राजमार्ग: गांडूळवाड एक दुर्गम आदिवासी गाव आणि अमित ठाकरेंचा दौरा : सविस्तर
शहापूर : राज्यातील अनुभवी आणि वरिष्ठ नेत्यांचा म्हणजे शरद पवार असो किंवा बाळासाहेब ठाकरे यांनी मैलोंमैल पायपीट करून आधी महाराष्ट्राचा प्रत्येक कोपरा समजून घेतला होता. राज्यात राजकारणात जर भविष्य घडवायचं असेल तर आधी ग्रामीण महाराष्ट्रातील दुर्गम भागांना भेटी देऊन तो समजून घ्यावा लागतो. राज ठाकरे यांनी सुद्धा तो मार्ग स्वीकारला होता आणि अनेक वर्षांपासून अशा दुर्गम भागांना प्रत्यक्ष भेटी देऊन तिथल्या मूळ अडचणी समजून घेत आले आहेत.
त्याचाच एक भाग म्हणजे राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांनी कालच केलेला शहापूर येथील गांडूळवाड हा दुर्गम भागातील आदिवासी पाड्याचा दौरा. मुंबईपासून तब्बल १२५ किलोमीटरवर वसलेल्या गावात शहराप्रमाणे उपलब्ध सोयीसुविधा आजही येथे जवळपास नसल्यात जमा. वीज आहे ती कधी येईल आणि कधी जाईल याचा पत्ता नाही. सदैव दुष्काळाने ग्रासलेलं आणि रस्ते तसेच दळणवळणाची सोय नसलेलं गाव असच म्हणावं लागेल. इंटरनेटचा या गावाशी काहीही संबंध नाही. त्यात रोजगाराची संधीच उपलब्ध नसल्याने पावसाळा संपताच इथले स्थानिक रोजगाराच्या शोधात काही महिन्यांसाठी घरापासून दूर जातात, असं तिथल्या स्थानिकांसोबत चर्चा केल्यावर समजलं.
पुढे गावातील काही जवाबदार व्यक्तींकडून रोजगाराशी संबंधित विषयावरून चर्चा केल्यावर समजलं की इथे आदिवासी लोकवस्त्या असल्याने शेती हेच मूळ रोजगाराचं साधन होऊ शकतं. परंतु, त्यासाठी आधी मुबलक पाण्यासाठी सिंचन प्रकल्प किंवा धरण असणं गरजेचं आहे. परंतु, स्थानिक लोक प्रतिनिधीच्या मोठ्या धरणाच्या हट्टापायी सर्वकाही अधांतरी आहे. गावकऱ्यांनी अनेक पर्याय सरकारच्या समोर ठेवून, मोठ्या धरणाचा हट्ट करण्यापेक्षा एखादे लहान धरण बनावे यासाठी पुढाकार घेऊन पाठपुरावा केला होता असं समजलं. परंतु, मोठ्या धरणाचे टेंडर सुद्धा मोठे असतात हे स्थानिक लोक प्रतिनिधींना माहित असल्याने गावकऱ्यांचे वास्तववादी पर्याय त्यांना पटत नाही किंवा यांना पटवून घ्यायचे नाहीत, असंच वातावरण आहे.
त्यात दुसरी धक्कादायक बाब या दौऱ्यातील चर्चेत समोर आली ती म्हणजे याच गावाला लागून समृद्धी महामार्ग जाणार होता. परंतु, सदर नियोजित मार्गावर सरकारी बाबूंनी आणि लोक प्रतिनिधीनीं जमिनी आधीच लाटल्याने या मार्गात अनेक अडथळे आणले गेले. अखेर याच सरकारी बाबूंच्या आणि लोक प्रतिनिधींच्या अडथळ्यामुळे नियोजित समृद्धी मार्गच येथून वगळण्यात आला. त्यामुळे भविष्यातील दळणवळणामुळे अपेक्षित असलेली समृद्धी सुद्धा संपुष्टात आली आहे. त्यात प्राथमिक शिक्षण सुद्धा येथे जेमतेम उपलब्ध आहे आणि ते सुद्धा काही सामाजिक संस्थांच्या पुढाकाराने. उच्च शिक्षण आणि कॉलेज हे सर्व केवळ स्वप्नात अनुभवावं अशीच इथली सध्याची परिस्थिती आहे. इतर मूलभूत सोयीसुविधा जरी इथे नसल्या तरी सत्ताधाऱ्यांच्या होर्डिंग्सची येथे काहीच कमी नसल्याचे निदर्शनास येत होते.
