14 November 2024 11:31 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट, कमाईची मोठी संधी - NSE: HAL Vedanta Share Price | वेदांता कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, मालामाल करणार शेअर - NSE: VEDL Tata Motors Share Price | रॉकेट तेजीने परतावा देणार टाटा मोटर्स शेअर, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATAMOTORS NHPC Share Price | NHPC शेअर चार्टवर महत्वाचे संकेत, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: NHPC EPFO Money | खाजगी कर्मचाऱ्यांचा बेसिक पगार वाढणार, प्रतिमहा मिळणारं 21000, जाणून घ्या आणखीन फायदे - Marathi News Post Office Scheme | आता 100 रुपये वाचवून तयार होईल लाखोंचा फंड, पोस्टाची खास योजना तुम्हाला श्रीमंत बनवू शकते - Marathi News Property Buying | प्रॉपर्टी खरेदी करायची असेल तर, सर्वात आधी या 4 गोष्टींवर लक्ष केंद्रित करा, नाहीतर नुकसान होईल - Marathi News
x

निषेध नोंदवणाऱ्या व्यक्तीने समोरून शाईफेक केली, चंद्रकांतदादा म्हणाले 'हिंमत असेल तर समोर या!' नेटिझन्सच्या प्रतिक्रिया

Chandrakant Patil

Minister Chandrakant Patil | महाराष्ट्राचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर अज्ञात व्यक्तीकडून शाईफेक करण्यात आली आहे. चंद्रकांत पाटील यांनी नुकतंच डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. यामुळं अवघ्या राज्यात विरोधक आक्रमक झाले होते. आज सकाळीच पिंपरीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात विविध पक्षांनी आंदोलन करून पाटील यांचा निषेध केला होता. त्यानंतर पिंपरी-चिंचवडमध्येच त्यांच्यावर शाईफेकीची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेवर भाजपाकडून प्रतिक्रिया उमटत आहेत.

चंद्रकांत पाटील यांची घटनेनंतर पहिली प्रतिक्रिया :
दरम्यान, या घटनेनंतर चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. चंद्रकांतदादा माझ्यावर झालेली शाईफेक हा भ्याडपणा आहे. मी माझं पोलीस संरक्षण काढून कार्यक्रमाला जायला तयार आहे हिंमत असेल तर समोर या असं आव्हानच चंद्रकांत पाटील यांनी दिलं आहे. श्री मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सवाचा कार्यक्रम होता. त्यासाठी चंद्रकांत पाटील हे आले आहेत. त्यावेळी त्यांच्यावर अज्ञातांकडून शाईफेक करण्यात आली. महात्मा ज्योतिराव फुले आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी जे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं, त्यानंतर त्यांनी दिलगिरीही व्यक्त केली होती. तरीही हा शाईफेकीचा प्रकार पिंपरीत घडला.

चंद्रकांत पाटील यांच्या प्रतिक्रियेवर नेटिझन्सच्या प्रतिक्रिया :
संबंधित अज्ञात व्यक्तीकडून थेट पोलीस आणि कार्यकर्त्यांचा गराडा असताना समोरून शाईफेक करण्यात आली आहे. मात्र तरी चंद्रकांतदादा यांनी पहिली प्रतिक्रिया देताना म्हटले की “हिंमत असेल तर समोर या” आणि या विधानावरून नेटिझन्स निरनिराळ्या प्रतिक्रिया देतं आहेत. त्यामध्ये अनेकांनी असं म्हटलं आहे की, संबंधित अज्ञात व्यक्तीने समोर येऊन ही निषेधाची प्रतिक्रिया दिली आहे तरी चंद्रकांत पाटील “हिंमत असेल तर समोर या” असं आव्हान देणं म्हणजे अजब असल्याचं म्हटलं आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: State minister Chandrakant Patil reaction after ink thrown at Pune check details on 10 December 2022.

हॅशटॅग्स

#Chandrakant Patil(123)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x