शिवसेना सोडली. परंतु भुजबळांचा हा दावा शिवसेनेला निवडणुकीच्या तोंडावर अडचणीत आणू शकतो अशी राजकीय चर्चा सुरु झाली आहे. कारण त्याचा दुसरा अर्थ शिवसेनेचा ओबीसी आरक्षणाला विरोध होता का अशी कुजबुज उपस्थितांमध्ये सुरु होती.
7 वर्षांपूर्वी -
बाहेर तर आलो आता खायचं काय? बघतो तर खात्यात १५ लाख जमा: भुजबळ
काल पुण्यात राष्ट्रवादीच्या हल्लाबोल यात्रेचा समारोप झाला. त्याला माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी हजेरी लावली होती. जामिनावर बाहेर आल्यानंतर त्यांनी आज पहिल्यांदाच हल्लाबोल यात्रेत कार्यकर्त्यांना संबोधीत केलं. मोदी सरकारच्या फसव्या घोषनांची भुजबळांनी चांगलीच खिल्ली उडविली.
7 वर्षांपूर्वी -
आज राष्ट्रवादीच्याच व्यासपीठावर भुजबळांची तोफ धडाडणार
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री छगन भुजबळ जवळजवळ दोन वर्षानंतर जामिनावर बाहेर आल्यावर ते नक्की काय भूमिका घेणार किंव्हा राष्ट्रवादीतच राहणार की दुसरा विचार करणार असे एक ना अनेक राजकीय तर्क राजकीय विश्लेषक लढवत होते. त्या तर्कवितर्कांना अखेर स्वतः छगन भुजबळ यांनीच उत्तर दिल आहे.
7 वर्षांपूर्वी -
रावतेंवर प्रवाशी आणि एसटी कर्मचारी दोघेही नाराज
परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी एकबाजूनेच विचार करून जाहीर केलेली पगारवाढ एसटी संघटनांना मान्य नाही. तसेच एसटीच्या वर्धापन दिनाचा मुहूर्त साधत परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी एसटी कर्मचाऱ्यांना वेतनवाढ घोषित केली. परंतु ज्या कर्मचाऱ्यांना ही वेतनवाढ मान्य नसेल त्यांनी एसटी महामंडळाकडे ९ जूनपर्यंत लेखी स्वरूपात अर्ज करावा आणि कहर म्हणजे हे अर्ज स्वीकारताना संबंधित कर्मचाऱ्यांचे चित्रीकरण करण्यात येणार असल्याने सर्व एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांमध्ये परिवहनमंत्री दिवाकर रावते याच्या विरोधात एक खदखद आहे.
7 वर्षांपूर्वी -
भीमा-कोरेगाव प्रकरणी धरपकड सुरू
एल्गार परिषदेचे आयोजक सुधीर ढवळे यांना पुण्यातील भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणी अटक करण्यात आली आहे तसेच त्यांच्या सोबत इतर ३ जणांना सुद्धा अटक झाली आहे. सुधीर ढवळे यांना सकाळी ६ च्या सुमारास पुण्यातील विश्रामबाग पोलिसांनी त्यांच्या राहत्या घरून अटक केली आहे.
7 वर्षांपूर्वी -
सुप्रिया सुळेंच पाशा पटेल व प्रकाश आंबेडकरांना चोख प्रतिउत्तर
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आरोप केल्याशिवाय काही जणांना प्रसिद्धी मिळत नाही अशा तिखट शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रकाश आंबेडकर आणि पाशा पटेल यांच्यावर निशाणा साधला आहे.
7 वर्षांपूर्वी -
सर्व विरोधकांना एकत्र आणण्यास आवडेल: शरद पवार
देशभरातील लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपला १० जागांपैकी तब्बल ९ जागांवर पराभव झाल्याने २०१९ मध्ये भाजपला पराभूत करण्यासाठी देशभरातील विरोधकांना एकत्र आणण्यास मला आवडेल अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे सर्वेसेवा शरद पवार यांनी दिली आहे.
7 वर्षांपूर्वी -
शेतकऱ्यांनी टोकाची भूमिका घ्यावी, या सरकारची नियत दिसत नाही
राज्यातलं सरकार शेतकऱ्यांना दिलेली आश्वासनं अजिबात पाळत नाही. एकूणच ह्यांची कार्यपद्धतीची पाहता सरकारची नियत दिसत नाही. त्यामुळे आता शेतकऱ्यांनी टोकाची भूमिका घ्यावी असं रोखठोक आवाहन माजी कृषिमंत्री आणि राष्ट्रवादीचे सर्वेसेवा शरद पवार यांनी शेतकऱ्यांना केलं आहे.
7 वर्षांपूर्वी -
हनीमुनच्या प्रवासातच तिने प्रियकराच्या मदतीने पतीला संपवलं
साताऱ्यात पती पत्नीच्या नात्याला काळिमा फासणारी एक घटना घडली आहे. कारण दीक्षा कांबळे हिने तिचा पती आनंद कांबळे याला हनीमूनसाठी महाबळेश्वरला जाताना प्रवासादरम्यान संपविण्याची योजना प्रियकरासोबत रचली आणि पती आनंद कांबळे यांची सुपारी देऊन हत्या घडवून आणली आहे.
7 वर्षांपूर्वी -
हे मंत्री दुपारचे झोपा काढतात, अजित पवारांची बापटांवर टीका
राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट आणि मंत्र्यांवर सडकून टीका केली. हे असले मंत्री या वयात काय बोलावे ते कळत नाही अशा आमदाराला येथून निवडून दिले आहे. हे मंत्री दुपारचे झोपा काढतात, अशी अप्रत्यक्ष बोचरी टीका अजित पवार यांनी पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्यावर कसबा विधानसभा मतदारसंघातीळ राष्ट्रवादीच्या मेळाव्यात केली.
