14 November 2024 11:24 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट, कमाईची मोठी संधी - NSE: HAL Vedanta Share Price | वेदांता कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, मालामाल करणार शेअर - NSE: VEDL Tata Motors Share Price | रॉकेट तेजीने परतावा देणार टाटा मोटर्स शेअर, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATAMOTORS NHPC Share Price | NHPC शेअर चार्टवर महत्वाचे संकेत, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: NHPC EPFO Money | खाजगी कर्मचाऱ्यांचा बेसिक पगार वाढणार, प्रतिमहा मिळणारं 21000, जाणून घ्या आणखीन फायदे - Marathi News Post Office Scheme | आता 100 रुपये वाचवून तयार होईल लाखोंचा फंड, पोस्टाची खास योजना तुम्हाला श्रीमंत बनवू शकते - Marathi News Property Buying | प्रॉपर्टी खरेदी करायची असेल तर, सर्वात आधी या 4 गोष्टींवर लक्ष केंद्रित करा, नाहीतर नुकसान होईल - Marathi News
x

सुषमा अंधारेंच्या विरोधात 25 वारकऱ्यांची दिंडी, या दिंडीतील नारेबाजीला राजकीय सुगंध, नेटिझन्सकडून राजकीय दिंडीची खिल्ली

Nashik 22 Vaekari Dindi

Sushma Andhare | गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर राजकीय हेतूने व्हिडीओ व्हायरल करणं सुरु आहे. हा व्हिडिओ सुषमा अंधारेंच्या संबंधित आहे. त्यात सुषमा अंधारेंनी हिंदू देवी-देवता आणि साधु-संताबाबत आक्षेपार्ह विधानं केल्याचा दावा करताना वारकरी महामंडळ अंधांरेविरुद्ध आक्रमक झाला आहे अशी वृत्त पसरवली जातं आहेत.

राज्यभरातून वारकरी संप्रदाय निषेद आंदोलने असे मथळे प्रसार माध्यमांकडे येतं असले तरी यामध्ये मोजून २४-२५ लोकांचं आहेत. सामान्य लोकांना या विषयाशी काही देणं घेणं नाही असं देखील वास्तव चित्र पाहायला मिळतंय. या पार्श्वभूमीवर नाशिकमधील २४-२५ वारकऱ्यांनी एकत्र येत दिंडी यात्रेचे आयोजन केले होते. या दिंडीच्या माध्यमातून सुषमा अंधारे यांचा निषेध करण्यात येत आहे. नाशिकच्या काळाराम मंदिरापासून युवा यात्रेला प्रारंभ झाला असून गोदावरी पटांगणावर रामकुंडानजीक या यात्रेचा समारोप होणार आहे. मात्र या दिंडीत दिल्या जाणाऱ्या घोषणा या राजकीय असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली असून या वारकऱ्यांचे थेट सत्ताधाऱ्यांशी राजकीय संबंध असल्याची चर्चा खुद्द नाशिकमध्ये सुरु झाली आहे. समाज माध्यमांवर तर या दिंडीची जोरदार खिल्ली उडवली जाते आहे.

सुषमा अंधारेंचा जाहीरपणे निषेध करतो आहोत, यानंतर हि दिंडी थेट पंचवटी पोलीस स्टेशनला रवाना होऊन वारकरी पंचवटी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करणार आहेत. दरम्यान दिंडी क्षमताच करता पंचवटी पोलीस स्टेशनला वारकरी तक्रार देणार असून सुषमा अंधारेवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी दिंडीच्या माध्यमातून करण्यात आली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Nashik 22 Vaekari Dindi against Sushma Andhare check details on 16 December 2022.

हॅशटॅग्स

#Sushma Andhare(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x