23 February 2025 2:14 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

जिल्हा परिषद निवडणुकांच्या सोबतच होणार विविध महामंडळांवरच्या नेमणुका | महाविकास आघाडीत 40:40:20 सूत्र

Mahavikas Aghadi

मुंबई, ११ सप्टेंबर | आघाडी सरकारला सत्तेत येऊन पावणेदोन वर्षे झाली तरी राज्यातील विविध महामंडळांच्या नेमणुकांना मुहूर्त मिळालेला नाही. फेब्रुवारी २०२२ मध्ये होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर महामंडळाच्या नेमणुका होतील, अशी नवी तारीख मंडळांवर वर्णी लावण्याकडे डोळे लावून बसलेल्या पदाधिकाऱ्यांना दिली जात आहे.

जिल्हा परिषद निवडणुकांच्या तोंडावरच होणार विविध महामंडळांवरच्या नेमणुका, महाविकास आघाडीत 40:40:20 सूत्र – Appointments of various corporations will be made along with Zilla Parishad elections :

प्रशासकीय सोयीच्या कामांसाठी महाराष्ट्र शासनाने महामंडळे व कंपन्या स्थापन केल्या आहेत. त्यांची एकूण संख्या ५८ इतकी भरते. त्यामध्ये उद्योग, ऊर्जा आणि कामगार विभागाची सर्वाधिक १३ महामंडळे असून सामाजिक न्याय, सहकार-पणन, दुग्ध-पशुसंवर्धन व जलसंपदा विभागाकडे प्रत्येकी ६ महामंडळे आहेत.

जूनच्या पहिल्या आठवड्यात आघाडी सरकारच्या समन्वय समितीची बैठक झाली. त्यामध्ये महामंडळे वाटपाचे सूत्र ठरले. तसेच १५ जूनपर्यंत महामंडळांवर नेमणुका करण्याचे ठरले होते. सरकारमधील घटक पक्षाला ज्या खात्याचे मंत्रिपद नसेल त्या खात्याच्या महामंडळाचे अध्यक्षपद द्यायचे, असे धोरण आहे. मंत्रिपदाच्या संख्येनुसार मंडळांचे वाटप (शिवसेना ४० : राष्ट्रवादी ४० : काँग्रेस ३० टक्के) होणार आहे. महामंडळांवरील सदस्य संख्याही त्याच आधारावर ठरली आहे.

महामंडळांवरील नेमणुकीच्या बातम्या आल्यानंतर इच्छुकांनी पक्षाकडे गर्दी केली होती. इच्छुकांचे शेकडो अर्ज पडून आहेत. मात्र त्याचे पुढे काही झाले नाही. विधान परिषदेच्या १२ जागांचा प्रश्न मार्गी लागू द्या, असे उत्तर पक्षनेतृत्वांकडून देण्यात येत होते. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नेमणुका होतील, असे नवे गाजर इच्छुकांना दाखवले जात आहे.

महामंडळे कारभारासाठी बदनाम आहेत. मंडळांच्या कामावर देखरेख ठेवण्यासाठी विधिमंडळाची सार्वजनिक उपक्रम समिती आहे. मात्र अध्यक्ष नसलेल्या मंडळाचा कारभार सध्या मंत्री कार्यालये हाकत आहेत. तिन्ही पक्षांमध्ये काँग्रेसला नेमणुकीची घाई आहे. काँग्रेसने यासाठी शरद पवारांना साकडे घातले आहे. मात्र नेमणुकांचे घोडे काही पुढे जात नाही. ओबीसी आरक्षणामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होतील याची निश्चिती नाही. मग महामंडळाच्या नेमणुकांचे काय खरे, नाद सोडलेला बरा…अशी इच्छुकांची कडवट प्रतिक्रिया आहे.

* शिर्डी देवस्थान राष्ट्रवादी, तर पंढरपूर देवस्थान काँग्रेसला देण्यात येणार आहे. मुंबईतील सिद्धिविनायक देवस्थानाचे अध्यक्षपद शिवसेनेकडे कायम राहणार आहे.

* सिडको- काँग्रेसकडे, म्हाडा- शिवसेनेला, तर महिला आयोग राष्ट्रवादीकडे जाण्याची शक्यता आहे. छोट्या घटक पक्षांना महामंडळात वाटा दिला जाणार आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Appointments of various corporations will be made along with Zilla Parishad elections.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#MahaVikasAghadi(137)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x