18 April 2025 12:49 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | पैसे बचत करून वाढणार नाहीत, तर अशाप्रकारे स्मार्ट बचत करून वाढवा, मिळेल 1 कोटी रुपये परतावा Gratuity Money Alert | तुमचा पगार किती आहे? तुमच्या शेवटच्या पगारानुसार कंपनी एवढी ग्रॅच्युटी रक्कम देणार, अपडेट जाणून घ्या EPFO Money Alert | खाजगी कंपनी पगारदारांसाठी अपडेट, EPFO खात्यातून 5 लाखांपर्यंतची रक्कम ऑटो सेटलमेंट काढता येणार Horoscope Today | 18 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 18 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Yes Bank Share Price | येस बँकेचा पेनी स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांनी सांगितली टार्गेट प्राईस - NSE: YESBANK Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिली महत्वाची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: TATAMOTORS
x

भाजपसाठी धोक्याची घंटा, मीच उमेदवार आहे समजून मतं द्या असं आवाहन करूनही हिंदी पट्ट्यातील मतदार मोदींना नाकारतोय

Himachal Pradesh Assembly Election

Himachal Pradesh Assembly Election | भाजपसाठी गुजरातचा विजय आणि हिमाचल प्रदेश तसेच दिल्ली महानगपालिका निवडणुकीत बसलेला धक्का ही नवी भविष्यातील आव्हानांचीही चिन्हं आहेत. याचा परिणाम येत्या वर्षभरात नऊ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांवर तर होईलच, शिवाय लोकसभा निवडणुकीपर्यंतही त्याचा परिणाम होणार आहे. विशेषत: भविष्यातील सामाजिक-राजकीय रणनीतीवरही याचा परिणाम होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाची गुजरातमध्ये जादू कायम असल्याचेही यावरून स्पष्ट होत आहे. मात्र इतर राज्यांमध्ये म्हणजे दिल्ली आणि हिमाचल प्रदेशसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते याचे स्पष्ट संकेत दिसू लागले आहेत.

हिंदी पट्ट्यातील भाजपचा पराभव :
योग्य सुसंवाद आणि नेत्यांची अनुपस्थिती, धोरण आणि हेतू यांचे निकाल कसे लागतात, हे निवडणूक निकालांनी स्पष्ट केले आहे. पंतप्रधान मोदी यांच्या आवाहनांचा परिणाम केवळ गुजरात मध्ये मर्यादित राहतो, तर दुसऱ्या राज्यांमध्ये त्याचा पूर्ण अभाव आणि परिणाम जाणवतो हे इतर राज्यांमधील निकालांवरून स्पष्ट होतंय. गुजरातमध्ये सातव्यांदा निवडणूक जिंकून भाजपने इतिहास रचला असला, परंतु हिमाचलमधील तीन दशकांची प्रथा बदलण्यात त्यांना पूर्णपणे अपयश आले आहे.

गुजरातमध्ये २७ वर्षे उलटल्यानंतरही भाजपने अँटी इन्कम्बन्सीला वर्चस्व दिसले मात्र दुसरीकडे, हिमाचल प्रदेशमध्ये ती अवघ्या पाच वर्षांत भाजप आणि मोदी ब्रँड अँटी इन्कम्बन्सीची शिकार ठरत आहे. दिल्ली महानगरपालिकेतील सत्ता जाण हा देखील त्याचाच भाग आहे. विशेष म्हणजे लवकरच मध्य प्रदेश, राजस्थान आणि कर्नाटकात निवडणुका होऊ घातल्या आहेत आणि या राज्यांमध्ये राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला प्रचंड यश मिळालं आहे. विशेष म्हणजे ते स्वतः या राज्यातील निवडणुकीत प्रचारात झोकून देतील असे संकेत देण्यात आले आहेत. म्हणजे जिथे काँग्रेस पूर्ण ताकदीने उतरते तिथे भाजपचा पराभव होतो हे देखील अनेकदा अधीरेखित झालं आहे. त्यामुळे ही भाजपसाठी डोक्याची घंटा आहे.

३ पैकी दोन पराभव झाकण्याचा आटापिटा :
वास्तविक देशातील तीन महत्वाच्या निवडणुकीत भाजपने दोन निवडणूका हरले म्हणजे येथील असलेली सत्ता गमावली आहे. अगदी हिमाचलमध्ये तर मीच उमेदवार आहे असं समजा आणि मतदान करा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भर सभेतून केलं होतं. याचा अर्थ लोकांनी भाजपचे उमेदवार नाकारले आणि त्यांनी मोदींना मतदान केलं नाही असाच अर्थ साधा सरळ अर्थ निघतो. मात्र तो पराभव झाकण्यासाठी केवळ गुजरातवर चर्चा घडविण्यात आली. गुजरातमध्ये भाजपाचीच सत्ता येणार होती आणि नसती आली तरी मोदी-शहांनी तिथे इतर कोणत्याही पक्षाचं सरकार स्थापन होऊच दिलं नसतं हे न कळण्याइतके राहुल गांधी राजकीय दृष्ट्या वेडे नाहीत. कारण गुजरातमध्ये सत्ता नसेल तर ते पंतप्रधान पदाच्या चर्चेतून बाहेर जातील आणि ते तसं होऊ देणार नाहीत याची राहुल गांधींना खात्री होती, परिणामी ते भारत जोडो यात्रेत केंद्रित राहिले आणि प्रियांका गांधींना हिमाचल प्रदेशची जवाबदारी दिली होती. त्याचा परिणामही दिसला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Himachal Pradesh Assembly Election victory for congress check details on 09 December 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Himachal Pradesh Assembly Election(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या