13 January 2025 3:20 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | अवघा 64 पैशाचा पेनी शेअर मालामाल करतोय, यापूर्वी दिला 700 टक्के परतावा - Penny Stocks 2025 Penny Stocks | 1 रुपया 59 पैशाचा पेनी स्टॉक खरेदीला गर्दी, श्रीमंत करू शकतो हा पेनी शेअर - Penny Stocks 2025 Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, पेनी स्टॉकवर होणार परिणाम - NSE: IDEA SIP Mutual Fund | 4000 गुंतवणुकीतून 20 लाखांचा फंड तयार होण्यासाठी किती वर्षांचा काळ लागेल, पैशाने पैसा वाढवा Post Office Scheme | दुप्पटीने पैसे वाढवणारी पोस्टाची सुपरहिट योजना; पडेल पैशांचा पाऊस, सविस्तर कॅल्क्युलेशन पहा Credit Card Alert | 'या' व्यक्तींनी चुकूनही क्रेडिट कार्डचा वापर करू नये; कर्ज तर वाढेलच आणि सिबिल स्कोर देखील खराब होईल Home Loan Prepayment | गृहकर्ज मुदतीपूर्वी फेडताय, प्री-पेमेंट करण्यापूर्वी जाणून घ्या पेनल्टी चार्जेस किती भरावे लागतील
x

पेड सर्व्हे? लोकसंख्या १३० कोटी आणि १६,९३१ लोकांनी देशाचा ओपिनियन पोल ठरवला?

BJP, Congress

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हवानिर्मितीसाठी पुन्हा पेड सव्हेने तोंड वर काढल्याचे दिसत आहे. बालाकोटमध्ये केलेल्या एअर स्ट्राईकनंतर मोदी सरकारला खरंच फायदा होणार आहे का? असे मथळे छापून आणि प्रश्न विचारून सत्ताधाऱ्यांसाठीच हे केलं जात आहे का असा प्रश्न उपस्थित होतो आहे.

विषय चिंतेचा आहे कारण बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या आणि अनेक गंभीर विषयांना बगल देत एअर स्ट्राईकनंतर सरकारला किती फायदा होईल असे प्रश्न समोर केले जात आहेत. पेड जाहिरातबाजीने अक्षरशः कहर केल्याचं निदर्शनास येत आहे. कारण, टाइम्स नाऊ आणि व्हीएमआरच्या ओपिनियन पोलमध्ये भाजप प्रणित एनडीए बहुमताच्या जवळ दिसत आहे. तर काँग्रेसप्रणित यूपीए मात्र १३५ जागांवर अडकली आहे. ५४३ जागांपैकी एनडीएला २८३, यूपीए १३५ आणि इतर पक्षांचा १२५ जागांचा अंदाज वर्तवण्यात आलाय. एकाबाजूला भाजपला सर्वात मोठा फटका उत्तर प्रदेशात बसताना दिसतोय. तर तामिळनाडूत एआयएडीएमकेला सोबत घेतल्याचाही फायदा झालेला दिसत नाही. तरी देखील भाजपचं अव्वल राहील असा कांगावा केला जात आहे.

भारताची एकूण लोकसंख्या तब्बल १३० कोटीच्या घरात असताना देशभरातून केवळ १६,९३१ लोकांच्या संपर्कातून सर्व्हे केल्याचे सांगत आहेत. तसेच ते कोणत्या पक्षाचे कार्यकर्ते होते की सामान्य लोकं हे देखील समजू शकलेले नाही. दुसरं म्हणजे ती लोकं कोण आणि कोणत्या शहर किंवा राज्यातील आहेत आणि देशातील सर्वच राज्यांमध्ये तो घेण्यात आला का? याचा कोणताही तपशील देण्यात आलेला नाही हे विशेष म्हणावे लागेल.

सदर सर्वे मार्च महिन्यात करण्यात आला असून या सर्व्हेमध्ये १६९३१ लोकांचा सहभाग होता. यापूर्वीच्या सर्व्हेमध्ये एनडीए बहुमतापासून दूर असल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र तेव्हापासून दोन महत्त्वाच्या घटना घडल्या आहेत. केंद्र सरकारने सादर केलेलं अंतरिम बजेट आणि बालाकोट एअर स्ट्राईक. या पार्श्वभूमीवर या सर्व्हेला महत्त्व प्राप्त झालं आहे. तेलंगणा, केरळ या राज्यांमध्ये भाजप आणि काँग्रेसलाही फटका बसणार आहे. तर दिल्लीमध्ये सातपैकी सात जागा भाजप जिंकताना दिसत आहे.

हॅशटॅग्स

#india(222)BJP(447)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x