23 November 2024 3:47 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Railway Ticket Booking | 90% रेल्वे प्रवाशांना माहित नाही, असं मिळेल रेल्वेचं सर्वांत स्वस्त तिकीट, ठाऊक आहे हा फंडा My EPF Money | EPF मधून पैसे काढण्याची सर्वांत सोपी पद्धत इथे पहा, खात्यातील जमा शिल्लक तपासून पैसे काढू शकता Credit Score | पगारदारांनो, तुमचा क्रेडिट स्कोर 750 असून सुद्धा लोन मिळणार नाही, जाणून घ्या नेमके कारण काय असेल Mutual Fund SIP | श्रीमंतीचा महामार्ग, 'या' भन्नाट फॉर्म्युल्याचा वापर करा, तुमचा मुलगा देखील 21 व्या वर्षी बनेल करोडपती HAL Share Price | डिफेन्स कंपनी HAL सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, स्टॉक रेटिंग सह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HAL Smart Investment | श्रीमंतीच्या मार्गावर घेऊन जाणारा फॉर्म्युला आहे जबरदस्त; व्हाल 2 करोडचे मालक, खास इन्वेस्टमेंट टीप
x

व्हिडिओ: मुली पळवणं हे आमदाराच्या कार्यकक्षेत? आई-वडील म्हटले पसंत आहे तर तिला पळवून आणणार आणि तुम्हाला देणार: राम कदम

मुंबई : काल झालेल्या दहीहंडी उत्सवात घाटकोपरमधील भाजपचे आमदार आणि प्रवक्ते राम कदम पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. दहीहंडी उत्सवाच्या कार्यक्रमात उपस्थितांना स्वतःचा मोबाईल क्रमांक देताना त्यांनी धक्कादायक विधान केलं, ज्यामुळे समाज माध्यमांवर त्यांच्या या धक्कादायक विधानाचा समाचार घेण्यात येत आहे.

आमदार राम कदम उपस्थित तरुणांना उद्देशून म्हणाले की, ‘साहेब मी तिला प्रपोज केला आणि ती मला नाही म्हणते कृपया मदत करा, चुकीचं आहे १०० टक्के मदत करणार, आधी तुमच्या आई-वडिलांना घेऊन यायचं, तुमचे आई-वडील म्हटले की साहेब ही पोरगी आम्हाला पसंत आहे, तर काय करणार मी? तिला पळवून आणणार आणि तुम्हाला देणार’.

वास्तविक आमदार राम कदमांच हे वाक्य स्त्रियांसाठी संतापजनक आहे. मुलांच्या आईवडिलांनी सांगितलं की ‘पोरगी आम्हाला पसंत आहे, तर काय करणार मी? तिला पळवून आणणार आणि तुम्हाला देणार’. वास्तविक स्वतःच्या मतदारसंघातील मुला-मुलींच्या व्यक्तिगत आयुष्यात डोकावणे आणि मतदार संघात कोण कोणावर प्रेम करत आणि कोण कोणाला प्रोपोज करत आणि कोण कोणाला होकार किंवा नकार देत, हे मतदारसंघातील आमदाराच्या कार्यकक्षेत येत का? आमदारांनी मतदारसंघातील ही असली कामं करण्यासाठी देशात निवडणुका घेतल्या जातात का? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

काही दिवसांपूर्वी प्रजा फाउंडेशन’कडून लोकप्रनिधींच्या कामगिरीचे सर्वेक्षण करण्यात आलं होत, तसेच लोकप्रनिधींच ते रिपोर्ट कार्ड सामान्य जनतेसाठी खुलं करण्यात आलं होतं. त्यात भाजपचे घाटकोपरचे आमदार राम कदम यांचा सुद्धा क्रमांक आला होता. परंतु तो क्रमांक खालून पहिला म्हणजे सर्वात शेवटी. कदाचित हीच कारण असावी ज्यामुळे मतदारसंघात विधायक कामं न करता, नको ते विषय सार्वजनिक रित्या काढले जातात.

आमदार राम कदम यांचा लोकप्रनिधी या नात्याने केवळ क्रमांक खालून पहिला आला नसून, तर २०१७ च्या तुलनेत त्यांची कामगिरी या वर्षी म्हणजे २०१८ मध्ये अजूनच ढासळली आहे. प्रजा फाउंडेशनच्या रिपोर्ट नुसार भाजप आमदार राम कदम यांची २०१७ मध्ये गुणसंख्या होती ४१.९६ टक्के म्हणजे ५० टक्के सुद्धा नाही. परंतु असे असताना सुद्धा ती गुणसंख्या २०१८ या वर्षासाठी अजून खालावाली असून ती केवळ ३३.३७ टक्के इतकी झाली आहे. यावरून ते त्यांच्या मतदार संघात जितका देखावा करतात त्यापेक्षा हा रिपोर्ट काही वेगळंच निर्देशित करत आहे.

त्याआधी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा फेक व्हिडिओ शेअर करण्याचा पराक्रम सुद्धा करून झाला आणि त्यात सुद्धा खरा व्हिडिओ समोर आल्याने ते तोंडघशी पडले होते. आता ते मतदार संघात रक्षाबंधनाच्या नावाने अजून भलत्याच वादात अडकण्याची शक्यता आहे. मतदारसंघात रक्षाबंदनाचा कार्यक्रम आयोजित केला होता आणि त्यासाठी मतदारसंघातील महिलांना निमंत्रित करताना रेशनकार्ड अनिवार्य केलं होत. परंतु विषय तेव्हा गंभीर झाला होता, जेव्हा एखाद्या सरकारी महत्वाच्या कागदपत्रावर एखादा आमदार रक्षाबंधनाच्या नावाने शिक्का किंवा टिकमार्क करतो. दुसरं म्हणजे स्वतःच्या खाजगी कार्यक्रमात, त्यांनी महिलांना एखादा सरकारी दस्तावेज का आणण्यास सांगितला? तो काही सरकारी कार्यक्रम वा सरकारी नोंदणी असं काही नव्हतं. स्वतःचे खाजगी कार्यक्रम साजरे करताना सामान्यांनी सोबत आणलेल्या सरकारी कागदपत्रांवर शिक्के किंवा टिकमार्क करण्याचा अधिकार आमदार राम कदमांना कोणी दिला होता?

आमदारांना ज्या विधायक विकास कामांसाठी निवडून दिले आहे, ती त्यांनी जवाबदारीने पार पडली तर हे असले प्रयोग मतदारसंघात करायची वेळ येणार नाही. त्यांच्या अशा जाहीर वक्तव्याने उद्या मतदासंघात खरोखरच मुलींच्या बाबतीत एकतर्फी प्रेमातून काही अघटित घटना घडल्या तर त्याला कोण जवाबदार राहणार? त्यामुळे आपण सार्वजनिक रित्या तरुणांना काय संदेश देत आहोत, याच भान आमदार राम कदमांनी बाळगावं अशी अपेक्षा अनेक समाजसेवी महिला व्यक्त करत आहेत.

व्हिडिओ : काय विधान केलं आमदार राम कदमांनी?

हॅशटॅग्स

BJP(447)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x