5 November 2024 4:24 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 3 मेटल शेअर्स 40% पर्यंत परतावा देणार, टार्गेट प्राईस नोट करा - TATASTEEL Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 70% पर्यंत कमाई होणार - NSE: TATAPOWER Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित या 5 शेअर्ससाठी BUY रेटिंग, मिळेल 66% पर्यंत परतावा - NSE: ASHOKLEY Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON NBCC Share Price | NBCC कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, कमाईची संधी - NSE: NBCC Horoscope Today | दिवसभरात मिळेल सुखद बातमी; धनलाभाचा देखील जुळेल योग, यामधील तुमची रास कोणती पहा - Marathi News
x

मल्टिप्लेक्स विरोधातील मनसेच्या आंदोलनाचा सामान्यांना मोठा फायदा होणार

मुंबई : काही दिवसांपूर्वी मनसेच्या कार्यकर्त्यांनी राज्यभर मल्टिप्लेक्स थिएटरमधील सामान्यांना न परवडणाऱ्या खाद्यपदार्थांच्या अवाजवी किंमती विरोधात आंदोलन छेडलं होत. विशेष म्हणजे मुंबई उच्च न्यायालयाने सुद्धा मल्टिप्लेक्स थिएटरमधील खाद्यपदार्थांच्या अवाजवी किंमतीवरून राज्यसरकारला धारेवर धरलं होत आणि मल्टिप्लेक्स मालकांना ५ रुपयांचे पॉपकॉर्न २५० रुपयांना विकण्याचा अधिकार कोणी दिला असा प्रश्न उपस्थित केला होता.

आज त्याच आंदोलनाला यश आल्याची चिन्ह आहेत. कारण मनसेच्या आक्रमक आंदोलनानंतर आज मल्टिप्लेक्स चालकांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली आणि त्यांच्यासोबत तब्बल २ तास बैठक घेऊन अनेक विषयांवर सविस्तर चर्चा केली आहे. चर्चेदरम्यान माघार घेण्यास मनसेने स्पष्ट नकार दिला आहे.

अमेय खोपकर यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे राज्यातील सगळ्या मल्टीप्लेक्सचे सीईओ आज राज ठाकरेंना भेटलेत. मल्टीप्लेक्समधील महागड्या खाद्यपदार्थावर तोडगा निघणार आहे. मल्टीप्लेक्समध्ये विकली जाणारी पाण्याची बाटली, चहा-कॉफी, वडा-समोसा आणि पॉपकॉर्नचे दर ५० रुपयांच्या आत असतील जे सामान्यांना परवडतील. आमच्याकडून याबाबतचे सगळ्या मल्टीप्लेक्सला २-३ दिवसात लेखी आदेश दिले जातील निया तसं न झाल्यास पुन्हा आंदोलन तीव्र केलं जाईल अशी माहिती दिली.

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मांडलेले आक्षेप आणि केलेल्या सूचना खालील प्रमाणे;

१.  मल्टिप्लेक्स चित्रपटगृहात खाद्य पदार्थांचे दर अवाजवी असतातच पण प्रेक्षकांना विकत न घेतलेल्या पदार्थांचे बिल आकारण्याचे प्रकार सर्रास आढळतात.

२.  चित्रपटगृहातील कर्मचारी वर्ग प्रेक्षकांशी उर्मटपणे वागतो ह्या तक्रारी देखील अनेकवेळा आल्या आहेत.

३. मध्यंतराचा कालावधी इतका छोटा असतो की झालेली फसवणूक प्रेक्षकाला चित्रपटगृह सोडल्यावर लक्षात येते आणि ह्यासंबंधी तक्रार करण्याचा मार्ग उपलब्ध नसतो.

४.  त्यामुळे चित्रपटगृहात राष्ट्रगीतानंतर पडद्यावर ह्यासंबंधीची तक्रार कुठे करावी ह्याचा तपशील दाखवावा जेणेकरून प्रेक्षक नाडला जाणार नाही.

५.  चहा, कॉफी, पाण्याची बाटली, सामोसा,पॉपकॉर्न आणि बटाटा वडा हे पदार्थ जे सर्वसाधारणपणे चित्रपटगृहात प्रेक्षकांकडून खाल्ले जातात त्यांचे दर माफक असावेत, बाकीचे पदार्थ किती किमतीला विकावेत ह्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आक्षेप असण्याचं कारण नाही

६.  लहान मुलांसाठीच अन्न, मधुमेही आणि हृदयरोगी ह्यांना बाहेरील अन्नपदार्थ चित्रपटगृहात आणण्याची परवानगी मिळायलाच हवी

राजसाहेबांनी केलेल्या सर्व सूचना मल्टिप्लेक्स व्यवस्थापनाने मान्य केल्या. आणि खालील मुद्द्यांवर येत्या काही दिवसात संपूर्ण महाराष्ट्रात अंमलबजावणी करण्याचं त्यांनी मान्य केलं.

१.  पाण्याची बाटली, चहा, कॉफी, पॉपकॉर्न, सामोसा आणि बटाटावडा ह्यांचे दर पन्नास रुपयाच्या आसपास ठेवले जातील

२.  प्रेक्षकांना कोणतीही तक्रार असल्यास त्याचं निवारण करण्यासाठी कोणास संपर्क करावा ह्याचा तपशील चित्रपटगृहात पडद्यावर दाखवला जाईल

३.  लहान मुलं, मधुमेही आणि हृदयरोगी ह्यांना त्यांच्यासाठी आवश्यक अन्नपदार्थ चित्रपटगृहात आणण्यावर कोणताही मज्जाव केला जाणार नाही.

ह्या बैठकीस राज ठाकरें बरोबर महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर, शालिनी ठाकरे, पुण्यातील माजी नगरसेवक आणि पुण्यात मल्टिप्लेक्स विरोधात आंदोलन छेडणारे किशोर शिंदे हे देखील उपस्थित होते.

मल्टिप्लेक्सच्या प्रतिनिधीं सोबत बैठक पार पडली असली तरी मनसेच्या वरील सर्व प्रमुख मुद्द्यांची अंमलबजावणी येत्या काही दिवसांत झालेली असेल, ह्याची खातरजमा महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वतः करून घेईल अशी प्रतिक्रिया मनसेकडून देण्यात आली आहे.

हॅशटॅग्स

#Raj Thackeray(53)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x