महत्वाच्या बातम्या
-
भाजपाला इंदापूरात जोरदार धक्का | हर्षवर्धन पाटलांचे चुलत बंधू प्रशांत पाटील यांचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश
राज्याचे माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांचे सख्खे चुलत बंधू व इंदापूर पंचायत समितीचे माजी सभापती प्रशांत पाटील यांनी भारतीय जनता पार्टीला रामराम करत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पक्षात जाहीर प्रवेश केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
पुन्हा अर्वाच्च भाषेत शिवीगाळ | शिवद्रोही श्रीपाद छिंदम याच्यासह ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
अहमदनगर मध्ये एका टपरी धारकाला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून दमदाटी करत, तसेच जातीवाचक शिव्या दिल्याप्रकरणी शिवद्रोही श्रीपाद छिंदम याच्यासह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये अट्रोसिटीसह विविध कलमाअंतर्गत आज गुन्हा दाखल करण्यात आला असून, या घटनेमुळे वादग्रस्त छिंदम पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. दरम्यान या प्रकरणी भागीरथ भानुदास बोडखे यांनी फिर्याद दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
Job Alert | अहमदनगर अंगणवाडीत विविध पदांची भरती | महिलांना संधी
अहमदनगर अंगणवाडी भरती २०२१. एकात्मिक बालविकास सेवा कार्यालय पंचायत समिती संगमनेर, जि अहमदनगर यांनी भरती अधिसूचना प्रकाशित केली असून 33 अंगणवाडी कामगार आणि मदतनीस पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र व इच्छुक उमेदवार 07 ते 16 जुलै 2021 पर्यंत अहमदनगर अंगणवाडी भरती 2021 वर अर्ज दाखल करु शकतात.
4 वर्षांपूर्वी -
पेट्रोल महागले तर काय झाले, सुविधा मिळाल्या | लस मोफत मिळत आहे - सुजय विखे पाटील
देशात एकीकडे पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किंमतीवरुन सामान्य जनेतला आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. तर दुसरीकडे या दरवाढीचा भाजपचे खासदार सुजय विखे पाटील यांनी अप्रत्यक्षपणे समर्थन केले आहे. पेट्रोल डीझेल महागले तर काय झाले, त्याबदल्यात मोफत सुविधा आणि लस मिळत आहे. त्यामुळे इंधन दरवाढीविरोधात आंदोलनाचे फलक लावताना पंतप्रधान मोदी यांनी लस मोफत दिली त्याचादेखील फलक झळकवा. असा अजब युक्तीवाद भाजपचे खासदार सुजय विखे पाटील यांनी केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
कोरोना संकटात ६ महिने बिळात लपून बसणाऱ्यावर काय बोलायचं? | लंकेंचा विजय औटींना टोला
शिवसेनेचे माजी आमदार विजय औटी आणि राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांच्यावाद पुन्हा उफाळून येण्याची शक्यता आहे. विजय औटींच्या टीकेला निलेश लंके यांनी सडेतोड प्रतिउत्तर दिल्याने विजय औटींचा पुन्हा त्रागा होण्याची शक्यता आहे. मी बाप नव्हे तर जनतेचा सेवक आहे.समाजकारणात, राजकारणात आल्यापासून मी माझे जीवन जनतेसाठी अर्पण केले आहे.ज्या दिवशी मी स्वतःला आमदार समजेल त्यावेळी माझी जनतेसोबत असलेली नाळ तुटेल असे खणखणीत प्रतीउत्तर आमदार नीलेश लंके यांनी माजी आमदार विजय औटी यांना दिले.
4 वर्षांपूर्वी -
राज्यातील माध्यमांनी केंद्रीय सहकार खात्यामुळे इथल्या सहकार चळवळीवर परिणाम होईल असे भासवले - शरद पवार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार केला आहे. यावेळी नव्याने सहकार खातेही तयार करण्यात आले आहे. अमित शहा यांच्याकडे सहकार खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. वेगळे खाते निर्माण केल्यामुळे राज्यातील सहकार क्षेत्रातील प्रकरणे बाहेर काढले जातील अशा चर्चा होत्या. आता यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य केले आहे.
