15 January 2025 10:56 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन शेअरबाबत मोठे संकेत, तज्ज्ञांकडून SELL रेटिंग, नेमकं कारण काय - NSE: NTPCGREEN HDFC Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांनो महिना 2000 रुपयांची गुंतवणूक करा, मिळाले 4 कोटी रुपये परतावा Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या NPS Calculator | तुमच्या पत्नीमुळे महिन्याला 44,793 रुपये पेन्शन मिळेल आणि 1 कोटी 12 लाख रुपये परतावा देईल ही योजना IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, मिळेल 45 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL
x

पटकवता पटकवता भाजपने 'पटवूनच' टाकली: सविस्तर

Udhav Thackeray, Shivsena, BJP Alliance, Amit Shah, Narendra Modi

मुंबई : शिवसेनेच्या स्वबळाच्या घोषणेनंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी राज्यात आयोजित केलेल्या एका पक्षीय मेळाव्यात शिवसेनेचं नाव न घेता, जे मित्र पक्ष सोबत येणार नाहीत त्यांना ‘पटकून टाकू’ अशी थेट धमकी दिली होती. परंतु, शिवसेनेचा इतिहास अनुभवल्याने त्यांना पटवणे अधिक सोपं असल्याचं जाणवलं आणि भाजपाची टीम शिवसेना नेतृत्वाला राजी करण्यासाठी कामाला लावली होती.

अखेर भाजपच्या त्या प्रयत्नांना यश आलं असून, आज युतीची अधिकृत घोषणा होणार आहे. उद्धव ठाकरे आणि अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर घोषणा होणार आहे. केंद्रात आणि राज्यात डझनभर मंत्रिपद उपभोगून सतत सहकारी पक्ष भाजपवर विखारी आगपाखड करणारे शिवसेना पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे स्वबळाचा नारा देऊन पलटले आहेत. दरम्यान संपूर्ण सत्ताकाळ राजीनामा नाट्यात व्यर्थ घालवल्यानंतर मागील काही महिन्यापासून अनेक वेळा स्वबळाच्या जाहीर घोषणा देखील स्वतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केल्या आहेत.

परंतु, मागील काही दिवसांपासून शिवसेनेबद्दल अनेक नकारात्मक निवडणूकपूर्व सर्व्ह प्रसिद्ध होत आहेत. त्यामुळे वरवर दिसणारी देहबोली आतून भेदरल्यासारखी होती याचा प्रत्यय आज आला आहे. स्वतः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेच निवडणुकीआधी चालविचल झाल्याचं हे उदाहरण म्हणावं लागेल. कारण मागील २-३ वर्षांपासून उद्धव ठाकरे भविष्यात शिवसेना सर्व निवडणुका स्वबळावर लढवेल अशी घोषणा करत आले आहेत. विशेष म्हणजे त्यांनी ही घोषणा करताना शिवसैनिकांकडून जाहीरपणे हात वर करत वचन घेतलं होतं.

मात्र शिवसैनिकांकडून घेतलेल्या स्वबळाच्या जाहीर वाचनाला स्वतःच तीरांजली दिल्याने शिवसैनिक तोंडघशी पडले आहेत. स्वतःच्याच कार्यकर्त्यांकडून घेतलेल वचन स्वतःच पक्षाध्यक्षांनी मोडल्याने आता बोलणार तरी कोण अशी अवस्था कार्यकर्त्यांची झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे पक्षाध्यक्षांच्या स्वबळाच्या घोषणेमुळे आपापल्या प्रभागात कामाला लागलेल्या कार्यकर्त्यांचा पुरता हिरमोड झाल्याचे शिवसैनिक बोलून दाखवत आहेत.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)#udhav Thakarey(405)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x