21 April 2025 6:08 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार मंगळवार 22 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या HAL Share Price | पीएसयू डिफेन्स कंपनीचा स्टॉक फोकसमध्ये; नुवामाने जाहीर केली टार्गेट प्राईस - NSE: HAL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर्स खरेदीला गर्दी, फायदा घ्या, जबरदस्त टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Vodafone Idea Share Price | या पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, आज 6.57% वाढला, ही आहे टार्गेट - NSE: IDEA Adani Power Share Price | ग्लोबल फर्म बुलिश; अदानी पॉवर शेअर्स देईल मोठा परतावा, टार्गेट नोट करा - NSE: ADANIPOWER Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअरबद्दल महत्वाची अपडेट, ग्लोबल फर्मने जाहीर केली टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर जबरदस्त परतावा देणार; ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN
x

बॅलेट पेपरने झालेल्या कारगिल स्थानिक निवडणुकीत भाजपला १ जागा तर काँग्रेस व नॅशनल कॉन्फ्रेन्स पार्टीची सरशी

जम्मू-काश्मीर : जम्मू काश्मीर मधील महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या कारगिल येथील पहाडी विकास परिषदेच्या २६ जागांसाठी पार पडलेल्या निवडणुकीत काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फ्रेन्स पार्टीने सरशी मारली आहे, तर भाजपला केवळ एका जागेवर समाधान मानावं लागलं आहे.

विशेष म्हणजे ही संपूर्ण निवडणूक बॅलेट पेपरने पार पडली होती. निवडणुकीतील एकूण निकालात नॅशनल कॉन्फ्रेस पार्टीने सर्वाधिक म्हणजे एकूण १० जागा जिंकत पहिल्या क्रमांकाचा पक्ष बनला आहे. तर दुसरीकडे काँग्रेस एकूण ७ जागा जिंकून दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि पीडीपी’ला २ तर भाजपाला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले आहे. विशेष म्हणजे ५ जागांवर केवळ अपक्ष विजयी झाले आहेत.

एकूणच बॅलेट पेपरने पार पडलेल्या या निवडणुकीत भाजपची अवस्था अपक्षांपेक्षा सुद्धा बिकट झाली आहे. या निवडणुकीत एकूण ७० टक्के मतदानाची नोंद झाली होती आणि एकूण ९९ उमेदवार रिंगणात होते. मतमोजणी अंती फारूक अब्दुल्लांच्या नॅशनल कॉन्फ्रेस पार्टीने पदुम, तेसोरू, पोएन, सिलमो, थांगसम, परकाचिक, कारगिल टाऊन आणि चुली सिंबु या १० जागांवर विजय संपादन केला आहे. तर काँग्रेसने पशकुम, भीमभाट, चोसकोर, खांग्रल, शकर, बारू, खारशह या ७ जागांवर विजयश्री संपादन केला आहे.

 

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Congress(527)BJP(447)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या