4 वर्षांपूर्वी -
नगरमध्ये देखील मुंडे समर्थक पदाधिकाऱ्यांचे राजीनामे | पर्यायी वंजारी नेते मोठे केले जातं असल्याचा आरोप
भारतीय जनता पक्षाच्या खासदार प्रीतम मुंडे यांना मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात जागा न मिळाल्यानं मुंडे समर्थक चांगलेच नाराज असल्याचं स्पष्ट झालंय. बीडमध्ये अनेक मुंडे समर्थकांनी भाजपच्या पदाचा राजीनामा देत आपली उघड नाराजी व्यक्त केलीय. यानंतर कुठलीही नाराजी नसल्याचा दावा करणाऱ्या भाजप नेत्यांनी आता या राजीनामा देणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर टीका करण्यास सुरुवात केलीय. विशेष म्हणजे राजीनामे देणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर थेट निष्ठावान नसल्याचे ठपके मारण्यास सुरुवात झाल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे वाद अजून पेटणार असल्याचं दिसतंय.
4 वर्षांपूर्वी -
विजय औटींना महिला सरपंचानी झापले | आमदार निलेश लंकेविरोधातील टिकेवरून जोरदार निशाणा
संकटाचा सामना करायचा का संकटाला भिऊन घरात बसायचं ? म्हणजे चुकीचं वागा असा याचा अर्थ नाही. मुख्यमंत्री पदोपदी सांगतात मास्क वापरा, हात धुवा, सामाजिक अंतर पाळा. मुख्यमंत्र्यांच्या सुचना पाळायला का अडचण आहे आपल्याला ? नाही ? ‘त्यांच्यातच जाउन झोपन !’ कोणत्याही गोष्टीला एक सिमा असावी. माणसाने वागावं कसं ? तुम्ही अधिक कडक केले असते, प्रशासनाच्या मागे अधिक मजबुतपणे उभे राहिले असता तर काही जिव नक्कीच वाचले असते. मी तपशिलात जाणार नाही. त्यासाठी योग्य वेळ येऊ द्या. मी आमदार असतो तर ५० टक्के जिव नक्कीच वाचविले असते असा दावा करीत विधानसभेचे माजी उपाध्यक्ष मा. आ. विजय औटी यांनी आमदार नीलेश लंके यांच्यावर पुन्हा निशाणा साधला.
4 वर्षांपूर्वी -
मी आमदार असतो तर ५० टक्के जिव नक्कीच वाचविले असते | विजय औटींचा निलेश लंकेवर निशाणा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पदोपदी सांगतात मास्क वापरा, हात धुवा, सामाजिक अंतर पाळा. मुख्यमंत्र्यांच्या सुचना पाळायला का अडचण आहे आपल्याला ? नाही ? प्रशासनाच्या मागे अधिक मजबुतपणे उभे राहिले असता तर काही जिव नक्कीच वाचले असते.
4 वर्षांपूर्वी -
'राजेंचा' केवळ राजकीय वापर? | संभाजीराजेंना भेट मिळत नाहीत, तर उदयनराजेंना मंत्रिमंडळात स्थानच नाही
केंद्रीय मंत्रिमंडळाची नावं अखेरीस जाहीर झाले आहेत. मोदी सरकारच्या बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळ विस्ताराचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. आज (७ जुलै) संध्याकाळी ६ वाजता नव्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. दरम्यान, मंत्रिमंडळात सहभागी होणाऱ्यांमध्ये ज्या नेत्यांच्या नावाची चर्चा आहे. सगळ्यात जास्त चर्चेचा विषय ठरला आहे तोच म्हणजे नारायण राणे यांचा फोटो.
