15 November 2024 4:39 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट, कमाईची मोठी संधी - NSE: HAL Vedanta Share Price | वेदांता कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, मालामाल करणार शेअर - NSE: VEDL Tata Motors Share Price | रॉकेट तेजीने परतावा देणार टाटा मोटर्स शेअर, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATAMOTORS NHPC Share Price | NHPC शेअर चार्टवर महत्वाचे संकेत, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: NHPC EPFO Money | खाजगी कर्मचाऱ्यांचा बेसिक पगार वाढणार, प्रतिमहा मिळणारं 21000, जाणून घ्या आणखीन फायदे - Marathi News Post Office Scheme | आता 100 रुपये वाचवून तयार होईल लाखोंचा फंड, पोस्टाची खास योजना तुम्हाला श्रीमंत बनवू शकते - Marathi News Property Buying | प्रॉपर्टी खरेदी करायची असेल तर, सर्वात आधी या 4 गोष्टींवर लक्ष केंद्रित करा, नाहीतर नुकसान होईल - Marathi News
x

स्वत: शेण खाता अन् त्या महिलेचा दाऊदशी संबंध जोडता! ऍडव्होकेट रुपाली पाटील ठोंबरेंनी राहुल शेवाळेंना झापले

MP Rahul Shewale

MP Rahul Shewale | राहुल शेवाळे यांच्यावर आरोप करणारी महिला रिंकी बक्सला हिने राष्ट्रवादीच्या महिला नेत्या ऍडव्होकेट रुपाली पाटील ठोंबरे यांच्यासोबत व्हिडिओ LIVE करत अनेक गंभीर मुद्दे उपस्थित केले होते. त्यात तिने आणि तिच्या कुटुंबाने भोगलेल्या अडचणींचा पाढा देखील वाचला. आपल्याला प्रचंड मानसिक त्रास आणि धमक्या देण्यात आल्याचं तिने सांगितलं. अनेकदा तिला सर्व प्रकरण सांगताना रडू देखील कोसळल्याचे पाहायला मिळाले. अनेक फोटो आणि व्हिडिओ तिने प्रामाणिकपणे आपलेच असल्याचे मान्य देखील केले. विशेष म्हणजे आपली केस स्थानिक वकील लढवत नसल्याने आपण याविरुद्ध लढा देऊ शकत नाही असं म्हटलं आहे. त्यावर राष्ट्रवादीच्या महिला नेत्या ऍडव्होकेट रुपाली पाटील ठोंबरे यांनी पीडित महिला रिंकी बक्सला हिला सर्व वकिलांची फौज देण्याची मदत जाहीर केलीय, तसेच वेळ पडल्यास सर्व महिला रस्त्यावर उतरू असं देखील जाहीर केल्यानंतर शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे भलतेच घाबरल्याचं पाहायला मिळतंय.

कारण बराच काळ रिंकी बक्सला हिच्यासोबत ऑन व्हिडिओ रेकॉर्ड “I Love You Jaan” म्हणत तीच चुंबन घेणाऱ्या खासदार राहुल शेवाळेंना अचानक या महिलेत पाकिस्तान कनेक्शन दिसू लागलं आहे. तसेच त्याच्या आयुष्यातील या विवाहबाह्य प्रकरणात आता थेट NIA ने हस्तक्षेप करावा अशी जावईशोध करणारी मागणी त्यांनी केल्याने समाज माध्यमांवर शिंदे समर्थकांनी खिल्ली उडवणं सुरु झालं आहे आणि हे व्हिडिओ नव्याने पुन्हा व्हायरल होऊ लागले आहेत.

काय म्हणाले राहुल शेवाळे?
शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी एका फॅशन डिझायनरचे शोषण केल्याचा आरोप ठाकरे गटाकडून केला जात आहे. या प्रकरणाचे विधानसभेतही पडसाद उमटले. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी ठाकरे गटाकडून केली जात आहे. मात्र, या प्रकरणाला आता नवं वळण लागण्याची चिन्हे दिसत आहेत. खासदार राहुल शेवाळे यांनी या प्रकरणाची गंभीर माहिती दिली. सदर फॅशन डिझायनर महिलेचा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि पाकिस्तानातील गँगशी संबंध असल्याचा धक्कादायक आरोप केला आहे. तसेच या प्रकरणाची एनआयए मार्फत चौकशाी करण्याची मागणीही शेवाळे यांनी केली आहे.

महिलेचा पाकिस्तानी ग्रुप आहे. त्यांच्या गँगमध्ये फराह नावाची पाकिस्तानी महिला आहे. राशीद नावाचा पाकिस्तानी एजंटही आहे. ही फॅशन डिझायनर महिला दाऊद गँगसोबत काम करत आहे. रईस आणि जावेद छोटाली नावाच्या व्यक्ती सोबत ती काम करते. रईस आणि छोटालीसोबत तिचे संबंध आहेत. ती दोघांना परिचित आहे. हे साधंसुधं प्रकरण नाही हा आंतरराष्ट्रीय कट आहे, असं राहुल शेवाळे म्हणाले.

रुपाली पाटील यांनी झापलं :
राहुल शेवाळे स्वत: शेण खातात आणि त्या महिलेचा दाऊदशी संबंध जोडतात. राहुल शेवाळे यांना असं बोलताना लाज वाटली पाहिजे!”, असं रुपाली पाटील म्हणाल्या आहेत. राहुल शेवाळे यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेच्या जीवाला धोका आहे”, असंही रुपाली पाटील म्हणाल्या आहेत. एकीकडे राहुल शेवाळे म्हणतात की या महिलेचा दाऊदशी संबंध आहे. तर मग राहुल शेवाळे आणि या महिलेचे जवळचे संबंध होते. अगदी वरचेवर बोलणं व्हायचं याचा अर्थ राहुल शेवाळे यांनी दाऊदतच्या हस्तकाशी संबंध ठेवले आणि तिला देशातील अंतर्गत माहिती पुरवली, असा अर्थ घ्यायचा का?, असा सवाल रुपाली पाटील म्हणाल्या आहेत.

शेवाळे यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेचा दाऊदशी संबंध नाही. पण जर शेवाळे तसा आरोप करत असतील तर शेवाळेंनी देशाच्या विरोधात काम केलं, असं म्हणत शेवाळेंवरच कारवाई व्हायला पाहिजे, असं रुपाली पाटील म्हणाल्या आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: NCP Leader Rupali Patil Thombre slams Shinde Camp MP Rahul Shewale check details on 25 December 2022.

हॅशटॅग्स

#MP Rahul Shewale(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x