22 February 2025 7:07 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या Railway Confirm Ticket | रेल्वेची तिकिट कन्फर्म आणि ट्रेन सुटली, तुम्ही दुसऱ्या ट्रेनने प्रवास करू शकता का? नियम लक्षात ठेवा Credit Card EMI | क्रेडिट कार्डच्या मोठ्या बिलाचे EMI मध्ये रूपांतर कसे करावे? थकीत रक्कम भरणे सोपे होईल Numerology Horoscope | नशीब आणि आकड्यांचा खेळ, अंकज्योतिषशास्त्रानुसार 16 फेब्रुवारी तुमचा रविवारचा दिवस कसा असेल IPO GMP | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी होईल मोठी कमाई, अशी संधी सोडू नका - IPO Watch
x

उद्धव ठाकरेंचं समृद्धी महामार्गाच्या कामावर लक्ष होतं, श्रेय फडणवीसांना देण्यासाठी शिंदेची धडपड, शिंदेच्या तोंडून शिंदेंची पोलखोल

CM Eknath Shinde

Balasaheb Thackeray Samrudhi Highway | हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग हा नागपूर ते शिर्डी या मार्गाचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज म्हणजे ११ डिसेंबरला करण्यात येतं आहे. हे उद्घाटन करत असताना मला खूप आनंद होतो आहे. या समृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव दिलं गेल्याचा मला खूप आनंद आहे. आनंद आणि अभिमान यासाठी वाटतो आहे की ज्या वेळी मागच्या सरकारमध्ये म्हणजे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते तेव्हा MSRDC चा मंत्री म्हणून माझ्यावर विश्वास दाखवला. तो प्रकल्प मी इथपर्यंत आणू शकलो याचा आनंद आहे असं सांगताना उद्धव ठाकरेंच्या कार्यकाळाकडे कानाडोळा करत फडणवीसांचा जयजयकार केल्याचं पाहायला मिळाले.

इथेही आरोप :
हा प्रकल्प तयार करताना सगळ्यात मोठी अडचण होती ती भूसंपादन हीच. कुठलाही प्रकल्प अस्तित्वात आणताना तो यशस्वी करायचा असेल तर जमीन अधिग्रहण करणं हे वेगाने व्हायला हवं असतं. काही ठिकाणी शेतकऱ्यांचा विरोध होता काही ठिकाणी. विरोध करायला भागही पाडलं जात होतं. कोण होतं त्यात आता मी पडत नाही. अडचणी होत्या, विरोधही काही लोकांनी केला. उद्धव ठाकरेंनी विरोध दर्शवला होता. मला त्यात पडायचं नाही. ज्यांनी विरोध केला त्यांना ते समजून घेत असतील यात एकच आहे. की मी या प्रकल्पाच्या मुळाशी गेलो.

शिंदे खोटं बोलत आहेत आणि ते त्यांच्या तोंडून समजून घ्या
वास्तविक आपल्याच वडिलांच्या नावाने बनणाऱ्या मार्गाला उद्धव ठाकरे का विरोध करतील. या मार्गाला जो स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध झाला होता तो त्याच शेतकऱ्यांच्या भरपाई संदर्भात होता. त्याचा उद्धव ठाकरेंशी काडीमात्र संबंध नव्हता. पण, शिंदे हे भाजपच्या अधीन झाल्याने ते सर्व विषयांचं श्रेय मोदी आणि फडणवीसांना देण्यात व्यस्त असतात. पण वास्तव वेगळं आहे. कोरोना कळतही तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी या महामार्गाच्या कामात लक्ष घालून त्यात व्यत्यय येऊ दिला नव्हता.

यासंदर्भात स्वतः तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हेच माध्यमांना माहिती देतं होते आणि कदाचित त्याचा त्यांना विसर पडला असावा असं सध्याचं चित्रं आहे. अगदी ५ डिसेंबर २०२० मध्ये ट्विट करून माहिती देताना एकनाथ शिंदे म्हणाले होते, “आज प्रथमच मी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे महामार्ग या प्रकल्पाची पाहणी करायला आलो. या प्रकल्पाचे अप्रतिम काम चालू आहे. हा प्रकल्प पूर्ण होईल तेव्हा ज्याचा महाराष्ट्राला अभिमान वाटेल असा आपल्या देशातील सर्वोत्तम महामार्ग बनेल, असं काम आपण केलेलं असेल.”

शिंदे त्यावेळी पुढे म्हणाले होते, समृद्धी महामार्गावरुन येत्या १ मे २०२१ पर्यंत नागपूर ते शिर्डी प्रवास सुरू होणार असल्याचीही माहिती त्यावेळी विद्यमान मुख्यमंत्र्यांनी दिली होती. शिंदे ते म्हणाले की, “आपण हे काम ज्या गतीने करतो आहे. लॉकडाउनच्या काळात असं वाटलं होतं की कामात खंड पडेल किंबहुना काम थोडसं हळुवारपणे होईल पण त्या काळात सुद्धा प्रकल्पाचं काम मंदावलेलं नाही. मला खात्री आहे. येत्या १ मे २०२१ पर्यंत आपण नागपूर ते शिर्डी प्रवास या रस्त्यावरुन करू शकू”. काय होतं ते नेमकं ट्विट पहा.

आणि 27 मार्च 2022 रोजी टेस्ट ड्राईव्ह करून शिंदेनी उद्धव ठाकरेंचा राजकीय घात केला :
सरकार पाडण्याच्या तीन महिने आधी शिंदेंनी याच मार्गावर टेस्ट ड्राईव्ह करून माहिती दिली होती. त्यावेळी ते म्हणाले होते, “समृद्धी महामार्ग मुंबई-नागपूर द्रुतगती महामार्ग महाराष्ट्र राज्य सरकारने 5 वर्षांच्या विक्रमी कालावधीत कार्यान्वित केला. म्हणजे युतीच्या काळातही शिवसेना सत्तेत होती आणि उद्धव ठाकरेंच्या काळातील अडीच वर्षात कुठेही या कामात खंड आला नव्हता. त्यामुळे शिंदे हे उद्धव ठाकरेंची बदनामी करण्यासाठी आणि मोदी-फडणवीसांची स्तुती करण्यासाठी किती आटापिटा करत आहेत हे सिद्ध होतंय.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: CM Eknath Shinde allegations on Uddhav Thackeray opposed to Samriddhi Highway check details on 11 December 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CM Eknath Shinde(90)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x