4 वर्षांपूर्वी -
मराठा आरक्षण | सुप्रीम कोर्टाकडून भूमिका स्पष्ट तरी भाजप नेते केंद्राची जवाबदारी झटकून राज्याला इशारे देण्यात व्यस्त
आता मराठा आक्रोश मोर्चा काढताना तारीख देणार नाही, थेट अॅटॅक करू, असा इशारा देतानाच मराठा समाजाला आरक्षण द्या. त्यांना नक्षलवादी होऊ देऊ नका, असं आवाहन मराठा आक्रोश मोर्चाचे आयोजक नरेंद्र पाटील यांनी सरकारला केलं. धक्कादायक म्हणजे यापूर्वी विनायक मेटे यांनी देखील खात्री न पटलेल्या नक्षलींच्या त्या पत्रावरून समर्थन करत राज्य सरकारला इशारा दिला होता आणि आज नरेन्द्र पाटील यांनी त्याचीच पुनरावृत्ती केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
मराठा आरक्षण रस्त्यावर उतरून नव्हे तर राष्ट्रपतींच्या सहमतीनेच मिळणार - छत्रपती संभाजी
भाजपचे आशिष शेलार यांनी सर्वोच्च न्यायालयाने केंद्राची पुर्नविचार याचिका फेटाळली असली तरी राज्य सरकारचे अधिकार अबाधित असल्याविषयी केलेल्या वक्तव्यावर बोलताना त्यांनी हे मत मांडले. आशिष शेलार वकील असतील मात्र मला 102 व्या घटना दुरुस्ती वरून न्यायालयाने दिलेल्या निर्णयाबाबत जेवढे समजते, त्यावरून मराठा आरक्षण हा विषय आता रस्त्यावरील नसून न्यायालयातील आहे असे संभाजीराजे यांनी सांगितले. यासाठी दोनच मार्ग आपल्या समोर आहेत.
4 वर्षांपूर्वी -
राजू शेट्टींनी ४३ कारखान्यांसंदर्भात ईडी'कडे फेऱ्या मारलेल्या | ED'ने केवळ जरंडेश्वर साखर कारखाना निवडला?
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याशी संबंधित प्रकरणात मनी लाँडरिंगविरोधी कायद्यान्वये अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) गुरुवारी जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना जप्त केला. हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मामा राजेंद्र घाडगे यांच्या ताब्यात होता. अजित पवार यांच्यासह पत्नी सुनेत्रा पवार यांचाही या प्रकरणात संबंध असल्याचा दावा ईडीने केला आहे. या प्रकरणी उप-मुख्यमंत्री अजित पवार यांची चौकशी केली जाऊ शकते.
4 वर्षांपूर्वी -
ED'ला कोणीतरी सांगतोय, अमूक-अमूक माणूस त्रासदायक ठरतोय | त्याचा काटा काढायचाय - राजू शेट्टी
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याशी संबंधित प्रकरणात मनी लाँडरिंगविरोधी कायद्यान्वये अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) गुरुवारी जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना जप्त केला. हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मामा राजेंद्र घाडगे यांच्या ताब्यात होता. अजित पवार यांच्यासह पत्नी सुनेत्रा पवार यांचाही या प्रकरणात संबंध असल्याचा दावा ईडीने केला आहे. या प्रकरणी उप-मुख्यमंत्री अजित पवार यांची चौकशी केली जाऊ शकते अशा बातम्या प्रसिद्ध होऊ लागल्या आहेत.
4 वर्षांपूर्वी -
मराठा आरक्षण | SCBC करण्याचा राज्याला अधिकार नाही हे स्पष्ट | आता केंद्राने वटहुकूम काढून घटनादुरुस्ती करावी
मराठा आरक्षणाबाबत सर्वाेच्च न्यायालयाने मे महिन्यात सुनावलेल्या निकालात १०२ व्या घटनादुरुस्तीच्या व्याख्येला आव्हान देणारी केंद्र सरकारची पुनर्विचार याचिका फेटाळली आहे. ५ न्यायमूर्तींच्या घटनापीठाने गुरुवारी म्हटले की, “केंद्राच्या याचिकेवर विचार करण्यासाठी कोणताही पुरेसा आधार नाही. त्यातील उपस्थिती मुद्द्यांवर मुख्य निकालात घटनापीठाने विचार केला होता. याचिकेत दिलेल्या विविध आधारांचा मुख्य निकालातच निपटारा करण्यात आला आहे.’
