15 January 2025 3:53 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला 20,000 रुपये मिळतील, ही सरकारी योजना ठरेल खूप फायद्याची NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC IREDA Share Price | मल्टिबॅगर इरेडा शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली - NSE: IREDA Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: APOLLO Quant Mutual Fund | पगारदारांनो, टॅक्स वाचेल आणि पैसा 3 ते 4 पटीने वाढेल, ही म्युच्युअल फंड योजना मालामाल करेल IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, प्राईस बँड सह डिटेल्स नोट करा, कमाईची संधी सोडू नका 8th Pay Commission | 8'व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी
x

राहुल हे अत्यंत साधे व्यक्ती असून त्यांची देशाला व गोव्याला गरज: भाजप गोवा विधानसभा उपसभापती

पणजी : गोव्याच्या कौटुंबिक दौऱ्यावर असताना सुद्धा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी काल आजारीने त्रस्त असणारे गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची स्वतः विधानसभेत जाऊन सदिच्छा भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली होती. दरम्यान, कालच्या या भेटीचे गोवा विधानसभेचे विद्यमान उपसभापती तसेच भाजप आमदार मायकल लोबो यांनी स्वागत केले. तसेच त्यांचे तोंडभरून कौतुक सुद्धा केल्याने भाजपाची राजकीय गोची झाली आहे.

लोबो प्रसार माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि मुख्यमंत्री पर्रिकरांची विशेष भेट होती. तसेच या भेटीदरम्यान आम्ही अनुभवलेला राहुल गांधी यांचा साधेपणा तसेच माणुसकीचे प्रत्येक भारतीयाला आणि आम्हा गोवेकरांना कौतुक आहे. ते अत्यंत साधे व्यक्ती असून त्यांच्या सारख्या नेत्याची देशाला आणि गोव्याला नितांत गरज आहे.

पर्रिकरांची काल भेट घेतल्यानंतर राहुल गांधी यांनी मंगळवारी सकाळी ट्विट करुन याची माहिती प्रसार माध्यमांना दिली होती. ते म्हणाले होते, आज सकाळी गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकरांची भेट सदीच्छा घेतली. त्यांनी आजारातून लवकर बरं व्हावं अशा सदिच्छा मी त्यांना दिल्या, तसेच सदर भेट ही आमची वयक्तिक भेट होती, असे ट्विट त्यांनी केले होते.

दरम्यान, या भेटीपूर्वी राहुल गांधी यांनी राफेल करार प्रकरणाशी संबंधित महत्वाची फाईल मनोहर पर्रिकर यांच्याकडे असल्याचा दावा केला होता. त्यानंतर त्यांनी गोव्यातील एका मंत्र्याच्या थेट ऑडिओ क्लिपचा पुरावा सादर केला होता. अशी पाश्वभुमी असताना राहुल गांधी आणि मनोहर पर्रिकर यांच्या भेटीवर विविध चर्चांना उत आला होता.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)#Rahul Gandhi(251)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x