22 January 2025 10:11 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Mutual Fund | श्रीमंत करणारी HDFC म्युच्युअल फंडाची योजना, मिळेल तगडा परतावा, इथे पैसा वेगाने वाढतो SBI Mutual Fund | नोकरदारांनो बँक FD विसरा, 'या' म्युच्युअल फंड योजना 31 टक्केपर्यंत परतावा देत पैशाने पैसा वाढवतील Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, स्टॉक BUY करावा का - NSE: TATASTEEL Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप कंपनीच्या नफ्यात घट, तरीही ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: TATATECH Penny Stocks | प्राईस 88 पैसे, एका वडापावच्या किंमतीत 20 शेअर्स खरेदी करा, यापूर्वी 633% परतावा दिला - Penny Stocks 2025 Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनी शेअरने 1 महिन्यात 53% परतावा दिला, खरेदीची संधी सोडू नका - NSE: APOLLO Infosys Share Price | आयटी स्टॉक इन्फोसिसवर टॉप ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस मोठा परतावा देणार - NSE: INFY
x

Terror Plan Politics | दहशतवाद्यांचं लक्ष दिल्ली, महाराष्ट्र आणि युपी | शेलारांना योगी सरकारच्या ATS'चा विसर?

BJP MLA Ashish Shelar

मुंबई, १५ सप्टेंबर | दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने मुंबईत येऊन जान मोहम्मद शेख याला अटक केल्याचं चुकीचं वृत्त पसरलं आणि या मुद्द्यावरून वातावरण तापू लागलं आहे.  एकीकडे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी यासंदर्भात उच्चस्तरीय बैठक बोलावली असताना दुसरीकडे आता भाजपाकडून या प्रकरणी तीव्र टीका केली जाऊ लागली आहे. “हे दहशतवादी महाराष्ट्रात, मुंबईत वास्तव्य करून दहशतवादी कट करत असताना राज्याचं एटीएस झोपलं होतं का? या दहशतवाद्यांच्या बाबतीत राज्यातले पोलीस काय करत होते?” असा सवाल भाजपा आमदार आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारला केला आहे. यासंदर्भात मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

Terror Plan, दहशतवाद्यांचं लक्ष दिल्ली, महाराष्ट्र आणि युपी, शेलारांना उत्तर प्रदेशच्या ATS’चा विसर? – BJP MLA Ashish Shelar criticized Maharashtra ATS on Jaan Mohammad Shaikh arrest in Mumbai :

विशेष म्हणजे दहशतवाद्यांचं लक्ष दिल्ली, महाराष्ट्र आणि युपीमधील शहरं असली तरी भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी मात्र उत्तर प्रदेशच्या ATS’कडे पूर्ण दुर्लक्ष करताना महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांच्या ATS’वर टीका करण्याची राजकीय संधी सोडली नसल्याचं पाहायला मिळालं आहे.

तत्पूर्वी, दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षाने मंगळवारी जान मोहम्मद शेख उर्फ ​​समीर कालिया, ओसामा उर्फ ​​सामी, जीशान कमर, मोहम्मद अबू बकर, मोहम्मद आमिर जावेद, मूलचंद उर्फ ​​’साजू’ उर्फ ​​लाला यांना राजस्थान, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातून अटक केली आहे. हे सर्व दिल्ली, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशातील मोठ्या शहरांना लक्ष्य करून मोठा स्फोट करण्याची योजना आखत होते.

पाकिस्तानमध्ये प्रशिक्षण घेतल्यानंतर दोन दहशतवादी दिल्लीत स्फोट करणार होते एकूण अटक केलेल्यांपैकी ओसामा उर्फ ​​सामी आणि जीशान कमर यांनी पाकिस्तानमध्ये प्रशिक्षण घेतले होते. दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षाने सांगितले की ते प्रथम विमानाने मस्कटला गेले आणि नंतर समुद्रमार्गे पाकिस्तानातील ग्वादर बंदरात गेले होते. त्यांना शस्त्रांचा वापर आणि स्फोटके बनवण्यासाठी पाकिस्तानमध्ये 15 दिवस प्रशिक्षण देण्यात आले, त्यानंतर तो त्याच मार्गाने भारतात परतले. भारतात परतल्यावर त्यांना IED लावण्यासाठी दिल्ली आणि यूपीमधील विविध ठिकाणांवर लक्ष ठेवण्याचे काम सोपवण्यात आले होते.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल.

News Title: BJP MLA Ashish Shelar criticized Maharashtra ATS on Jaan Mohammad Shaikh arrest in Mumbai.

हॅशटॅग्स

#Ashish Shelar(44)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x