कर्नाटक : अमित शहा कर्नाटक विधानसभा निवडणुकीत येडियुरप्पा की सिद्धरमैय्या या नावामुळे पुरते गोंधळे आहेत. पत्रकार परिषदेत ते सडकून टीका करतात, पण नाव स्वतःच्याच माजी मुख्यमंत्र्यांचं घेतात. जेंव्हा स्तुती करतात तेव्हा ते काँग्रेसचे विद्यमान मुख्यमंत्री सिद्धरमैय्या यांचं नाव घेत आहेत.
कन्नड भाषा आणि त्यात कर्नाटकच्या नेत्यांचा नावाचा घोळ. कोण भाजपचा आणि कोण काँग्रेसचा तेच पत्रकार परिषदे दरम्यान कळेनासं झालाय भाजप अध्यक्ष अमित शहा यांना.
पत्रकार परिषदेत ते सडकून टीका करतात, पण नाव स्वतःच्याच माजी मुख्यमंत्र्यांचं घेतात. जेंव्हा स्तुती करतात तेव्हा ते काँग्रेसचे विद्यमान मुख्यमंत्री सिद्धरमैय्या यांचं नाव घेत आहेत. काँग्रेसचे स्थानिक नेते सुद्धा गोंधळात सापडले आहेत की, दिल्लीतले नेते नक्की पक्षाचा प्रचार करत आहेत की अपप्रचार ?
जय नेते हिंदीत बरोबर बोलले तर कन्नडमध्ये तेच वाक्य अनुवादित करणारा काही भलतंच बोलत आहे, कारण त्याला हिंदी येत नाही आहे. एकूणच कर्नाटक विधानसभेचा प्रचार जोर पकडू लागला आहे आणि इथे कन्नड भाषेने भाजपचे दिल्लीतील हिंदी किंव्हा गुजराती भाषिक नेते मंडळी पूर्ती गोंधळली आहेत असच चित्र आहे.
अमित शहांचा हाच व्हिडिओ बघा, टीका करत होते सिद्धरमैय्या सरकारवर पण नाव घेतल ‘येडियुरप्पा’ यांचं जे पुन्हां दुसऱ्याने लक्षात आणून दिल.






























