ठाणे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून आणि भाजपकडून नरेंद्र मोदींना पर्याय शोधण्याचं काम सुरु असल्याचा धक्कादायक खुलासा ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी केला असून मोदींना पर्याय म्हणून भाजपमध्ये सध्या नितीन गडकरी, राजनाथ सिंग आणि सुषमा स्वराज यांची नावं आघाडीवर असल्याचे केतकर म्हणाले.
भाजपमधील खासदारांनाच नरेंद्र मोदी हे नकोसे असल्याचं ते म्हणाले. ‘विभाजित राजकारण आणि मंदावलेली अर्थव्यवस्था’ या विषयावर आधारित चर्च्यासत्र ठाण्यातील काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसतर्फे आयोजित करण्यात आलं होत तेव्हा कुमार केतकर यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील अंतर्गत घडामोडींवर हा गौप्यस्फोट केला.
तसेच काँग्रेसच्या महागठबंधन मध्ये सुद्धा पंतप्रधान पदाचे अनेक उमेदवार असल्याचं सुद्धा त्यांनी स्पष्ट केलं. आगामी लोकसभा निवडणुकीत २८२ तर सोडाच उलट भाजपचे १५० खासदार सुद्धा मोठ्या मुश्किलीने निवडून येतील असा दावा सुद्धा कुमार केतकर यांनी प्रश्नोत्तराच्या वेळी केला.






























