31 October 2024 12:43 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Shahrukh Khan | मन्नत व्यतिरिक्त शाहरुख खानचे परदेशात देखील आहेत करोडोंचे बंगले, दुबई आणि लंडनला असतात अभिनेत्याच्या वाऱ्या Horoscope Today | शनि देवाच्या मार्गी होण्याने या राशींना होणार लाभ; दिवाळीचा सण असेल अतिशय खास - Marathi News SBI Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, SBI फंडाची ही योजना अनेक पटीने पैसा वाढवते, खास फंडात पैशाने पैसा वाढवा - Marathi News Hair Style | कोणाचीही मदत न घेता साडी आणि सलवार कुर्त्यावर करा स्वतःची हेअर स्टाईल ; सणासुदीच्या दिवसांत मदत होईल Gold Investment | बापरे, सोन्याचा प्रति तोळा भाव लवकरच 86,000 रुपये होणार, ही आहेत 7 कारणं, सराफा बाजारात गर्दी Nippon India Growth Fund | कुबेराचा खजाना आहे ही म्युच्युअल फंड योजना, 1500 रुपये SIP वर मिळेल 4 कोटी रुपये परतावा IRB Infra Share Price | IRB इंफ्रा सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 35% पर्यंत परतावा - NSE: GTLINFRA
x

भाजपचे मंत्री रवींद्र चव्हाणांचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या खांद्यावर हात आणि फोटोसेशन

उल्हासनगर : याआधी दलितांची तुलना डुकरासोबत करणारे भाजपचे विवादित आमदार तसेच राज्यमंत्री रवींद्र चव्हाण पुन्हा त्यांच्या अशाच विवादित कृत्यामुळे प्रकाशझोतात आले आहेत. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात आणि समाज माध्यमांवर त्यांच्या विरुद्ध संतापाची लाट आली आहे. यावेळी त्यांनी थेट महाराष्ट्राच आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या खांद्यावर हात ठेऊन फोटोशूट केले आहेत.

भाजपची अनेक नेते मंडळी आणि आमदार तसेच मंत्री रोज कोणत्या तरी विवादित मुद्यात अडकत आहेत. काही दिवसांपूर्वी स्वतःला वारकरी असल्याचे सांगणारे आमदार राम कदम यांनी तुम्हाला एखादी मुलगी पसंत असल्यास आणि मुलाच्या घरातील पालकांना ती आवडल्यास त्या मुलीला पळवून आणणार आणि तुम्हाला देणार असं विकृत वक्तव्य केलं होत. त्यानंतर राम कदम आणि भाजपवर संपूर्ण राज्यातून संताप व्यक्त करण्यात आला होता.

आता उल्हासनगर महानगरपालिकेत नवीन महापौर बिनविरोध निवडून आल्याने ते उल्हासनगर मध्ये आले असता, त्यांनी महाराष्ट्राच आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या खांद्यावर हात ठेऊन फोटोशूट केल्याचे समोर आलं आहे. ज्या रयतेच्या राज्याच्या नावाने प्रचार करून मतं घेतली त्यांची प्रतारणा अजून किती वेळा सत्ताधारी करणार, असा प्रश्न सामान्य उपस्थित करत आहेत.

हॅशटॅग्स

BJP(447)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x