4 वर्षांपूर्वी -
मराठा आरक्षण | केंद्रात काय करायचं ते मी बघतो, अशी गर्जना करणाऱ्या उदयनराजेंवर दबाव वाढण्याची शक्यता?
मराठा आरक्षणाबाबत सर्वाेच्च न्यायालयाने मे महिन्यात सुनावलेल्या निकालात १०२ व्या घटनादुरुस्तीच्या व्याख्येला आव्हान देणारी केंद्र सरकारची पुनर्विचार याचिका फेटाळली आहे. ५ न्यायमूर्तींच्या घटनापीठाने गुरुवारी म्हटले की, “केंद्राच्या याचिकेवर विचार करण्यासाठी कोणताही पुरेसा आधार नाही. त्यातील उपस्थिती मुद्द्यांवर मुख्य निकालात घटनापीठाने विचार केला होता. याचिकेत दिलेल्या विविध आधारांचा मुख्य निकालातच निपटारा करण्यात आला आहे.’
4 वर्षांपूर्वी -
पवारांवर टीका करण्यासाठीच पडळकरांना आमदारकी | त्यांच्या टीकेचा दर्जा उत्तर देण्यासारखाही नसतो - रोहित पवार
भारतीय जनता पक्षाचे विधान परिषदेतील आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधलाय. पडळकरांच्या या टीकेला आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. पडळकर यांनी जे वक्तव्य केलंय ते कोणत्याही महिलेला विचाराल तर सांगतील की चुकीची गोष्ट आहे.
4 वर्षांपूर्वी -
राष्ट्रवादीच्या सोलापुरातील कार्यालयावर दगडफेक | हल्लेखोरांमध्ये काचा फुटतील एवढाही जोर नव्हता?
भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कारवर दगडफेक झाली होती. त्याच्या निषेधार्थ गुरुवारी (1 जुलै) दुपारी दोन युवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस भवनवर दगडफेक केली आहे. दोन्ही युवक दगडफेक करून स्वतः फौजदार चावडी पोलीस ठाणे येथे हजर झाले. रामलाल चौक (सोलापूर) येथील राष्ट्रवादीच्या मुख्य कार्यालयावर ही दगडफेक करण्यात आली आहे. शरनू हांडे आणि सोमनाथ घोडके अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
4 वर्षांपूर्वी -
आषाढी वारी झाल्यावर जगातील कोरोना नामशेष होईल | संभाजी भिडेंचं पुन्हा वादग्रस्त विधान
महाराष्ट्रात कोरोना रुग्ण संख्या कमी जास्त होताना दिसत आहे. याच कोरोनावर काही दिवसांपूर्वी संभाजी भिडे यांनी एक वादग्रस्त विधान केलं होतं. आता पुन्हा एकदा त्यांनी एक विधान केलं आहे. पंढरपूरची आषाढी वारी झाल्यावर देशातील नव्हतेतर जगातील कोरोना आटोक्यात नाहीतर नामशेष होईल. संतांच्या परंपरा जपल्याने सगळी काही विघ्नं नाहीशी होतात. त्यामुळे पायी वारी करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांनी जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांच्याकडे केली.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO | गोपीचंद पडळकरांच्या गाडीवर दगडफेक करणारा कॅमेऱ्यात कैद
सोलापुरात घोंगडी बैठकीला आल्यानंतर भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर दगड फेकण्यात आला. यात गाडीच्या काचेचे नुकसान झाले असून, पोलीस अज्ञात व्यक्तीचा तपास करीत आहेत. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून दगडफेक करणारा युवक कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO
-
Post Office Scheme | मुद्दलापेक्षा जास्त व्याज मिळणार या पोस्ट ऑफिस योजनेत, 20 लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळेल
-
RVNL Share Price | मल्टिबॅगर PSU आरव्हीएनएल कंपनीबाबत अपडेट, स्टॉक प्राईस फुल स्पीड पकडणार – Nifty 50
-
IRFC Share Price | अर्थसंकल्पानंतर रेल्वे शेअर गुंतवणूकदारांची चिंता वाढली, स्टॉक BUY, SELL की Hold करावा – Nifty 50