11 January 2025 10:16 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Step Up SIP Calculator | पगारदारांनो, स्टेप-अप SIP ऑप्शन'मधून मोठा परतावा मिळवा, अशा प्रकारे 1 कोटी रुपये कमाई होईल 8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अपडेट, 8'वा वेतन आयोग जाहीर होणार, कर्मचाऱ्यांना मिळणार मोठी भेट Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक शेअरमध्ये तेजीचे संकेत, प्रभूदास लीलाधर ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: MAZDOCK Bonus Share News | फ्री बोनस शेअर्स देणार ही कंपनी, संधी सोडू नका, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: ANANDRATHI Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर गुंतवणूकदारांना नुकसान, नवीन अपडेटचा स्टॉक प्राईसवर परिणाम होणार - NSE: RELIANCE IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IRB NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअरबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: NHPC
x

लोकसभा निवडणुकीआधी ३ राज्यांमध्ये राहुल गांधी मोदींना जोरदार धक्का देणार, सर्वे रिपोर्ट

नवी दिल्ली : कालच मुख्य निवडणूक आयुक्तांनी राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, मिझोराम आणि तेलंगण या ५ राज्यांमध्ये १२ नोव्हेंबर ते ७ डिसेंबर या कालावधीत मतदान तर, ११ डिसेंबरला मतमोजणी करण्यात येणार असल्याची घोषणा केली. त्याधर्तीवर प्रसारित करण्यात आलेल्या निवडणूक पूर्व सर्व्हेमध्ये मध्य प्रदेश, छत्तीसगढ आणि राजस्थान या ३ तीन राज्यांमध्ये मोदींनी सभा घेताल्यातरी सत्तापरिवर्तन अटळ आहे असं म्हटलं आहे. या तिन्ही राज्यांमध्ये काँग्रेसला बहुमत मिळेल आणि त्यात राजस्थानमध्ये भाजपचा धुव्वा उडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

या सर्वेमध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी वरचढ ठरतील तर मोदींना जवळपास नाकारलं जाईल असं हा सर्वे निर्देशित करतो. एबीपी सी वोटरच्या सर्वेनुसार भाजपची चिंता वाढली आहे तर काँग्रेस आणि राहुल गांधींसाठी सुखावणारी बातमी आहे. या सर्वेनुसार, राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये सत्तापरिवर्तन होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. सध्या या तिन्ही राज्यांमधून भाजपची सत्ता असली तरी विधानसभा निवडणुकीनंतर ती जाऊ शकते असं हा सर्वे निर्देशित करतो. विशेष म्हणजे काँग्रेसला या तीनही राज्यांमध्ये स्पष्ट बहुमत मिळू शकतं, असा अंदाज सर्व्हेतून व्यक्त करण्यात आला आहे.

मध्य प्रदेशात विद्यमान मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांची व्यक्तिगत प्रतिमा चांगली असली तरी ‘व्यापम’ घोटाळा, शेतकऱ्यांवर झालेला गोळीबार, १५ वर्षे सत्तेत असल्याने सरकारच्या विरोधातील असलेली प्रचंड नाराजी हे प्रमुख घटक भाजपसाठी घातक ठरू शकतात. मध्य प्रदेशात विधानसभेच्या एकूण २३० जागा आहेत. त्यापैकी काँग्रेसचा १२२ जागांवर विजय होईल. तर भाजपला केवळ १०८ जागा मिळतील, असा अंदाज सर्व्हेतून व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे तब्बल १५ वर्षानंतर मध्य प्रदेशात काँग्रेसची जोरदार इंट्री होणार असल्याचे हा सर्वे सांगतो आहे.

तसेच छत्तीसगड विधानसभेत भाजपला मोठा धक्का बसणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. छत्तीसगड मध्ये विधानसभेच्या एकून ९० जागा असून त्यापैकी एकूण ४७ जागांवर विजय मिळवून काँग्रेस सत्तेवर विराजमान होईल तर भाजपच्या वाट्याला केवळ ४० जागा येतील असं म्हटलं आहे. त्यामुळे छत्तीसगडमध्ये सुद्धा काँग्रेसची सत्ता स्थापन होण्याची शक्यता आहे. मागील विधानसभा निवडणुकीत फार कमी मतांच्या अंतराने भाजपने सत्ता राखली होती.

राजस्थानात पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री वसुंधराराजे यांनी सत्ता कायम राखण्याकरिता शक्ती लावली आहे. या सर्वेनुसार, राजस्थानमधील २०० जागांपैकी भाजपाला फख्त ५६ जागा मिळणार असून भाजपचा पूर्ण धुव्वा उडण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत काँग्रेसच्या मतांमध्ये सुद्धा प्रचंड वाढ होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. राजस्थानमध्ये काँग्रेसला तब्बल ५० टक्के मते मिळतील तर भाजपला ३४ टक्के मत मिळतील. तब्बल १४२ जागावर विजय मिळवत काँग्रेस राजस्थानमध्ये सत्ता स्थापन करेल असा दावा या सर्वेतून व्यक्त करण्यात आली आहे.

तेलंगणामध्ये पुन्हा के. चंद्रशेखर राव सत्तेत येण्याची शक्यता आहे आणि भाजपला तिथे काहीच स्थान नाही. मिझोराममध्ये मागील १५ वर्षे काँग्रेसची सत्ता आहे. मात्र आसाम सहित ईशान्येकडील विविध राज्यांमध्ये सत्ता मिळाल्याने भाजपच्या मिझोराम बाबत आशा उंचावल्या आहेत.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)#Rahul Gandhi(251)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x