7 वर्षांपूर्वी -
शेतकऱ्यांचा १ जूनला पुन्हा एल्गार, आंदोलनाची हाक
शेतकऱ्यांचा ज्वलंत मागण्यांसाठी राज्याभर पुन्हां एल्गार, येत्या १ जूनपासून राज्यात पुन्हा शेतकरी आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या ऐतिहासिक संपाला १ वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर ज्वलंत शेतकरी प्रश्नांसाठी पुन्हा आंदोलनाची हाक देण्यात आली आहे.
7 वर्षांपूर्वी -
सुप्रिया सुळेंचे तावडेंना आव्हान, मी काय खोटे बोलले ते सांगा?
राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी मागे आरोप केला होता की, राज्यातील शाळा बंद करण्याच्या धोरणाबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व खासदार सुप्रिया सुळे या खोटे बोलतात आहेत. त्यालाच अनुसरून खासदार सुप्रिया सुळेंनी शिक्षणमंत्री विनोद तावडेंना आव्हान दिल की,’शिक्षणमंत्र्यांनी आम्ही काय खोटे बोललो, हे स्पष्ट करावे’.
7 वर्षांपूर्वी -
सायकलस्वारी, सुप्रिया सुळे व नेदरलंडच्या उपपंतप्रधान स्काऊटेन
बारामतीमधील सायकल वाटप करण्यात आलं त्यावेळी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नेदरलंडच्या उपपंतप्रधानांसोबत बारामतीत सायकलवरुन रपेट मारली आणि ही सायकलस्वारी सर्वांच्याच चर्चेचा विषय बनली आहे.
7 वर्षांपूर्वी -
विधानसभा, गिरीश बापटांना मनसेच्या रूपाली पाटलांच आवाहन
मनसेच्या महिला आघाडी शहराध्यक्षा रूपाली पाटील-ठोंबरे यांना मनसेकडून कसबा विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीची तयारी करण्याच्या सूचना पक्षाकडून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे कसबा विधानसभा मतदारसंघातून त्या थेट भाजपच्या गिरीश बापटांना तसेच मनसेतून काँग्रेसमध्ये गेलेल्या रवींद्र धंगेकरांना आवाहन देतील.
7 वर्षांपूर्वी -
एनसीपीचे आमदार नरेंद्र पाटील सुद्धा भाजपच्या गळाला ?
आज निरंजन डावखरेंनी राष्ट्रवादीला सोडचिट्टी देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजप मध्ये प्रवेश केला आहे. परंतु लवकरच राष्ट्रवादीचे अजून एक विधानपरिषदेचे आमदार नरेंद्र पाटील भाजपच्या गळाला लागण्याची शक्यता आहे. आज निरंजन डावखरे यांना भाजप कार्यालयापर्यंत सोडण्यासाठी चक्क एनसीपीचे आमदार तसेच माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील आले होते.
7 वर्षांपूर्वी -
पत्नी व आईची काळजी नसलेल्यांना महिलांच्या समस्या काय समजणार
देशभरात महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढतच आहेत. त्या विरोधात स्वतः महिलांनी एकत्र येऊन रान उठविण्याची गरज आहे. सरकारची सुद्धा तशी जवाबदारी असते, परंतु स्वतःच्या पत्नी व आईची काळजी नसलेल्या पंतप्रधानांना स्त्री वर्गाच्या समस्या आणि व्यथा काय समजणार अशी खरमरीत टीका काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी केली आहे.
7 वर्षांपूर्वी -
तर शिवसेनेच्या भविष्यात अडचणी वाढतील
२०१९ मधील निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींना डॉ. मनमोहन सिंग हेच टक्कर देऊ शकतात. कारण राहुल गांधी यांना अजून बरंच राजकीय शिक्षण घेण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे राहुल गांधी गांधी हे मोदींना टक्कर देऊ शकणार नाहीत असं परखड मत व्यक्त केलं आहे भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी. तर दुसरीकडे शिवसेनेने जर निर्णय वेळीच घेतला नाही तर त्यांच्यासमोर भविष्यात अडचणी वाढण्याची शक्यता आहेत असं प्रकाश आंबेडकर यांनी प्रसार माध्यमांना सांगितलं.
7 वर्षांपूर्वी -
सोलापूर महापालिकेत मलईदार पदांसाठी सेना-भाजपचं मिलन
सोलापूर महानगरपालिकेत भाजप आणि शिवसेनेचे एकमेकांशी जरा सुद्धा पटत नसताना ते महापालिकेच्या ७ विषय समिती सभापती निवडणुकीसाठी व मलईदार पदांसाठी एकत्र आले व आपसातील रुसवे फुगवे बाजूला ठेवले. विशेष म्हणजे विरोधकांना अंधारात ठेवून शिवसेनेचं आणि भाजपचं मनोमिलन झालं आहे.
7 वर्षांपूर्वी -
शरद पवारच २०१९ मध्ये देशाचे चित्र पालटवू शकतात
देशात लवकरच येऊ घातलेल्या २०१९ मधील लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांनी सर्व विरोधी पक्षांचे नैतृत्व केल्यास मला नक्कीच आनंद होईल. तसेच शरद पवार हेच २०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीत देशाचे राजकीय चित्र पालटवू शकतात असं विश्वास माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केला आहे.
7 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
- SBI Salary Account | पगारदारांनो, SBI बँकेत सॅलरी अकाउंट ओपन करा, फ्री इन्शुरन्ससहित मिळतील अनेक फायदे
- Post Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेतून मिळेल मजबूत परतावा, फक्त व्याजाचे 56,803 रुपये मिळतील, फायदा घ्या
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर फोकसमध्ये, स्टॉक मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: HAL