16 April 2025 5:50 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | सुसाट तेजी, इरेडा शेअरमध्ये 5.65 टक्क्यांची तेजी, PSU स्टॉकची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IREDA Suzlon Share Price | 54 रुपयांचा शेअर पुढे किती फायद्याचा? गुंतवणूकदारांसाठी अपडेट, फायदा की नुकसान? - NSE: SUZLON Tata Steel Share Price | 180 रुपये टार्गेट प्राईस, बिनधास्त खरेदी करा, ब्रोकरेजकडून टार्गेट जाहीर - NSE: TATASTEEL NTPC Green Energy Share Price | खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, कंपनीला मोठा भविष्यकाळ, टार्गेट जाणून घ्या - NSE: NTPCGREEN NBCC Share Price | शेअर प्राईस 93 रुपये, आज 4.21 टक्क्यांची तेजी, यापूर्वी 2120% परतावा दिला, टार्गेट नोट करा - NSE: NBCC JP Power Share Price | वडापाव पेक्षाही स्वस्त शेअरने 2107 टक्के परतावा दिला, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: JPPOWER Vedanta Share Price | वेदांता शेअर खरेदी करावा, 53 टक्के परतावा मिळेल, ICICI सिक्युरिटीजने दिले संकेत - NSE: VEDL
x

नारळाच्या झाडातून हळदीचं पिक, भाजप IT सेल चा जावई शोध

BJP, bjp maharashtra, devendra fadnavis, bjp it cell

सध्या देशात लोकसभेच्या निवडणुकांचा रणसंग्राम चालू आहे त्यातच जवळजवळ सगळ्याच पक्षांनी सध्या सोशल मीडियाला चांगलंच मनावर घेतलेलं दिसतंय. याचाच प्रत्यय आला तो भाजपच्या एका फेसबुक पोस्ट वरून. नेहमीच वादाच्या भोवऱ्यात असलेलं भाजपचं IT सेल सध्या जरा गोंधळलेलं दिसतंय.

भाजपच्या IT सेल ने राज्य सरकारनं केलेल्या कामांना सोशल मीडियावर प्रसिद्धी देण्याचा धडाकाचा लावलेला आहे. “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फॉर महाराष्ट्र” या पेजवर नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील शेतकऱ्यांनी अत्यल्प पाण्यावर घेतले हळदीचे पीक या ओळी लिहिलेल्या आहेत. तर दुसऱ्या बाजूला सलाम शेतकऱ्यांच्या जिद्दीला..! असं मुख्य शीर्षक देण्यात आलंय. या जाहिरातीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फेटा घातलेला फोटोही दिसतोय.

हळदीचं पीक म्हणून नारळाची छोटी झाडं दाखवून भाजपच्या IT सेल ने अकलेचे तारे तोडले आहेत. नेटिझन्सनी जोरदार टीका करायला सुरूवात केल्यानंतर हा फोटो त्या पेजवरून काढून टाकण्यात आलाय. पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती. नेटिझन्सनी या जाहिरातीचे स्क्रिनशॉटस् व्हायरल करायला सुरूवात केल्यावर भाजप IT सेल ला चूक लक्षात येताच मूळ फोटो बदलून त्याठिकाणी हळदीच्या पिकाचे फोटो टाकण्यात आले.

पोस्टचे काही स्क्रीनशॉट्स : 

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या