5 November 2024 7:05 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, पुन्हा तेजीचे संकेत - NSE: RVNL SJVN Share Price | SJVN शेअर रॉकेट होणार, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SJVN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम- NSE: RELIANCE Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 3 मेटल शेअर्स 40% पर्यंत परतावा देणार, टार्गेट प्राईस नोट करा - TATASTEEL Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 70% पर्यंत कमाई होणार - NSE: TATAPOWER Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित या 5 शेअर्ससाठी BUY रेटिंग, मिळेल 66% पर्यंत परतावा - NSE: ASHOKLEY
x

शिवसेनेने भविष्यात केवळ डिपॉझिट वाचवण्याचं मशिन घ्यावं लागेल, शेलारांची बोचरी टीका.

मुंबई : गुजरात निवडणुकीचे अंतिम निकाल हाती आल्यावर मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी शिवसेनेवर बोचरी टीका केली आहे. मुंबई भाजप ने गुजरात विजय साजरा करण्यासाठी मुद्दाम हुन ‘सामना’ पथकाचे ढोल वाजवून विजय जल्लोष साजरा केला. पुढे पत्रकारांना प्रतिक्रिया देताना त्यांनी शिवसेनेला असाही सणसणीत टोला लगावला कि ‘शिवसेनेच्या सर्व उमेदवारांचे डिपॉझिट ही जप्त झाले आहे; त्यामुळे भविष्यात कलानगरवाल्यांना डिपॉझिट वाचवण्याचे मशीन विकत घ्यावे लागेल. दुसऱ्याच्या घरी पोरगं झालं तरी हे आनंद साजरा करतात. ज्या काँग्रेसला मतं मिळाली की ज्यांना आनंद होतो त्यांचा अंत काँग्रेसच्याच रस्त्यावर होईल.’ अशी घणाघाती टीका शेलारांनी केली आहे’.

सामना या वृत्तपत्रातून शिवसेनेने गुजरात निवडणुकीवरून मोदी सरकार विविध विषयातून टीका केली. इतकंच न्हवे तर वारंवार काँग्रेस आणि राहुल गांधींची स्तुती ही केली होती.

त्यात अजून भर म्हणजे किरीट सोमैय्यानी सिध्द ट्विट करून उध्दव ठाकरेंन वर बोचरी टीका केली कि ‘गुजरात आणि हिमाचलमध्ये भाजप पडण्याचे दिवा स्वप्न पाहणारे आमचे मित्र उद्धवजी ठाकरे आणि शिवसेनेला आत्ता तरी जाग येणार , जमिनीवर येणार, ही देवाला प्रार्थना….

आशिष शेलार आणि किरीट सोमैय्या नेहमीच संधी मिळताच शिवसेनेवर आणि उध्दव ठाकरेंवर बोचरी टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x