21 February 2025 5:58 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

Balasaheb Thorat To Ashish Shelar | भाजपाच्या नेत्यांना भाकीत करण्याची सवय, त्यांनी ज्योतिष बदलावा - थोरात

Balasaheb Thorat

पुणे, ०२ ऑक्टोबर | काल भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी राज्यात लवकरच निवडणुका लागतील असं वक्तव्य केलं होतं आणि आता त्याला महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी जोरदार (Balasaheb Thorat To Ashish Shelar) प्रतिउत्तर दिलं आहे. महाविकास आघाडी स्थापन झाल्यापासून भाजपातील काही नेत्यांना काहींना काही भाकीत करण्याची सवय आहे. मात्र, भाजपामध्ये जो ज्योतिष आहे, जो भविष्य बदलत असतो. तो आता त्यांना बदलण्याची गरज आहे, असा खोचक टोला महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी लगावला आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्तने महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी पुणे स्टेशन येथील महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी ते बोलत होते.

Since the formation of the Mahavikas Aghadi, some BJP leaders have a habit of making some predictions. However, the astrology in the BJP, which is changing the future. He needs to change them now. Balasaheb Thorat To Ashish Shelar :

मराठवाड्यात खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अतिवृष्टी झाली ही वस्तुस्थिती आहे. महाविकास आघाडीतील नेतेमंडळी मराठवाडा येथे झालेल्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. या भागात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झालेले आहे. तेथील परिस्थितीवर आम्ही पूर्णपणे लक्ष ठेवून आहोत. शेतकऱ्याला मदत करणे हे महत्त्वाच आहे. त्याला कोणते दुष्काळ म्हणणे हे महत्त्वाचे नाही. शेतकऱ्यांच्या मागे पूर्णपणे महाविकस आघाडी सरकार ही उभी आहे. येत्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करून योग्य तो निर्णय घेऊ, असेही ते म्हणाले.

पंजाबमधील राजकीय नाट्यावर भाष्य करताना थोरात म्हणाले की, काँग्रेसने अनेक चढउतार पाहिले आहे. अनके कठीण दिवस हे काँग्रेसने पाहिले आहे. जर आपण इतिहास बघितला तर काँग्रेस हा विचार आहे. तो सर्वसामान्य जनतेच्या मनात रुजलेला आहे. या घडामोडीनंतरदेखील काँग्रेस पुन्हा उभी राहिलेली आपल्याला पहिला मिळेल, असेही ते म्हणाले.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Balasaheb Thorat To Ashish Shelar after statement about elections in Maharashtra.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#BalasahebThorat(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x