21 November 2024 11:50 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

व्हिडिओ 2009 मधील आणि ठाणे-डोंबिवलीकरांना वेठीस धरलं 2022 मध्ये, 14 वर्ष झोपलेल्या शिंदे पिता-पुत्राला लोकांकडून प्रश्न

Shinde Camp

Shinde Camp Thane Bandha | हिंदू धर्मातील देवी-देवता आणि संतांबद्दल सुषमा अंधारे यांनी काही वर्षांपूर्वी केलेल्या विधानांवरून महाराष्ट्रात सध्या वाद निर्माण झालाय. वास्तविक हा व्हिडिओ २००९ मधील असून त्याचा शिवसेना पक्षाशी काहीही संबंध नव्हता, तसेच २००९ पासून या व्हिडिओवर व्यक्त न होणारी राजकीय स्वयंघोषित कीर्तनकार आणि वारकरी सध्या व्यक्त होताना दिसत आहेत. शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेत्या सुषमा अंधारे यांच्याविरुद्ध काही वारकरी संघटना आक्रमक झाल्या असून त्यात मोजकेच लोकं दिसत असले तरी त्यांना प्रसिद्धी देण्याचे प्रकार सुरु झाले आहेत. एकूण विषय पुरस्कृत असल्याचं म्हटलं जातंय. आज ठाण्यात निषेध यात्रा काढण्यात येणार आहे. यानिमित्ताने ठाणे बंदची हाक देण्यात आली आहे.

‘हिंदुत्व संपवण्याचा विडा उलचलेल्ल्या निर्बुद्ध बाईने छळ मांडला आहे,’ असा आरोप करत भाजपच्या जवळील राजकीय वारकरी संघटना सुषमा अंधारेंविरुद्ध आक्रमक झाल्या आहेत. विशेष म्हणजे निषेध यात्रा करणाऱ्या वारकऱ्यांकडून छत्रपती शिवाजी महाराज आणि महापुरुषांबद्दलच्या आक्षेपार्ह विधानांवर बोलण्यास चुप्पी साधली आहे.

बंदला मनसेचा विरोध :
सुषमा अंधारेंच्या वक्तव्याविरोधात डोंबिवली बंदची हाक देण्यात आली आहे. मात्र या मोर्चाला मनसेनं विरोध केला आहे. सुषमा अंधारेंच्या वक्तव्याचा निषेध करत आहोत. मात्र बंद करून जनतेला वेठीस धरणं चुकीचं असल्याची भूमिका मनसेचे आमदार राजू पाटील यांनी मांडत या बंदला विरोध केला. सुषमा अंधारे यांच्या वक्तव्याचा निषेध मात्र बंद करून जनतेला वेठीस धरणे चुकीचे आहे. हा बंद मागे घ्यावा असाच बंद छत्रपती शिवरायांच्या बद्दल वादग्रस्त वक्तव्य करताना का केला नाही असा प्रतिसवाल मनसे आमदार राजू पाटील यांनी करत डोंबिवली बंदला विरोध केला आहे. त्यामुळे हा बंद कितपत यशस्वी होईल याबाबत शंका आहे.

ठाणे-डोंबिवलीत लोकांचे हाल :
दरम्यान, २००९ मधील व्हिडिओ आता कसले मोर्चे असा प्रश्न ठाण्यातील लोकं विचारात आहेत. केवळ शिंदे पिता-पुत्राच्या राजकीय हट्टापायी आम्हाला वेठीस धरलं जातंय असा संताप ठाणे-डोंबिवलीतील लोकं व्यक्त करत आहेत. तर अनेकांनी हे शिंदे समर्थक मागील १४ वर्ष झोपले होते का असा प्रश्न देखील उपस्थित केला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Shinde Camp protest at Thane Dombivali check details on 17 December 2022.

हॅशटॅग्स

#Shinde Camp(9)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x