16 April 2025 2:52 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Steel Share Price | 180 रुपये टार्गेट प्राईस, बिनधास्त खरेदी करा, ब्रोकरेजकडून टार्गेट जाहीर - NSE: TATASTEEL NTPC Green Energy Share Price | खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, कंपनीला मोठा भविष्यकाळ, टार्गेट जाणून घ्या - NSE: NTPCGREEN NBCC Share Price | शेअर प्राईस 93 रुपये, आज 4.21 टक्क्यांची तेजी, यापूर्वी 2120% परतावा दिला, टार्गेट नोट करा - NSE: NBCC JP Power Share Price | वडापाव पेक्षाही स्वस्त शेअरने 2107 टक्के परतावा दिला, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: JPPOWER Vedanta Share Price | वेदांता शेअर खरेदी करावा, 53 टक्के परतावा मिळेल, ICICI सिक्युरिटीजने दिले संकेत - NSE: VEDL Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक BUY, SELL की Hold करावा? तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला - NSE: IDEA AWL Share Price | अदानी विल्मर शेअर देईल तगडा परतावा, 49 टक्के अपसाईड कमाईची संधी, अपडेट नोट करा - NSE: AWL
x

चंद्रकांतदादांच्या नाशिक दौऱ्यानंतरही भाजपमध्ये अंतर्गत वाद | एका प्रभाग समितीवर शिवसेनेची बाजी

BJP Nashik smart city

नाशिक, १९ जुलै | भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नाशिकचा दौरा करून स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या बैठक घेतल्या होत्या. त्यानंतरही भाजपमध्ये स्थानिक पातळीवर मोठी धुसपूस असल्याचं पाहायला मिळालं आहे. विशेष म्हणजे भाजपमधील काही पदाधिकारी शिवसेनेला मदत करत असल्याचं देखील सिद्ध झालं आहे.

कारण नाशिक भारतीय जनता पक्षाने अंतर्गत संघर्षामुळे चुरशीच्या झालेल्या महापालिकेच्या नाशिकरोड प्रभाग समितीच्या निवडणुकीत शिवसेनेचे प्रशांत दिवे यांनी बाजी मारली आहे. भारतीय जनता पक्षाचे विशाल संगमनेरे आणि डॉ सीमा ताजने गैरहजर राहिल्याने शिवसेनेचे प्रशांत दिवे यांनी विजय मिळवला.

दरम्यान, पंचवटीत मच्छीन्द्र सानप आणि पूर्व प्रभाग समितीत डॉ दीपाली कुलकर्णी या दोन ठिकाणी भारतीय जनता पक्षाने बिनविरोध बाजी मारली. सिडकोत शिवसेनेच्या सुवर्णा मटाले तर सातपूरला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे योगेश शेवरे यांनी भाजपच्या मदतीने बिनविरोध निवडीवर शिक्कामोर्तब केले तर नाशिक पश्चिम मध्ये भारतीय जनता पक्षाची खेळी अयशस्वी ठरल्याने काँग्रेसच्या वत्सला खैरे बिनविरोध निवडून आल्या.

आज सायंकाळी जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या नाशिकरोड प्रभाग समितीच्या निवडणुकीत समसमान मते असतानाही केवळ भारतीय जनता पक्षाच्या गटबाजीचा फटका पक्षाला बसला. या प्रभागात भारतीय जनता पक्षाकडून मीरा हंडागे आणि सुमन सातभाई यांनी अर्ज दाखल केले होते. पक्षाने मीरा हंडागे यांना उमेदवारी दिली होती. समसमान मतांमुळे चिठया फैसला करतील अशी शक्यता असताना भारतीय जनता पक्षाचे दोन नगरसेवक गैरहजर असल्याने 9 विरूद्ध 11 मतांनी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराचा पराभव केला.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: BJP lost one committee due to internal issues in Nashik Municipal corporation news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#BJPM(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या