21 February 2025 6:03 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

राज्यपाल आणि भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदींनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाचा संताप, आज पुणे बंद!

Pune Bandh

Pune Bandh | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधानं केली होती. यानंतर अनेक संघटना आणि राजकीय पक्षांनी याविरोधात आक्रमक भूमिका घेतली. याच पार्श्वभूमीवर आज मंगळवारी पुणे बंदची हाक देण्यात आली आहे. पुणेबंदमुळे शहरातील वाहतूक मार्गही बदलले आहेत. त्यामुळे घरातून बाहेर पडण्याआधी या बदलांबद्दल एकदा माहिती घेणं आवश्यक आहे.

मूकमोर्चा निघणार
पुणे शहरातील डेक्कन जिमखाना येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मूकमोर्चाला सुरुवात होणार आहे. डेक्कन जिमखाना, अलका चित्रपटगृह चौक, मार्गे लक्ष्मी रस्त्याने बेलबाग चौकातून लालमहालपर्यंत हा मूकमोर्चा काढण्यात येणार आहे. या काळात बाजारपेठेतील सर्व दुकानं दुपारी 3 वाजेपर्यंत बंद ठेवली जाणार आहेत.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वक्तव्याविरोधात काढण्यात येणाऱ्या मोर्चात अपमानास्पद घोषणांवर बंदी घालण्यात आली आहे. पुणे बंदच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. शहर पोलीस दल, गृहरक्षक दलाचे जवान, राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या आणि स्थानिक पोलीस ठाणे, गुन्हे शाखा पथकेही तैनात करण्यात आलेली आहेत. पुण्यात निघणाऱ्या मूक मोर्चाच्या मार्गावर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचं देखील लक्ष असणार आहे. गोंधळ वा कायदा सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी पोलिसांकडून हा कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Pune Bandh today effect in city check details on 13 December 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Pune Bandh(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x