त्यामुळे अमित ठाकरे यांनी या दुर्गम भागातील आदिवासी पाड्याला भेट देताच उपस्थिती स्थानिक लोकांनी त्यांच्या अडचणींचा पाढा वाचून दाखवला. या पाड्यातील आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना बोलतं करायचं म्हटल्यावर आधी तुम्हाला त्यांच्यात मिसळावं लागेल अशी तिथली परिस्थिती. कारण कोऱ्या करकरीत कपड्यांमध्ये आलेले पाहुणे पाहून ही मुलं अर्धी घाबरून जातात. अमित ठाकरेंनी ते हेरले आणि त्याच्यात मिसळून खेळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर वातावरण बदललेलं पाहायला मिळालं. त्या आदिवासी शाळेतील विद्यार्थ्यांसोबत त्यांनी काही गमतीशीर खेळ केले. त्यानंतर मनसेकडून या मुलांसाठी थेट अवकाशातील ताऱ्यांचा खोटा का होईना आस्वाद घेता यावा म्हणून ‘प्लॅनेट डोम’ बसवण्यात आला होता. कारण एकच आणि ते म्हणजे या आदिवासी पाड्यातील मुलांना मुंबईतील भव्य नेहरू तारांगण अनुभवणं शक्य नव्हतं. परंतु, या विद्यार्थ्यांनी मात्र त्या ‘प्लॅनेट डोम’ मध्ये पुन्हा पुन्हा जाऊन भरपूर धमाल केली.
त्यानंतर या आश्रम शाळेतील ३८५ विद्यार्थ्यांना अमित ठाकरे यांच्या हस्ते शालेय भेटवस्तू देखील देण्यात आल्या. आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी भेडसावणाऱ्या समस्या अमित ठाकरे यांच्या कानावर टाकल्या आणि त्या राज ठाकरे यांच्याकडे मांडण्याची विनंती केली. स्थानिक लोकं गरीब असले तरी त्यांच्या श्रीमंतीचा अंदाज तेव्हाच आला जेव्हा गावातील एका आदिवासी कुटुंबाने त्यांच्या घरी अमित ठाकरे आणि त्यांच्यासोबत असलेल्या जवळपास २०-२२ जणांची दुपारी जेवणाची सोय केली आणि त्यानंतरच मुंबईवरून आलेल्या या पाहुण्यांना मोठ्या मनाने निरोप दिला. आशा अपेक्षा इतकीच दिसली की ते पुन्हा कधीतरी येतील आणि गांडूळवाड गावासाठी महाराष्ट्र शासनाच्या मार्फत भविष्यात काहीतरी करतील. एक गोष्ट होकाराम्तक म्हणावी लागेल आणि ती म्हणजे मनसेची दुसरी पिढी ‘गावाकडे चला’ म्हणत आधी ग्रामीण महाराष्ट्र समजून घेत आहे.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरला आउटपरफॉर्म रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
- Loan EMI Alert | कर्जबाजारी होण्यापासून वाचायचं असेल तर वर्षाच्या सुरुवातीपासूनच घ्या योग्य काळजी, या टिप्स फॉलो करा
- Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईस अजून घसरणार की तेजी येणार - NSE: SUZLON
- TECNO POP 9 5G | टेक्नो POP 9 5G स्मार्टफोनची बाजारात दमदार एन्ट्री, किंमत केवळ 10,999 रुपये आणि जबरदस्त फीचर्स
- SBI Salary Account | पगारदारांनो, SBI बँकेत सॅलरी अकाउंट ओपन करा, फ्री इन्शुरन्ससहित मिळतील अनेक फायदे
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS