महत्वाच्या बातम्या
-
अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार; १० जणांवर गुन्हा दाखल
हिंगणघाट जळीत प्रकरणाच्या धक्क्यातून महाराष्ट्र सावरला नसतानाच सोलापूर इथं एक भयंकर प्रकार समोर आला आहे. सोलापुरातील विजापूर नाका परिसरात एका अल्पवयीन कॉलेज तरुणीवर सामूहिक बलात्कार झाला आहे. या प्रकरणी दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून ५ संशयितांना अटक करण्यात आली आहे. इतरांचा शोध सुरू आहे.
5 वर्षांपूर्वी -
सांगली: राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी सभापतीची धारदार शस्त्राने हत्या
सांगली जिल्ह्यात राजकीय नेत्यांच्या खुनाचं सत्र सुरूच आहे. चार दिवसांपूर्वी झालेल्या एका हत्येचा उलगडा होत नाहीत तोच आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मनोहर पाटील यांची हत्या झाली आहे. त्यामुळं जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. मनोहर पाटील हे कवठेमहांकाळ पंचायत समितीचे माजी सभापती होते. देशींग इथं अज्ञात मारेकऱ्यांनी त्यांच्यावर धारदार शस्त्रानं हल्ला केला. त्यात त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतलं आहे. राजकीय वैमनस्यातून हा खून झाला असावा, असा पोलिसांचा कयास आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोल्हापूर: हाणामाऱ्या ऐकल्या आता विरोधक नगरसेवकाने घेतला सत्ताधारी नगरसेवकाचा मुका
राज्यभरात अनेक महापालिकांमधील सर्वसाधारण सभा या हाणामारी आणि बाचाबाचीने गाजल्याचं अनेकवेळा समोर आलं आहे. परंतु, तिकडे कोल्हापूर महानगरपालिकेची सभा आज वेगळ्याच कारणाने गाजली. महापालिकेत एका नगरसेवकाने दुसऱ्या नगरसेवकाची चक्क भर सभागृहात करकचून पप्पी घेतली. महापालिकेची सभा सुरु असताना भर सभागृहात विरोधीगटाच्या नगरसेवकाने सत्ताधारी काँग्रेसच्या गटनेत्याची पप्पी घेतल्याने सर्वजण अवाक् झाले.
5 वर्षांपूर्वी -
महाविकास आघाडीचं सरकार ५ वर्ष टिकेल: भाजप नेते एकनाथ खडसे
सरकार स्थापन करण्यासाठी पक्षाचे विचार सोडून शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येत असतील तर सरकार टिकवण्यासाठी कोणत्याही स्तराला जाऊ शकतात. यामुळे सरकार ५ वर्षे टिकू शकणार असल्याचे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले.
5 वर्षांपूर्वी -
अहमदनगर: फडणवीस सरकारच्या काळातील टँकर घोटाळ्याची चौकशी होणार
फडणवीस सरकारच्या कार्यकाळात अहमदनगरमध्ये टँकर घोटाळा झाल्याचा आरोप एनसीपीचे तरुण आमदार रोहित पवार यांनी केला आहे. त्यानंतर रोहित पवारांच्या तक्रारीची चौकशी करणार, अशी ग्वाही अहमदनगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे. संबंधित बैठकीत आमदार रोहित पवार यांनी देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात दुष्काळ पडला असताना झालेल्या टँकर छावणी आणि इतर दुष्काळ निवारण कामांची चौकशी करण्याची मागणी केली. अहमदनगर जिल्ह्यातील रस्ते, शाळा यासाठी मोठा निधी मागितला असल्याचं रोहित पवार यांनी सांगितलं.
5 वर्षांपूर्वी -
डीएसके'मधील ठेवीदाराची आत्महत्या; ठेवीदार पुण्यातील 'शिवसैनिक'
डीएसके अर्थात डीएस कुलकर्णी यांच्या एका ठेवीदाराने आत्महत्या केली आहे. तानाजी गणपत कोरके असे या ठेवीदाराचे नाव होते. तानाजी कोरके हे पुण्यातील घोरपडी येथील भीमनगर परिसरात राहात होते. त्यांनी मुलीच्या लग्नासाठी डीएसकेमध्ये गुंतवणूक केली होती. परंतु, गुंतवणूक केलेली रक्कम मिळत नसल्याने तानाजी यांनी आत्महत्ये सारखे टोकाचे पाऊल उचलून आयुष्य संपवले आहे. तानाजी कोकरे शिवसैनिक होते. तानाजी यांचे एक पत्र सापडले असून त्यावर शेवटी शिवसैनिक….जय महाराष्ट्र! असा उल्लेख आहे. कोरके यांच्या पश्चात चार मुली आहेत.
5 वर्षांपूर्वी -
उदयनराजे समर्थकांकडून सातारा बंद; राऊत आणि आव्हाडांचा निषेध
खासदार संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ उदयनराजेंच्या समर्थकांनी गुरुवारी थेट सातारा बंदचे आवाहन करत सातारा बंद ठेवला. तसेच संजय राऊत यांच्या विरोधातही कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. छत्रपतींचे वंशज असल्याचे पुरावा द्या, असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी माजी खासदार उदयनराजे भोसले यांना आव्हान दिले होते. त्यामुळे उदयनराजेंचे समर्थक संतप्त झाले.
5 वर्षांपूर्वी -
अनेकांना वाटतं होतं की, मी निवृत्त होईन; पण तसं होणार नाही: शरद पवार
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना ‘स्टेपनी’ म्हटल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मात्र अजितदादांकडे थेट स्टिअरिंग व्हील दिलं आहे. आमच्या सत्तेचं ड्रायव्हिंग अजितदादांकडे आहे, असा खुशखुशीत डायलॉग उद्धव ठाकरेंनी बारामती दौऱ्यात मारला. अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते बारामतीत उद्धव ठाकरे यांचं स्वागत करण्यात आलं. त्यानंतर सुप्रिया सुळे यांच्या हस्ते अजित पवारांचंही स्वागत झालं. राजकीय कारकीर्दीला प्रारंभ केल्यानंतर उद्धव ठाकरे यांचा बारामतीत हा पहिलाच जाहीर कार्यक्रम होत आहे.
5 वर्षांपूर्वी -
शिवसेनेचे नाव बदलून ठाकरेसेना करा: उदयनराजे भोसले
यावेळी उदयनराजेंनी शिवसेनेवर जोरदार टीकेची झोड उठवली. स्वार्थासाठी शिवरायांच्या नावाचा वापर का करता असा संतप्त सवाल उदयन राजेंनी विचारला. तसेच महाराजांच्या नावाने शिवसेनेची स्थापना करताना वंशजांना विचारले होते का? अशी विचारणा करत उदयनराजेंनी ठाकरे कुटुंबीयांवर टीका केली. तसेच शिवसेनेचे नाव बदलून ठाकरेसेना करा, असा सल्लाही त्यांनी दिला.
5 वर्षांपूर्वी -
चाबूक! म्हणत खवय्ये सुखावले, कोल्हापूरकरांच्या ताटात मटण
कोल्हापूर शहरातील कसबा बावडा या उपनगरात मटण दरवाढीचा मुद्दा उपस्थित झाला. येथेच या वादाची पहिली ठिणगी पडली. या परिसरातील मटण विक्रेत्यांनी ५६० ते ५८० रुपये किलो दराने विक्री सुरू केली. त्यानंतर येथील दुकाने बंद पडू लागली. मात्र, नदीपलिकडे मटण ४६० किलोने मिळत असताना गावात मात्र मटण विक्रेते आर्थिक लूट करत असल्याचा आक्षेप लोकांनी घेतला. हे आंदोलन इतर ठिकाणीही पसरू लागले. मटण विक्री बंद असल्याने कोल्हापूरकर ताटातील झणझणीत मटणाला वंचित झाले होते. मात्र, कृती समितीने यावर तोडगा काढल्याने अखेर आजपासून मटण विक्री सुरू होत आहे.
5 वर्षांपूर्वी -
पक्षविरोधी भूमिका घेणाऱ्या अजित पवारांवर आधी कारवाई करा: जयसिंह मोहिते पाटील
जिल्हा परिषदेतील मोहिते पाटील गटाच्या ६ सदस्यांवर कारवाई केल्यानंतर विजयसिंह मोहिते-पाटील यांनी राष्ट्रवादीला खरमरीत उत्तर दिलं आहे. ‘रात्रीच्या अंधारात भारतीय जनता पक्षासोबत जाऊन उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या अजित पवार यांच्यावरही राष्ट्रवादीने कारवाई करावी,’ असं खुलं आव्हान मोहिते पाटलांनी दिलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
सातारा: महाराष्ट्राचे सुपुत्र BSF जवान ज्ञानेश्वर जाधव जम्मू-काश्मिर सीमेवर शहीद
सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील धकटवाडी गावचे सुपुत्र BSF जवान ज्ञानेश्वर चंद्रकांत जाधव यांना जम्मू आणि काश्मिर मध्ये ड्युटी बजावत असताना वीर मरण आले. त्यामुळे सातारा जिल्ह्यात एकंच शोककळा पसरली आहे. धकटवाडीत अत्यंत शोकाकुल वातावरण झाल्याचं पाहायला मिळत आहे.
5 वर्षांपूर्वी -
भाजपच्या 'ऑपरेशन लोटस'सेनेतील आ. पाचपुतेंना श्रीगोंद्यात धक्का; पंचायत समिती खालसा
श्रीगोंदा पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपचे आमदार बबनराव पाचपुते यांना जोरदार धक्का देत राष्ट्रवादीचा झेंडा फडकविला आहे. या निवडणूकीत सभापतीपदी गीतांजली पाडळे, तर उपसभापती रजनी देशमुख यांनी निवड झाली आहे. त्यामुळे हा निकाल म्हणजे माजीमंत्री पाचपुते यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
5 वर्षांपूर्वी -
सातारा: शहीद संदीप सावंत अमर रहे! लष्करी इतमामात अखेरचा निरोप
दहशतवाद्यांशी दोन हात करताना शहीद झालेले महाराष्ट्राचे सुपुत्र शहीद संदीप सावंत यांना अखेरचा निरोप देण्यात येतो आहे. हा नरोप देताना महाराष्ट्रही गहिवरला आहे. संदीप सावंत यांच्या पार्थिवावर त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. काही वेळापूर्वीच त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आले. त्यांची अवघी काही महिन्यांची असलेली मुलगी पोरकी झाली. संदीप सावंत यांना अखेरचा निरोप देण्यासाठी गावातले सगळे लोक जमले. शोकाकुल वातावरणात त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला.
5 वर्षांपूर्वी -
सातारा: सत्ता जाताच भाजप आमदारांचा टोलनाका बंद वरून मनसे खळखट्याक मार्ग
खळखट्याक आंदोलनासाठी प्रसिद्ध असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आदर्श सध्या सत्ता जाताच भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी देखील घेतल्याचं दिसत आहे. फडणवीसांच्या सत्ताकाळात कोणीही कायदा हातात घेऊन आंदोलन करू नये उपदेश देणारे भाजप सरकार सत्ता जाताच खळखट्याक मार्गावर उतरल्याचे पाहायला मिळत आहे. सदर आंदोलन साताऱ्यात घडलं आहे आणि मनसे स्टाईल’मुळे चर्चेत सुद्धा आलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
विखेंची नगरमध्ये ताकद नव्हती; सर्व १२ जागा जिंकू म्हणत ३ जिंकल्या: राम शिंदे
महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या कर्जत-जामखेडच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पवार यांचा विजय झाला होता. रोहित पवार यांना १३५८२४ तर भारतीय जनता पक्षाचे राम शिंदे यांना ९२४७७ मते मिळाली. राेहित पावर यांचा तब्बल ४३,३४७ मतांनी विजय झाला आहे. त्यामुळे मंत्री राम शिंदे यांना ५ वर्ष तरी घरी बसावं लागणार हे निश्चित झालं. निवडणुकीपूर्वीच ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे राजकीय वारसदार म्हणून चर्चेत आलेले रोहित पवार यांनी पहिल्याचा दणक्यात भाजपच्या एका मंत्र्याला पराभूत करून घरी बसवला होतं. सध्या कर्जत-जामखेडमधील रोहित पवारांचा वाढता राजकीय आवाका पाहता राम शिंदेंना पुढच्या दुसराच मतदारसंघ शोधावा लागेल अशी शक्यता आहे. त्यामुळे राम शिंदे देखील संतापलेले दिसतात.
5 वर्षांपूर्वी -
भाजपाला सोडून कोणतेही सरकार टिकणार नाही: सुभाष देशमुख
सत्तास्थापनेच्या प्रक्रियेतील सर्व महत्त्वाचे मुद्दे संपले आहेत. दोन्ही काँग्रेसच्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली आहे. उद्या पुन्हा आमची चर्चा होणार असून त्यानंतर शुक्रवारी शिवसेनेच्या नेत्यांसोबत चर्चा करण्यात येईल. शुक्रवार संध्याकाळपर्यंत सत्तेचा फॉर्म्युलाही तयार होणार असून त्याच दिवशी संध्याकाळपर्यंत सत्तास्थापनेची अंतिम घोषणा करण्यात येणार असल्याचं पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं. शिवसेनेसोबत जाण्याबाबत आजच्या बैठकीत तत्त्वत: मंजुरी देण्यात आल्याचे संकेतही त्यांनी दिले.
5 वर्षांपूर्वी -
भाजपचे व अपक्ष आमदार आमच्या संपर्कात, लवकरच निर्णय घेऊ पण मेरीटवर: जयंत पाटील
राष्ट्रवादीतून भारतीय जनता पक्षामध्ये गेलेले तसेच काही अपक्ष आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे. पुण्यात राष्ट्रवादीची कोअर कमिटीची बैठक सुरु असून तत्पूर्वी पत्रकारांशी बोलताना पाटील यांनी हे विधान केले. राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीच्या बैठकीला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, अजित पवार, धगन भुजबळ, अनिल देशमुख, नवाब मलिक, धनंजय मुंडे, सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड, सुनील तटकरे आदी उपस्थित आहेत.
5 वर्षांपूर्वी -
राष्ट्रवादीचे जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी राज ठाकरेंची सदिच्छा भेट घेतली
सध्या राज्यात विधानसभा राज्यात निवडणुकीचे निकाल जाहीर होऊन आठवडा उलटला असला तरी अजून सत्ता स्थापनेवरुन भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेमध्ये एकमेकांविरुद्ध कुरघोडीचे राजकारण सुरुच आहे. दुसरीकडे एक आमदार निवडून आल्यानंतर देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि एनसीपी’मधील राजकीय जवळीक अजून वाढताना दिसत आहे.
5 वर्षांपूर्वी -
स्वकीयांनी ताकत दिली नाही, पण पवार साहेबांनी ऊर्जा दिली: मनसे नेत्या रुपाली पाटील
पुण्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) महिला नेत्या रुपाली पाटील यांनी आज (सोमवार) दिवाळी पाडव्यानिमित्त बारामतीत जाऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. बारामतीतील गोविंदबागेत आज पवार कुटुंबीय राज्यभरातून आलेल्या कार्यकर्त्यांची भेट घेत असताना मनसेच्या रुपाली पाटील यांनीही शरद पवार व अजित पवार यांची भेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्या.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
- SBI Salary Account | पगारदारांनो, SBI बँकेत सॅलरी अकाउंट ओपन करा, फ्री इन्शुरन्ससहित मिळतील अनेक फायदे
- Post Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेतून मिळेल मजबूत परतावा, फक्त व्याजाचे 56,803 रुपये मिळतील, फायदा घ्या
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Gold Rate Today | बापरे, आज सोन्याच्या भाव मजबूत महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर फोकसमध्ये, स्टॉक मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: HAL