17 April 2025 10:41 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NTPC Green Energy Share Price | खरेदीनंतर संयम ठेवा, श्रीमंत करू शकतो हा शेअर, टार्गेट जाणून घ्या - NSE: NTPCGREEN Vodafone Idea Share Price | तब्बल 66 टक्के परतावा मिळेल, पेनी स्टॉक फोकसमध्ये, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA SBI Mutual Fund | नोकरदारांनो, डोळे झाकुन पैसे गुंतवा या SBI फंडात, एसआयपी वर दिला 1,04,23,471 रुपये परतावा EPFO Pension Amount | तुमचा बेसिक पगार किती आहे? खाजगी कंपनी पगारदारांना महिना 6,429 रुपये पेन्शन मिळणार, अपडेट आली Gratuity on Salary | खाजगी कंपनी पगारदारांच्या खात्यात ग्रेच्युटीचे 4,03,846 रुपये जमा होणार, फायद्याची अपडेट जाणून घ्या Horoscope Today | 17 एप्रिल 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा पेनी स्टॉकमध्ये तेजी, जोरदार खरेदी, पुढची टार्गेट प्राईस किती? - NSE: GTLINFRA
x

स्वयंघोषित राष्ट्रीय कीर्तनकार सुनीता आंधळे आणि शिंदे गटाचं कनेक्शन समोर येतंय, प्रकरण भाजप-शिंदे गटावर शेकणार?

Shinde Camp

Shinde Camp Connection Sunita Andhale | हिंदू धर्मातील देवी-देवता आणि संतांबद्दल सुषमा अंधारे यांनी काही वर्षांपूर्वी केलेल्या विधानांवरून महाराष्ट्रात सध्या वाद निर्माण झालाय. वास्तविक हा व्हिडिओ २००९ मधील असून त्याचा शिवसेना पक्षाशी काहीही संबंध नव्हता, तसेच २००९ पासून या व्हिडिओवर व्यक्त न होणारी राजकीय स्वयंघोषित कीर्तनकार आणि वारकरी सध्या व्यक्त होताना दिसत आहेत. शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेत्या सुषमा अंधारे यांच्याविरुद्ध काही वारकरी संघटना आक्रमक झाल्या असून त्यात मोजकेच लोकं दिसत असले तरी त्यांना प्रसिद्धी देण्याचे प्रकार सुरु झाले आहेत. एकूण विषय पुरस्कृत असल्याचं म्हटलं जातंय. आज ठाण्यात निषेध यात्रा काढण्यात येणार आहे. यानिमित्ताने ठाणे बंदची हाक देण्यात आली आहे.

‘हिंदुत्व संपवण्याचा विडा उलचलेल्ल्या निर्बुद्ध बाईने छळ मांडला आहे,’ असा आरोप करत भाजपच्या जवळील राजकीय वारकरी संघटना सुषमा अंधारेंविरुद्ध आक्रमक झाल्या आहेत. विशेष म्हणजे निषेध यात्रा करणाऱ्या वारकऱ्यांकडून छत्रपती शिवाजी महाराज आणि महापुरुषांबद्दलच्या आक्षेपार्ह विधानांवर बोलण्यास चुप्पी साधली आहे.

सुषमा अंधारेंच्या वक्तव्याविरोधात डोंबिवली बंदची हाक देण्यात आली आहे. मात्र या मोर्चाला मनसेनं विरोध केला आहे. सुषमा अंधारेंच्या वक्तव्याचा निषेध करत आहोत. मात्र बंद करून जनतेला वेठीस धरणं चुकीचं असल्याची भूमिका मनसेचे आमदार राजू पाटील यांनी मांडत या बंदला विरोध केला. सुषमा अंधारे यांच्या वक्तव्याचा निषेध मात्र बंद करून जनतेला वेठीस धरणे चुकीचे आहे. हा बंद मागे घ्यावा असाच बंद छत्रपती शिवरायांच्या बद्दल वादग्रस्त वक्तव्य करताना का केला नाही असा प्रतिसवाल मनसे आमदार राजू पाटील यांनी करत डोंबिवली बंदला विरोध केला आहे. त्यामुळे हा बंद कितपत यशस्वी होईल याबाबत शंका आहे.

शिंदे गट कनेक्शन :
स्वयंघोषित यु-ट्युब कीर्तनकार सुनीता आंधळे यांचे मानस भाऊ हे शिंदे गटाचे जिल्हापरिषद सदस्य असून ते कोपर्डी आणि शिर्डी विधानसभा क्षेत्राचे संपर्क प्रमुख देखील आहेत. युवासेनेच्या महिला पदाधिकारी अयोध्या पौळ पाटील यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. त्यामुळे या स्वयंघोषित यु-ट्युब कीर्तनकार सुनीता आंधळे यांना कोणी राजकीय सुपारी देऊन, ते व्हिडिओ स्थानिक प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींमार्फत बातम्यांमध्ये आणले जातं आहेत का अशी चर्चा सुरु झाली आहे. तसेच भाजप आणि शिंदे गटाशी संबंध असलेले राजकीय १०-२० स्वयंघोषित कीर्तनकार आणि वारकरी दिंड्या काढून ‘राज्यभर मोठ्याप्रमाणात” असे स्पॉन्सर मथळे छापण्याचे बालिश राजकीय प्रकार मागील २-३ सूर झाले आहेत. अनेक युट्युब कीर्तनकार फॉलोवर्स वाढावे म्हणून हे प्रकार करत असून त्यात शहाणी प्रसार माध्यमं देखील फसत आहेत हे आश्चर्य म्हणावं लागेल. सुषमा अंधारे यांच्या २००९ मधील व्हिडिओवर अनेक स्वयंघोषित युट्युब कीर्तनकार तसेच राजकीय वारकरी स्वतःचे फॉलोवर्स वाढविण्यासाठी २०२२ मध्ये धडपडत असल्याचं पाहायला मिळतंय आणि प्रसार माध्यमं ते स्थानिक प्रतिनिधींच्या मार्फत आंधळेपणाने छापून आणत आहेत.

फेसबुक, यूट्यूब वर मोठ्या प्रमाणावर स्वयघोषित कीर्तनकारांचा आकडा का वाढतोय
मागील १-२ वर्षांपासून यूट्यूब वर मोठ्या प्रमाणावर स्वयघोषित कीर्तनकारांचा आकडा का वाढतोय. त्यामागे आर्थिक कारणं देखील आहेत. कॉमेडी म्हणजे करमणूक म्हणून अपलोड केल्या जाणाऱ्या व्हिडिओला युट्युब मोठ्या प्रमाणावर पैसे देतं. त्यामुळे अशाप्रकारचे जास्तीत जास्त व्हिडिओ अपलोड केले जातात. त्यासाठी स्पॉण्डसर्ड कार्यक्रम देखील केले जातात. अशा कार्यक्रमाची स्थानिक तरुणांना भनक लागताच ते देखील मोबाईल रेकॉर्डिंग करून स्वतःच्या युट्युब चॅनेलवर संपूर्ण व्हिडिओ आणि शॉर्ट्स टाकून कमाई करत असल्याचं आकडेवारी सांगते. त्याचा आता राजकीय उपयोग करून स्वतःचे फॉलोवर्स वाढवण्यासाठी देखील होतोय असं पाहायला मिळतंय. कीर्तनकारांना ऐकायला येणाऱ्यांना संबंधित कीर्तनकार किती मोठी कमाई करतोय याची कल्पनाही नसते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Shinde Camp Connection Sunita Andhale viral on social media check details on 17 December 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Sunita Andhale(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या