15 January 2025 3:28 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC IREDA Share Price | मल्टिबॅगर इरेडा शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली - NSE: IREDA Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: APOLLO Quant Mutual Fund | पगारदारांनो, टॅक्स वाचेल आणि पैसा 3 ते 4 पटीने वाढेल, ही म्युच्युअल फंड योजना मालामाल करेल IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, प्राईस बँड सह डिटेल्स नोट करा, कमाईची संधी सोडू नका 8th Pay Commission | 8'व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC
x

तुम्ही स्वबळाच्या तयारीला लागा, प्रत्येक बूथ प्रमुखाला २३ सूत्री कानमंत्र: अमित शाह

मुंबई : महाराष्ट्र आणि गोव्यातील भाजप पक्ष विस्तारक आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्यासाठी मुंबईमध्ये मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची प्रमुख उपस्थिती होती. दरम्यान अमित शहा यांनी कोणताही सार्वजनिक भाषण न करता पदाधिकाऱ्यांशी वन टू वन असा थेट संवाद साधला.

यावेळी अमित शहा यांनी प्रत्येक बूथ प्रमुखाला २३ सूत्री कानमंत्र दिला असून ते अंमलात आणण्याच्या सूचना पदाधिकाऱ्यांना करण्यात आल्या आहेत. त्यानुसार भाजपच्या विस्तारकांवर बूथ रचनेची विशेष जवाबदारी देण्यात आली असून त्यांना ‘एक बूथ २५ युथ’ असं ध्येय देण्यात आलं आहे. दरम्यान या २३ सूत्री कार्यक्रमामुळे भाजपने सूक्ष्म नियोजनावर भर दिल्याचे निदर्शनास येते. त्यामुळे पक्षाच्या सभा आणि रॅली यांचा फायदा मोठ्या प्रमाणावर करून पक्षाला मोठा यश प्राप्त करता येईल अशी व्यूहरचना आखण्यात येत आहे.

या वेळी अमित शहा यांनी पक्ष पदाधिकाऱ्यांच्या कामाचा सुद्धा आढावा घेतला असून त्यांना २३ सूत्री कार्यक्रमाचे मंत्र देण्यात आले आहेत. त्यानुसार त्या अंमलात आणाव्या अशा सक्त सूचना करण्यात आल्या आहेत.

१. प्रत्येक बूथ सदस्य किमान ५ कुटुंबांच्या संपर्कात असावा अशी सूचना
२. प्रत्येक बूथ सदस्याकडे मोटारबाईक असणे आवश्यक
३. प्रत्येक बूथचे व्हाट्सअँप ग्रुप असावेत
४. धार्मिक आणि राष्ट्रीय सण बूथ सदस्यांनी बूथ पातळीवर साजरे करावेत
५. मतदार यादीतील संपर्कात असलेल्या सर्व कुटुंबीयांची नोंद करून घेण्यात यावी
६. मतदारांना मतदानासाठी बाहेर काढावे
७. बूथ सदस्यांनी किमान ५१ टक्के मतदान होईल याची खात्री करून त्यासाठी मेहनत घ्यावी
८. शासकीय योजना सामान्य जनतेपर्यंत पोहोचवाव्यात व त्यांना त्याचा लाभ कसा मिळेल याची खबरदारी घ्यावी
९. भाजपचे पारंपरिक मतदार, काठावरचे मतदार तसेच भाजप विरोधी मतदार अशी वर्गवारी करावी
१०. जात, धर्म आणि भाषानिहाय मतदात्याची विभागणी करून त्याच्या समस्या समजून घ्याव्यात
११. भाजपचे कार्यकर्ते म्हणून तुमची कामं १०० टक्के होतीलच अशी अपेक्षा ठेऊ नये
१२. पक्षाने दिलेली कामं चोख पार पाडावी म्हणजे दुसऱ्या पक्षांच्या युतीची गरज भासणार नाही

हॅशटॅग्स

#Amit Shah(265)BJP(447)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x