हास्यास्पद स्पष्टीकरण; रिलायन्सला विमान निर्मितीचा अनुभव आमच्याकडून मिळेल: दसॉल्ट
मार्सेल : विषय हा होता की, संरक्षण संदर्भातील लढाऊ विमान निर्मिती क्षेत्रातील शून्य अनुभव असलेल्या अनिल अंबानींच्या रिलायन्सला राफेलचं कंत्राट देणं हवाई दलासाठी धोकादायक आहे, असा आक्षेपदेखील राहुल गांधींनी घेतला होता. त्यावर सुद्धा एरिक यांनी स्पष्टीकरण दिलं. ‘आमच्या कंपनीकडे प्रशिक्षित अभियंते तसेच कर्मचारी आहेत. तर दुसरीकडे भारतातील अनिल अंबानींची रिलायन्स कंपनी या क्षेत्रात नवोदित आहे. दसॉल्टसोबतच रिलायन्सदेखील या प्रकल्पात गुंतवणूक करेल. यामुळे रिलायन्सला विमान निर्मितीचा अनुभव मिळेल,’ असं दसॉल्टच्या सीईओंनी स्पष्ट केलं.
संरक्षण क्षेत्रातील लढाऊ विमान निर्मितीचा शून्य अनुभव नसताना, केवळ मोदींच्या कृपेने अनिल अंबानींच्या रिलायन्सला राफेल लढाऊ विमानाचं कंत्राट मिळालं, असा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी अनेक वेळा केला आहे. दरम्यान, या आरोपाला आता राफेलची निर्मिती करणाऱ्या फ्रान्सच्या दसॉल्ट कंपनीच्या CEO नी प्रतिउत्तर दिलं आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे की, आम्ही अनिल अंबानींच्या कंपनीत नव्हे, तर अनिल अंबानींसोबतच्या जॉईंट व्हेंचरमध्ये गुंतवणूक केली आहे, असं स्पष्टीकरण दसॉल्टचे सीईओ एरिक ट्रॅपियर यांनी प्रसार माध्यमांना दिलं आहे.
राफेल लढाऊ विमानांच्या करारासाठी अनिल अंबानींच्या रिलायन्सची निवड करण्यासाठी नरेंद्र मोदी सरकारनं फ्रान्सच्या दसॉल्ट कंपनीवर दबाव आणला, असा गंभीर आरोप त्यांनी अनेकदा केला होता. तसेच आम्ही स्वत:हून अनिल अंबानींच्या रिलायन्स कंपनीची निवड केली आहे, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे. तसेच आमच्या कंपनीने अनिल अंबानींच्या रिलायन्समध्ये कोणतीही गुंतवणूक केली नसल्याचंदेखील त्यांनी स्पष्ट केलं. फ्रान्सस्थित दसॉल्ट अनिल अंबानींच्या रिलायन्ससोबत राफेलची निर्मिती करणार आहे. दरम्यान, संबंधित प्रकल्प दोन्ही कंपन्या मिळून पूर्ण करतील. त्यामुळे जॉईंट व्हेन्चरच्या माध्यमातून राफेलची निर्मिती केली जाईल. आणि त्यासाठी रिलायन्सदेखील गुंतवणूक करेल. त्यामुळे ही गुंतवणूक त्यात जॉईंट व्हेन्चरमध्ये असेल,’ अशा शब्दांमध्ये त्यांनी राफेल करारा संदर्भात उलगडा केला आहे. तसे वृत्त एएनआय’ने प्रसिद्ध केले आहे.
#WATCH I don’t lie.The truth I declared before and the statements I made are true. I don’t have a reputation of lying. In my position as CEO, you don’t lie: Dassault CEO Eric Trappier responds to Rahul Gandhi’s allegations #Rafale pic.twitter.com/grvcpsWkj7
— ANI (@ANI) November 13, 2018
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार