22 January 2025 7:10 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Rattanindia Power Share Price | 12 रुपयांचा पॉवर कंपनीचा शेअर तेजीत, कंपनीने महत्वाची अपडेट दिली - NSE: RTNPOWER Penny Stocks | 1 रुपयाचा शेअर खरेदी गर्दी, 1 दिवसात 9 टक्क्यांनी वाढला, मालामाल करतोय शेअर - Penny Stocks 2025 IRFC Share Price | आयआरएफसी शेअरबाबत महत्वाचे संकेत, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 34 टक्क्यांनी घसरला, तज्ज्ञांकडून महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: RVNL Tata Steel Share Price | टाटा स्टील कंपनी शेअरमध्ये तेजीचे संकेत, रेटिंग अपडेट, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL Rama Steel Share Price | 65 पैशाचा शेअर श्रीमंत करतोय, डिफेन्स क्षेत्रातही प्रवेश, यापूर्वी 1748% परतावा दिला - NSE: RAMASTEEL Bonus Share News | फ्री बोनस शेअर्स देतेय ही कंपनी, संधी सोडू नका, 4085 टक्के परतावा दिला शेअरने - BOM: 531771
x

कोणाचं काय अन लोढांचं काय? 3 निवडणुकांपैकी हिमाचल प्रदेश आणि दिल्ली महापालिकेत भाजपची सत्ता गेली, तरी BMC वरून इशारा

BJP Leader Mangal Prabhat Lodha

Gujarat Assembly Election Result | गुजरात विधानसभा निवडणूक निकालाचे ताजे कल आणि निकालामुळे भारतीय जनता पक्ष सलग सातव्यांदा राज्यात सत्ता काबीज करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे पाच वर्षांतच भाजपने राज्याची राजकीय परिस्थिती बदलली आहे. 2017 च्या निवडणुकीत 99 जागांपर्यंत कमी झालेल्या भाजपला यावेळी दोन तृतीयांश जागांसह 151 जागा जिंकता येणार आहेत, हा राज्याच्या आजवरच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय आहे.

अशा परिस्थितीत गेल्या पाच वर्षांत भाजपने कोणती पावले उचलली, ज्यामुळे राज्याचा राजकीय चेहरामोहरा बदलला आणि भाजप आतापर्यंत सर्वोत्तम कामगिरी करताना दिसत आहे, हे लक्षात घेण्यासारखे आहे. भाजपविरोधात अँटी इन्कम्बन्सी फॅक्टर असूनही बंपर बहुमत मिळवण्यात मोठी भूमिका बजावणारी पाच प्रमुख कारणे समोर आली आहेत. त्यात व्हायब्रंट गुजरात आणि मोदींचा करिष्मा, मुख्यमंत्र्यांसह संपूर्ण मंत्रिमंडळ बदललं, दिग्गजांची तिकीटं कापली, पाटीदारांना पाठिंबा दिला आणि बंडखोरांना नियंत्रित केलं ही प्रमुख कारणं समोर आली आहेत. असं असलं तरी देशातील तीन महत्वाच्या म्हणजे गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुका आणि दिल्लीतील महानगरपालिका निवडणुकांपैकी दोन निवडणुकीत म्हणजे हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुका आणि दिल्लीतील महानगरपालिका निवडणुकीत भाजपचा पराभव झाला आहे आणि केवळ गुजरात राखण्यात यश आलं आहे.

हिमाचल प्रदेशात काँग्रेसची सत्ता
१९९०च्या दशकापासून हिमाचल प्रदेशात दर पाच वर्षांनी सत्ता बदलण्याची प्रथा आहे. या बदलात कांगडा प्रदेश महत्त्वाची भूमिका बजावतो. कांगडामध्ये ज्याने १० जागा जिंकल्या त्यानेच राज्यात सरकार स्थापन केले, असे बोलले जाते. 2017 च्या निवडणुकीत कांगडा जिल्ह्यातील विधानसभेच्या 15 जागांपैकी 11 जागा भाजपने जिंकल्या होत्या. भाजपचे जय राम ठाकूर राज्याचे नवे मुख्यमंत्री झाले होते.

2012 मध्ये कांग्रामध्ये काँग्रेसने 10 जागा जिंकल्या होत्या आणि वीरभद्र सिंह राज्याचे मुख्यमंत्री झाले होते, तर 2007 मध्ये भाजपने नऊ आणि काँग्रेसने सहा जागा जिंकल्या होत्या. 2003 मध्येही कांग्रामध्ये काँग्रेसनं सरकार स्थापन केलं तेव्हा 11 जागा जिंकल्या होत्या. 1998 मध्ये कांगडामध्ये 10 जागा जिंकून भाजपने सरकार स्थापन केलं होतं. यावेळी कांगडामध्ये काँग्रेस 15 पैकी 10 जागांवर विजय मिळवताना दिसत आहे, तर भाजपला केवळ पाच जागा राखता येतील असं दिसतंय. भाजपला आठ जागा गमवाव्या लागत असल्याचे दिसत आहे. एकूण ६८ जागांपैकी काँग्रेस ४० किंवा अधिक जागा जिंकेल असं निकालाचे कल दिसत आहेत.

मुंबई भाजपकडून पराभव दुर्लक्षित आणि एका विजयावर भाष्य :
मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भाजपने गुजरातमध्ये जोरदार मुसंडी मारली आहे. अंतिम निकाल अद्याप हाती आलेले नाहीत तरीही भाजपला १५० पेक्षा जास्त जागा मिळणार हे निश्चित झालं आहे. भाजपची गुजरातमध्ये एकहाती सत्ता येणार हे स्पष्ट झालं आहे. अशात मंगलप्रभात लोढा यांनी महाविकास आघाडी आणि उद्धव ठाकरेंना थेट इशाराच दिला आहे. गुजरात ही फक्त नांदी आहे. आज जे गुजरातमध्ये घडलं तेच मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत घडणार आहे असं मंगलप्रभात लोढा यांनी म्हटलं आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: BJP Leader Mangal Prabhat Lodha talked over upcoming BMC Election check details on 08 December 2022.

हॅशटॅग्स

#BJP Leader Mangal Prabhat Lodha(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x