शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख दोन नंबर धंदे वाले, गंभीर आरोप करत सोलापुर उपजिल्हाप्रमुख मनोज पवार शिंदे गटातून ठाकरेंच्या शिवसेनेत

Shinde Camp Leaders Exit | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला सोलापुरात मोठा धक्का बसला आहे. एकनाथ शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख मनोज पवार यांनी आज ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला. शिंदे गटासह महाराष्ट्र नवनिर्माण सेना, भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस पदाधिकाऱ्यांसह २१ जणांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
शिंदे गटातून ठाकरे गटात सामील झालेल्या मनोज पवार यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षातील पदाधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. एकनाथ शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख हे एकदम निष्क्रिय माणूस आहेत. आपली पोळी शेकून घेण्यासाठी हे लोक शिंदे गटात गेले आहेत. या सर्वांचे दोन नंबरचे धंदे आहेत. ते सांभाळण्यासाठी तसेच सत्तेमुळे ते शिंदे गटात सामील झाले आहेत. शिंदे गट हा दोन वर्ष देखील टिकणार नाही. यांची लवकरच माती होणार आहे, अशा शब्दांत पवार यांनी सोलापुरातील शिंदे गटावर घाणाघात केला.
शिवसेनेत प्रवेश केलेले हे सर्व पदाधिकारी अक्कलकोट तालुक्यातील आहेत. काही दिवसांपूर्वी अक्कलकोटमधील अख्खी शिवसेना शिंदे गटात सामील झली होती. त्यानंतर काही दिवसांतच शिवसेनेने शिंदे गटाला दणका दिला आहे, त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाने शिंदे गटाला धोबीपछाड दिल्याचे मानले जात आहे.
औरंगाबादमध्ये मध्येही शिंदे गटाला धक्का :
दरम्यान, ग्रामपंचयात आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहता उद्धवसेने जिल्ह्यात पक्ष प्रवेशांचा धडाका लावला आहे. काल मुंबईत उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत वैजापूरचे राष्ट्रवादीचे माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगांवकर व पैठणचे भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष आपल्या समर्थक व इतर पदाधिकाऱ्यांसह शिवसेनेत दाखल झाले. राष्ट्रवादी, भाजपला दणका दिल्यानंतर आता जिल्ह्यात शिंदेसेनेला झटका देण्यात उद्धवसेना यशस्वी झाली आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Shinde Camp Leaders Exit in Solapur check details on 15 December 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
Vedanta Share Price | यापूर्वी 10,623 टक्के परतावा दिला, पुढे अजून कमाई होणार, फायद्याची अपडेट आली - NSE: VEDL
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअर तुमच्या पोर्टफोलिओसाठी फायदेशीर आहे का? ही आहे लॉन्ग टर्म टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB