15 November 2024 10:28 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रेटिंग अपग्रेड, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट, कमाईची मोठी संधी - NSE: HAL Vedanta Share Price | वेदांता कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, मालामाल करणार शेअर - NSE: VEDL Tata Motors Share Price | रॉकेट तेजीने परतावा देणार टाटा मोटर्स शेअर, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATAMOTORS NHPC Share Price | NHPC शेअर चार्टवर महत्वाचे संकेत, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: NHPC EPFO Money | खाजगी कर्मचाऱ्यांचा बेसिक पगार वाढणार, प्रतिमहा मिळणारं 21000, जाणून घ्या आणखीन फायदे - Marathi News Post Office Scheme | आता 100 रुपये वाचवून तयार होईल लाखोंचा फंड, पोस्टाची खास योजना तुम्हाला श्रीमंत बनवू शकते - Marathi News
x

Amrinder Singh Plan | अमरिंदर सिंग भाजप प्रवेश करणार नाहीत | पण भाजप पुरस्कृत 'या' योजनेवर काम करणार

Amrinder Singh Plan

चंदीगड, ३० सप्टेंबर | कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी बुधवारीच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. तत्पूर्वी ते भाजपमध्ये सामिल होणार अशा चर्चा रंगल्या होत्या. परंतु, अशी शक्यता फार कमी आहे. कॅप्टन थेट भाजपमध्ये सामिल (Amrinder Singh Plan) होणार नाहीत. भाजपमध्ये जाण्याची कॅप्टन यांची इच्छा नाही. मग, काँग्रेस सोडल्यानंतर भाजपमध्ये न जाता पंजाब कसे साधणार हाच कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा मास्टर प्लॅन आहे.

Captain will not join BJP directly (Amrinder Singh Plan). The captain does not want to join the BJP. Then, after leaving the Congress, Captain Amarinder Singh’s master plan is how to achieve Punjab without joining the BJP :

पुढच्या वर्षीच पंजाबमध्ये विधानसभा निवडणूक होत आहे. अशात 2022 मध्ये कॅप्टन नव्या दमासह पंजाबच्या राजकारणात पुन्हा बाजी मारू शकतील. कॅप्टन यांचे राजकीय सल्लागार नरिंदर भांबरी यांनी नुकताच ‘कॅप्टन फॉर 2022’ या नव्या घोषवाक्यासह पोस्टर जारी करून हे संकेत दिले आहेत. पंजाबमध्ये मुख्यमंत्री पदावरून हटवले गेल्यानंतर कॅप्टन म्हणाले होते, की ते सैनिक आहेत, अपमानित झाल्यानंतर मैदान सोडणार नाही. मग ते मैदान राजकारणाचे का असेना.

मात्र भाजपाला पंजाबमध्ये बेसच नसल्याने अमरिंदर सिंग भाजप प्रवेश करणार नाहीत असं वृत्त आहे, पण ते भाजपाच्या हातातील बाहुलं बनून एक योजना आखात असं वृत्त आहे. त्यानुसार कॅप्टन अमरिंदर सिंग 2 ऑक्टोबर रोजी नवीन संघटना घोषित करण्याच्या तयारीत आहेत. ही संघटना एक बिगर राजकीय संघटना राहील. कॅप्टन यांच्या जवळच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, या संघटनेच्या माध्यमातून दिल्ली सीमेवर सुरू असलेले शेतकरी आंदोलन मिटवले जाणार आहे. त्यानंतर पंजाबमध्ये कॅप्टन यांच्या नवीन पक्षाची घोषणा केली जाईल. अशा पद्धतीने शेतकरी आणि केंद्र सरकार अशा दोघांना आपल्या सोबत घेऊन कॅप्टन डबल माइलेज प्लॅनिंग करत आहेत.

थेट भाजपमध्ये का नाही जाणार?
एकतर भाजपाला पंजाबमध्ये कोणताही आधार नाही आणि पक्ष संघटन तळागाळापर्यंत पोहोचलेलं नाही. त्यात शेतकऱ्यांमध्ये भाजपप्रति प्रचंड राग आहे. परिणामी कॅप्टन भाजपमध्ये गेल्यास शेतकऱ्यांमध्ये नकारात्मक संदेश जाईल. कॅप्टन यांचा वापर भाजप राजकीय फायद्यासाठी करत असल्याचे शेतकऱ्यांना वाटेल. कॅप्टन भाजपमध्ये गेल्यास आधीच भाजपवर नाराज असलेले पंजाबचे शेतकरी कॅप्टन यांनाही लक्ष्य करतील.

दुसरे कारण म्हणजे, केंद्र सरकार कृषी कायद्यांवर ठाम आहे. कुठल्याही परिस्थितीत कृषी कायदे मागे घेणार नाही असे केंद्राने आधीच स्पष्ट केले आहे. अशात केवळ पंजाबच्या निवडणुकीसाठी पक्षाने माघार घेतली असा संदेश भाजप देणार नाही. कॅप्टन यांना भाजपमध्ये घेऊन तसा निर्णय झाल्यास विरोधी पक्ष हा मुद्दा प्रचारात उचलतील आणि यामुळे भाजपचे नुकसान होऊ शकते.

पंजाबमधील राजकीय स्थिती:
पंजाबच्या मतदारांचा विचार केल्यास येथील 75 टक्के कुटुंब शेतीवर अवलंबून आहेत. पंजाबची अर्थव्यवस्थाच कृषी प्रधान आहे. त्यातही अनेकांचा उद्योग आणि व्यवसाय शेतीच्या अवजारांवरच विसंबून आहे. 117 जागांपैकी 77 जागांवर शेतकरी मतांचे वर्चस्व आहे.

सद्यस्थितीला पंजाबच्या जवळपास प्रत्येक गावातील शेतकरी आंदोलनात सामिल आहे. कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या विषयी ते सकारात्मक आहेत. त्यांनी घडवलेल्या चर्चेतून कृषी कायदे माघारी घेतल्यास पंजाबमध्ये कॅप्टन सर्वात मोठे नेते म्हणून समोर येतील. 2002 आणि 2017 मध्ये कॅप्टन अमरिंदर यांच्या याच शैलीने काँग्रेसला सत्ता मिळवून दिली होती.

कॅप्टन आणि भाजपाची गणितं:
कॅप्टन यांचा राजकीय प्लॅन यशस्वी ठरल्यास भविष्यात भाजप आणि कॅप्टन यांचा भावी पक्ष पंजाबमध्ये एकत्रित येऊ शकतात. कृषी कायद्यांच्याच मुद्द्यावर भाजपचा पंजाबमधील मित्र पक्ष अकाली दल दुरावला गेला. आता पंजाबमध्ये भाजपकडे गमावण्यासाठी काहीच नाही. पाकिस्तान सीमेशी लागून असलेला पंजाब राष्ट्रीय सुरक्षेसाठी देखील महत्वाचे राज्य आहे. त्यातही शेतकरी आंदोलन मिटल्यास भाजप त्याचा फायदा उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हरियाणा या ठिकाणी सुद्धा घेणार यात शंका नाही.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Amrinder Singh Plan for BJP to help in Punjab Election 2022.

हॅशटॅग्स

#AmrinderSingh(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x