21 November 2024 5:31 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE ICICI Mutual Fund | ICICI चा धमाकेदार फंड पाहिलात का, 5 लाखांचे झाले 3.5 करोड, इथे वाढवा पैशाने पैसा - Marathi News Home Loan Alert | तुम्ही सुद्धा होम लोन घेताय का; थांबा या 5 गोष्टींचा तटस्थपणे विचार करा, फायदा होईल - Marathi News Job Opportunity | तरुणांनो लाखोंच्या घरात पगार घेण्याची वेळ आली; ITBT मध्ये 526 जागांसाठी मेगा भरती सुरू, पटापट अर्ज करा Railway Ticket Booking | तिकीट कॅन्सल करण्याऐवजी ट्रान्सफर करा कॅन्सलेशन चार्जेसपासून वाचाल; पहा नवा नियम काय सांगतो
x

अखेर राज ठाकरेंच 'ते' व्यंगचित्र खरं ठरल, महाराष्ट्र दहशदवाद्यांचा तळ बनतोय

पुणे : अखेर राज ठाकरेंचे ‘ते’ व्यंगचित्र खरे ठरले, महाराष्ट्र दहशदवाद्यांचा तळ बनतोय का अशी काहीशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण महाराष्ट्र बांगलादेशी दहशदवाद्यांचा तळ बनत चालला असल्याचे काहीसे चित्र आहे. पुण्यातील एका लष्करी बांधकामाच्या साईटवरून एटीएसने पुणे मॉड्यूलचा भाग असणाऱ्या राज मंडळ ह्या ३१ वर्षाच्या तरुणाला अटक केली असून तो या लष्करी साईटवर पर्यवेक्षक म्हणून कामाला होता.

हा ३१ वर्षीय बांगलादेशी तरुण पुणे मोड्युलचा भाग होता आणि त्याने पुण्यातील त्या लष्करी बांधकामाच्या साइटवर अनेक साथीदारांची जोडणी सुरु केली होती. त्याला एटीएसने पुण्यातून अटक केली आहे. इंटेलिजन्स ब्युरो म्हणजे ‘आयबी’ या गुप्तचर यंत्रणेने दिलेल्या माहितीच्या आधारे एटीएसने पुणे मॉड्युलचा भाग असणाऱ्या राज मंडल (३१) याला अटक केली आहे.

एटीएसने केलेल्या उलट तपासणीत त्याने अनेक साथीदार जोडले असल्याची माहिती पुढे आली आहे. त्याने उलट तपासणीत त्याच्या आणखी चार साथीदारांची नावे उघड केली आहेत. हा बांगलादेशी तरुण गेली २ वर्ष महाराष्ट्रात तळ ठोकून होता आणि तो ‘एटीबी’ च्या संबंधित अतिरेक्यांना सर्व प्रकारची मदत पुरवत होता.

पुणे मॉड्यूलचा भाग असलेला हा बांगलादेशी अतिरेकी पश्चिम बंगालमधील २४ परगण्याचा मूळ रहिवासी असल्याचे दर्शवत होता. २०१६ मध्ये बांगलादेश सरकारने एटीबी वर बंदी घातली होती. विशेष म्हणजे त्याच एटीबीचे आपल्या देशभर आणखी अनेक मॉड्यूल कार्यरत असल्याची सांगण्यात आले आहे. धक्कदायक म्हणजे भारतभर पसरत चाललेली ही बांगलादेशी संघटना अमेरिकेकडून मारला गेलेला कुख्यात दहशदवादी ‘ओसामा बिन लादेन’ ची दहशदवादी संघटना ‘अल कायदा’ कडून प्रेरणा घेते आणि त्यांच्याकडून प्रेरणा घेऊनच ही आतंकवादी संघटना स्थापन करण्यात आली आहे.

त्यापेक्षा ही धक्कादायक म्हणजे देशात आणि विशेष करून महाराष्ट्रात छुप्या पद्धतीने पसरत चाललेली ही संघटना पाकिस्तानमधील कुप्रसिद्ध अतिरेकी संघटना इंडियन मुजाहिद्दीनपेक्षा सुद्धा सक्षम आणि घातक बाँम्ब बनविण्यात माहीर असल्याचे चौकशीत समोर आले आहे. भारतीय गुप्तचर यंत्रणा एनआयए सहित सर्व राज्यातील एटीएस पथकांची मदत घेऊन एबीटी या बांगलादेशी दहशदवादी संघटनेची पाळेमुळे इतर राज्यात किती खोलवर पसरली आहेत याच्या शोध घेणार आहेत.

विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या अधिकृत फेसबुक पेजवर एक व्यंगचित्र प्रसिद्ध केलं होत. त्यामध्ये मोदी सरकारला हाच धोक्याचा इशारा देऊन सतर्क करण्याचा प्रयत्नं केला होता. त्या व्यंगचित्रात त्यांनी आधी खरा धोका कुठला आहे हे दाखवले होते ज्यामध्ये बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरच भारताचा खरा धोका आहेत हे मोदीसरकारला पटवून देण्याचा प्रयत्न केला होता. कारण गेल्या अनेक वर्षांपासून सरकार देशातील मुस्लिमांशी संबंधित नको त्या विषयात अधिक गुंतले होते आणि मूळ धोका काय आहे त्याकडेच दुर्लक्ष झालं होत.

कारण हीच बांगलादेशी अतिरेकी संघटना एबीटी गेल्या दोन वर्षांपासून त्यांचे संपूर्ण जाळे देशभर पसरवत आहे. हीच बांगलादेशी संघटना अमेरिकेकडून मारला गेलेला कुख्यात दहशदवादी ‘ओसामा बिन लादेन’ ची दहशदवादी संघटना ‘अल कायदा’ कडून प्रेरणा घेऊनच ही आतंकवादी संघटना स्थापन करण्यात आली आहे, जी महाराष्ट्रात आणि भारतभर नेटवर्क उभं करत असल्याचे उघड झाले आहे.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x