22 January 2025 9:47 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | नोकरदारांनो बँक FD विसरा, 'या' म्युच्युअल फंड योजना 31 टक्केपर्यंत परतावा देत पैशाने पैसा वाढवतील Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, स्टॉक BUY करावा का - NSE: TATASTEEL Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप कंपनीच्या नफ्यात घट, तरीही ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: TATATECH Penny Stocks | प्राईस 88 पैसे, एका वडापावच्या किंमतीत 20 शेअर्स खरेदी करा, यापूर्वी 633% परतावा दिला - Penny Stocks 2025 Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनी शेअरने 1 महिन्यात 53% परतावा दिला, खरेदीची संधी सोडू नका - NSE: APOLLO Infosys Share Price | आयटी स्टॉक इन्फोसिसवर टॉप ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस मोठा परतावा देणार - NSE: INFY Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल कंपनीबाबत मोठी अपडेट, शेअर मालामाल करणार - NSE: JIOFIN
x

सोमय्यांकडे भाजपचे प्रतिनिधी एवढंच पद आहे | भाजपने त्यांना ईडीचे प्रवक्ते पद तरी द्यावं - आ. रोहित पवार

Kirit Somiya

मुंबई, १५ सप्टेंबर | भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांनी आघाडीतील नेत्यांना टार्गेट करून त्यांचे भ्रष्टाचार काढण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे अनेक नेत्यांच्यामागे ईडीचा ससेमिरा लागला आहे. त्यावरून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी सोमय्या यांना टोला लगावला आहे. भारतीय जनता पक्षाने किरीट सोमय्या यांना ईडीचं प्रवक्तेपद द्यावं, असा टोला राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी काढला आहे.

सोमय्यांकडे भाजपचे प्रतिनिधी एवढंच पद आहे, भाजपने त्यांना ईडीचे प्रवक्ते पद तरी द्यावं – BJP should at least give ED spokesperson post to Kirit Somaiya says NCP MLA Rohit Pawar :

आमदार रोहित पवार दोन दिवसांपासून दिल्लीत आहेत. दिल्लीत त्यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन कर्जत-जामखेडमधील विकास कामांवर चर्चा केली. त्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी यासंदर्भात संवाद साधताना अनेक प्रश्नांवर उत्तरे दिली. सोमय्यांना भारतीय जनता पक्षाने एक ऑफिशियल पोस्ट द्यावी. ईडीचे प्रवक्ते अशी काही तरी पोस्ट त्यांना द्यावी. आता त्यांच्याकडे एक प्रतिनिधी एवढंच पद आहे. त्यांना प्रवक्ते केले तर ते ईडीचे प्रतिनिधी आहेत हे ऑफिशियल होऊन जाईल. ईडींना कळायच्या आधी त्यांना बऱ्याच गोष्टी कळत असतात. त्यांच्यावर टीव्हीचा फोकसही असतो, त्यामुळे त्यांना हे पद द्यायला हरकत नाही, असा टोला पवार यांनी लगावला.

यावेळी त्यांनी ईडीच्या गैरवापरावरही टीकास्त्र सोडलं. ईडी किंवा सीबीआयचा राजकीय वापर होत असेल तर घातक आहे. नाही तर तो पायंडा पडतो. एखाद्या राजकीय नेत्याला दाबायचं असेल तर अशाच यंत्रणाचा वापर केला पाहिजे असं संबंधितांना वाटतं. लोक घाबरतात. कारण त्यात तथ्य नसलं तरी त्या प्रक्रियने त्रास होतो. कुटुंबावर परिणाम होतो. त्यातून काहीच बाहेर येत नाही. सुशांतसिंह प्रकरणात असंच केलं. बिहारच्या निवडणुकीसाठी यंत्रणांचा वापर केला आणि त्यातून बाहेर काय आलं तर आत्महत्याच असल्याचं निष्पन्न झालं. अशा गोष्टीतून राजकीय मनस्तापच होतो. ते थांबलं पाहिजे असं त्यांनी म्हटलंय.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल.

News Title: BJP should at least give ED spokesperson post to Kirit Somaiya says NCP MLA Rohit Pawar.

हॅशटॅग्स

#RohitPawar(75)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x