5 February 2025 2:36 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Income Tax on Salary | नवीन टॅक्स प्रणालीनुसार 1,275,000 रुपयांचे पॅकेज आणि अतिरिक्त इन्सेन्टिव्ह वर किती टॅक्स लागेल Penny Stocks | वडापाव पेक्षा स्वस्त किंमतीचा पेनी शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SARVESHWAR Penny Stocks | श्रीमंत करणार हा स्वस्त शेअर, पाच दिवसांत 65 टक्के परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 51259 RVNL Share Price | रेल्वे शेअर्स तेजीत, RVNL शेअर फोकसमध्ये आला, कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Post Office Scheme | महिना खर्च भागेल, दरमहा 9,250 रुपये देईल ही पोस्ट ऑफिस योजना, नक्की फायदा घ्या EPFO Passbook | खाजगी पगारदरांनो इकडे लक्ष द्या, EPF रक्कमेवर मिळणार अधिक व्याज, ईपीएफओ अपडेट जाणून घ्या IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, पटापट प्राईस बँड सह इतर डिटेल्स जाणून घ्या
x

आशुतोष यांच्या पाठोपाठ आशीष खेतान यांचा सुद्धा 'आप' पक्षाला रामराम

नवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे वरिष्ठ नेते आशुतोष काही दिवसांपूर्वी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर काही दिवसातच आप’ला दुसरा धक्का बसला आहे. पक्षातील अजून एक मोठे नेते तसेच पत्रकार आशीष खेतान यांनी सुद्धा राजीनामा दिला आहे.

आशीष खेतान अनेक दिवसांपासून पक्षाच्या कामकाजात सक्रिय पाने सहभागी होत नव्हते तसेच त्यांनी पक्षाच्या कामाकडे संपूर्णपणे कानाडोळा केला होता. त्यांनी १५ ऑगस्टलाच राजीनामा दिल्याचं वृत्त पसरलं होत. परंतु त्यांनी स्वतःच राजीनामा देण्यामागचं कारण ट्विट करून स्पष्ट केली आहेत.

ट्विट करताना आशीष खेतान यांनी म्हटलं आहे की, ‘सक्रीय राजकारणात मी सहभागी नाहीये, आता माझं संपूर्ण लक्ष हे वकिली क्षेत्राकडे आहे, तसेच आप’मधील माझा प्रवास संस्मरणीय होता. आता हा प्रवास संपुष्टात आला असून वैयक्तिक कारणामुळे पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याचे त्यांनी सांगितले.. यावर अजून तरी आम आदमी पक्षातील वरिष्ठांकडून अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. आशुतोष हे मूळ पत्रकारिता क्षेत्रातून राजकारणात आले होते आणि आम आदमी पक्षात सामील होण्यापूर्वी ते प्रसिद्ध हिंदी वृत्तवाहिनीत कार्यरत होते.

हॅशटॅग्स

#Aap(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x