महत्वाच्या बातम्या
-
संबंधित तरुणी आणि मेहबूब यांचा वर्षभर संपर्कच नाही | पोलिसांची माहिती | राष्ट्रवादी आक्रमक
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांच्यावर नाहक आरोप करण्यात आले असून स्वतः महेबूब शेख यांनी नार्को टेस्ट करण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे. परंतु भारतीय जनता पक्ष राजकीय फायदा उठवण्यासाठी षडयंत्र करत आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राज्य प्रवक्ते महेश तपासे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
ग्रामपंचायत रणधुमाळी | आ. रोहित पवार आणि राम शिंदे पुन्हा आमनेसामने
राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. कर्जत-जामखेड मतदार संघातही ग्रामपंचायत निवडणुकांचा प्रचार सध्या जोरात सुरू झाला आहे. ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यासाठी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी 30 लाखांचे बक्षीस जाहीर केलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
भाजप नेते विखे पाटलांच्या हॉस्पिटल लॅबमधून कोरोनाचा खोटा अहवाल | गुन्हा दाखल
कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा खोटा अहवाल दिल्याप्रकरणी विळदघाट येथील पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील मेमोरिअल हॉस्पिटलमधील क्रस्ना डिग्नोस्टिकस प्रा. लि लॅबचे प्रभारी अधिकारी, लॅब टेक्निशिन यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार १३ ऑगस्ट २०२० ते ११ नोव्हेंबर २०२० या काळात घडला आहे.
4 वर्षांपूर्वी -
मोदीजी, लौटा दो हमारे बुरे दिन | महिला महागाईला कंटाळल्या
मागील दोन महिन्यांपासून वारंवार सुरू असलेल्या गॅस दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसची महिला आघाडी आक्रमक झाली आहे. दरवाढीच्या निषेधार्थ सांगली येथे महिला आघाडीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आले.
4 वर्षांपूर्वी -
जलयुक्त शिवार फसवी योजना | जादा पाण्याचा दावा खोटा | निकृष्ट दर्जाची कामं
फडणवीस सरकारच्या काळात अनेक योजनांमध्ये गैरव्यवहार झाल्याची शंका महाविकास आघाडी सरकारला आहे. त्यातील एक महत्वाची योजना म्हणजे जलयुक्त शिवार योजना म्हणावी लागेल आणि विशेष म्हणजे यावर कॅगच्या रिपोर्टमध्ये देखील अनेक नकारात्मक टिपण्या करण्यात आल्या आहेत.
4 वर्षांपूर्वी -
उध्वस्त झालेल्या कुटुंबाचं दुख: दिसत नाही | पण भाजपाची तळी उचलणाऱ्या संपादकांचं दुख दिसतं
Republic TV’चे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना काल मुंबईत त्यांच्या राहत्या घरी झालेल्या अटकेरून ठाकरे सरकारवर आणीबाणी लादल्याचे आणि हुकूमशाहीचे आरोप विरोधकांकडून करण्यात आला. ‘अर्णब गोस्वामी यांस २०१८ मधील एका अत्यंत खासगी प्रकरणात अटक झाली आहे. अर्णब गोस्वामी यांच्या अटकेचा भारतीय जनता पक्षाने तीव्र निषेध केला आहे. तसेच समाज माध्यमांच्या माध्यमातून देखील यावेळी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केल्याचं पाहायला मिळालं आहे.
4 वर्षांपूर्वी -
नगरमधील भाजपचे अनेक नेते लवकरच राष्ट्रवादीत | राष्ट्रवादीचा पक्षविस्तार
एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशानंतर उत्तर महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाला धक्के बसण्यास सुरुवात झाली आहे. मुक्ताईनगमध्ये अनेक भाजप पदाधिकारी राष्ट्र्वादीत प्रवेश करत असल्याने भाजपाची डोकेदुखी वाढू लागली आहे. मात्र दुसऱ्या बाजूला राष्ट्र्वादीने पक्ष विस्तार मोठ्या प्रमाणावर वाढविण्यास सुरुवात केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
मराठा आरक्षणाबाबत खंबीर | राज्य सरकारला गंभीर केल्याशिवाय राहणार नाही - उदयनराजे
काल (२७ ऑक्टोबर) सर्वोच्च न्यायालयात राज्यातील महत्वाचा प्रश्न असलेल्या मराठा आरक्षण स्थगितीवरील सुनावणी पुढे ढकलल्यानंतर विरोधकांकडून राज्य सरकारवर टीकेची झोड उठली आहे. यावरून खासदार उदयनराजे भोसले यांनी देखील सरकारवर टीका करत इशारा दिला आहे. फेसबुक पोस्टद्वारे इशारा देत खासदार उदयनराजेंनी म्हटलं आहे की, आरक्षणाबाबत खंबीर मराठा राज्य सरकारला गंभीर केल्याशिवाय राहणार नाही. मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी दरम्यान, महाराष्ट्र सरकारचा वकील उपस्थित नसल्याने न्यायालयाने ही सुनावणी काही काळासाठी तहकूब केली होती. त्यानंतर पुन्हा सुनावणी झाल्यावर, कोर्टाने ही सुनावणी 4 आठवडे पुढे ढकलली. मात्र गेले दोन आठवडे या सुनावणीबाबतची माहिती असतानासुद्धा सरकारने जाणीवपूर्वक तयारी केली नाही, असा आरोपही त्यांनी केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
खासदार, आमदारांच्या २ वर्षांच्या निधीवरून उदयनराजेंचा केंद्र आणि राज्य सरकारला सवाल
राज्यातील कोरोना परिस्थितीवरुन खासदार उदयनराजे (BJP MP Udayanraje Bhonsale) यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. खासदार, आमदारांचे दोन वर्षांचे निधी (MP and MLA Two Years Fund) तुमच्याकडे घोटवून घेतले? त्याचं केंद्र, राज्याने काय केले ते कुठे गेले? गोर गरिबांना सुख-सुविधा मिळत नाहीत, याचं उत्तर केंद्र आणि राज्य शासनाने दिलेच पाहिजे, असा थेट सवाल उदयनराजे यांनी विचारला आहे. कोरोना परिस्थितीमुळे साताऱ्यातील दसरा उत्सव साध्यापणाने साजरा करण्यात आला. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना उदयनराजे यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
वंचित बहुजन आघाडीचं पंढरपुरात मंदिरं खुली करण्यासाठी शांततेत आंदोलन
मंदिरं खुली करण्यासाठी आज विश्व वारकरी सेवा आणि वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आज पंढरपुरात आंदोलन करणार आहे. कार्यकर्त्यांनी आज सकाळी सोलापुरातील विठ्ठल मंदिर उघडलं. तर आंदोलनासाठी प्रकाश आंबेडकर सोलापूरहून पंढरपूरला रवाना झाले आहेत. त्यांच्यासोबत चार गाड्यांचा ताफा असून त्यात कार्यकर्ते आहेत. आंदोलनाच्या सुरुवातीला चंद्रभागा स्नान होईल, त्यांनंतर पुंडलिक दर्शन करुन प्रकाश आंबेडकर हे विठ्ठल मंदिरात प्रवेश करतील. या आंदोलनला 200 पेक्षा जास्त संघटनाचा पाठिंबा असल्याची माहिती देखील वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते आनंद चंदनशिवे यांनी दिली.
4 वर्षांपूर्वी -
कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाल्याने सांगलीत पुराचा धोका
जिल्ह्यात दमदार पाऊस पडत आहे. कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. सांगली जवळ कृष्णा नदीची पाणीपातळी २० फूट इतकी झाली आहे. त्यामुळे सांगलीत पुराचा धोका कायम आहे. दरम्यान, मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे वारणा धरण ८१ टक्के भरले आहे.
5 वर्षांपूर्वी -
जुन्ररमधील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक दिनेश दुबे यांचं कोरोनामुळे निधन
पुण्यात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाबाधितांची संख्याही दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्याचसोबत पुण्यात अनेक लोकप्रतिनिधींनाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. जुन्नरमध्ये राष्ट्रवादीचे नगरसेवक दिनेश दुबे (58) यांनाही कोरोनाची लागण झाली होती. मात्र उपचारादरम्यान आज पहाटे त्यांचे खाजगी रुग्णालयात निधन झाले. दिनेश दुबे यांच्या निधनाने जुन्नर शहर व परिसरात मोठी शोककळा पसरली आहे.
5 वर्षांपूर्वी -
महाविकास आघाडीतील देवाणघेवाण, राष्ट्रवादी शिवसेनेला त्यांचे नगरसेवक परत देणार
तीन दिवसांपूर्वी चक्क शिवसेनेच्या ५ नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि महाविकास आघाडीत भूकंप झाला. पारनेरच्या शिवसेनेच्या नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला होता. नगरसेवक डॉ. मुद्दस्सीर सय्यद, नंदकुमार देशमुख, किसन गंधाडे, वैशाली औटी, नंदा देशमाने यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करून आमदार लंके यांचे नेतृत्व स्वीकारले होतं. याशिवाय शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनीही प्रवेश केला होता.
5 वर्षांपूर्वी -
महाविकास फोडाफोडी? शिवसेनेचे ५ नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
महाविकासआघाडीमध्ये सुरू असलेल्या कुरबुरींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचीकाल भेट घेतली होती. महाविकासआघाडीतल्या नाराजीबाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा काल पार पडली. लॉकडाऊनबाबत लोकांमध्ये नाराजी पसरल्याने आणि राज्य अधिकारीच चालवत असल्याच्या भावनेतून काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे मंत्री शिवसेनेवर नाराज असल्याने काल बैठका देखील पार पडल्या.
5 वर्षांपूर्वी -
कोणाच्या मनात सध्या काय चाललंय कसं ओळखावं, अजित पवारांची त्या भेटीवर प्रतिक्रिया
सातारा जावळीचे भाजपाचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. दरम्यान, शिवेंद्रराजे यांनी पवारांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत. मात्र, पवारांसोबत झालेल्या बैठकीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही, तर रखडलेल्या विकास कामांबाबत चर्चा झाल्याचे शिवेंद्रसिंहराजे यांनी सांगितले.
5 वर्षांपूर्वी -
बारामतीत डिपॉझिट जप्त झालं, सांगली लोकसभेतही त्यांचं काही झालं नाही - शरद पवार
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण चांगलंच ढवळून निघालं आहे. शरद पवार आज सातारा दौऱ्यावर आहेत. गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याकडे लक्ष द्यायची गरज नाही, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. तसेच शरद पवार यांनी सत्तास्थापनेसंदर्भातल्या दाव्यावर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे.
5 वर्षांपूर्वी -
बाळासाहेब थोरात भाजपात प्रवेश करणार होते, विखे पाटलांचा गौप्यस्फोट
सामना अग्रलेखात केलेल्या टीकेचा भाजपा नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी संजय राऊत यांचा आपल्या शैलीत समाचार घेतला आहे. थोरातांची कुरकुर नाहीच! विखेंची टुरटुर! या मथळ्याखाली सामनाच्या अग्रलेखात विखे पाटील यांच्यावर टीका करण्यात आली होती.
5 वर्षांपूर्वी -
छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या श्रीपाद छिंदमचं नगरसेवक पद रद्द
छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केल्याप्रकरणी भाजपचे माजी उपमहापौर आणि अपक्ष नगरसेवक श्रीपाद छिंदमला सरकारने मोठा दणका दिला आहे. सरकारकडून श्रीपाद छिंदम याचे नगरसेवक पद रद्द करण्यात आले आहे. महापुरुषांबद्दल अवमानकारक शब्द वापरल्या प्रकरणी त्याच्याविरोधात कारवाई करण्यात आली आहे.
5 वर्षांपूर्वी -
विखे पाटलांचं नवं संपर्क कार्यालय; ना भाजपचा झेंडा ना नेते
विरोधीपक्ष नेतेपद सोडून सत्ताधाऱ्यांच्या गोटात सहभागी झालेले राधाकृष्ण विखे पाटील पुन्हा एकदा ‘यू टर्न’ मारण्याच्या तयारीत दिसत आहेत. विखे पाटील आता भारतीय जनता पक्षाची साथ सोडून सत्ताधारी महाविकास आघाडीतील एखाद्या पक्षात प्रवेश करणार की काय, अशा चर्चा रंगल्या आहेत.
5 वर्षांपूर्वी -
आ. रोहित पवारांची आमदारकी रद्द करण्यासाठी न्यायालयात याचिका
भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माजी मंत्री राम शिंदे यांनी रोहित पवार यांच्या आमदारकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. राम शिंदे यांनी आमदार रोहित पवार यांची आमदारकी रद्द करावी, अशी मागणी करीत मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे. यानंतर खंडपीठाने आमदार रोहित पवार यांच्यासह आणखी १४ उमेदवारांना नोटीस पाठवली आहे.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
- SBI Salary Account | पगारदारांनो, SBI बँकेत सॅलरी अकाउंट ओपन करा, फ्री इन्शुरन्ससहित मिळतील अनेक फायदे
- Post Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेतून मिळेल मजबूत परतावा, फक्त व्याजाचे 56,803 रुपये मिळतील, फायदा घ्या
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Gold Rate Today | बापरे, आज सोन्याच्या भाव मजबूत महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS