15 January 2025 2:38 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | मल्टिबॅगर इरेडा शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली - NSE: IREDA Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: APOLLO Quant Mutual Fund | पगारदारांनो, टॅक्स वाचेल आणि पैसा 3 ते 4 पटीने वाढेल, ही म्युच्युअल फंड योजना मालामाल करेल IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, प्राईस बँड सह डिटेल्स नोट करा, कमाईची संधी सोडू नका 8th Pay Commission | 8'व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
x

शिंदे गटातील मंत्र्यांना सत्तेचा माज! पोलिसांसमोर खुलेआम दोघांना शिवीगाळ-मारहाण, गृहमंत्री बघ्याच्या भूमिकेत

Minister Dada Bhuse

Minister Dada Bhuse | हिळावी अधिवेशनाचा पहिला आठवडा संपला असून सोमवारपासून शेवटच्या आठवड्याला सुरुवात झाली आहे. शेवटच्या टप्प्यात विरोधक आक्रमक झाले असून आता उद्धव ठाकरेही मैदानात उतरले आहेत. आजच्या दिवशी मंत्री अब्दुल सत्तार, संजय राठोड आणि सीमावाद प्रकरण चांगलं तापणार असल्याचे दिसत आहे. विरोधकांचं आज वेगळं रूप विधान भवनाच्या परिसरात पाहायला मिळाले. टाळ वाजवत भजन म्हणत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केलं आहे. त्याचा व्हिडीओ देखील समोर आला आहे.

एकाबाजूला, राज्यातील शिंदे सरकारमधील काही मंत्री वादाच्या भोवऱ्यात सापडत आहेत. आता शिंदेच्या कॅबिनेटमधील आणखी एका मंत्र्याचा एक वादग्रस्त व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामुळे पुन्हा एकदा विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये काय?
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये असे दिसून येत आहे की, मंत्री दादा भुसे हे दोन तरुणांना शिव्या देत असून त्यात त्यांनी एका तरुणाच्या कानाखाली मारली आहे. त्यामुळं आता राष्ट्रवादीनं हा व्हिडिओ शेयर करत मुख्यमंत्र्यांकडे कारवाईची मागणी केली आहे. याशिवाय हिवाळी अधिवेशनातही या विषयारून विरोधक त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्याची शक्यता आहे. परंतु हा व्हिडिओ नेमका कधीचा आणि कुठला आहे, हे अजून स्पष्ट होऊ शकलेलं नाही. तसेच दादा भुसेंनी या तरुणांना नेमकी का मारहाण केली, याची माहितीही अद्याप समोर आलेली नाही.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Cabinet Minister Dada Bhuse abusing and beating 2 youngsters check details on 27 December 2022.

हॅशटॅग्स

#Minister Dada Bhuse(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x