22 February 2025 7:00 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या Railway Confirm Ticket | रेल्वेची तिकिट कन्फर्म आणि ट्रेन सुटली, तुम्ही दुसऱ्या ट्रेनने प्रवास करू शकता का? नियम लक्षात ठेवा Credit Card EMI | क्रेडिट कार्डच्या मोठ्या बिलाचे EMI मध्ये रूपांतर कसे करावे? थकीत रक्कम भरणे सोपे होईल Numerology Horoscope | नशीब आणि आकड्यांचा खेळ, अंकज्योतिषशास्त्रानुसार 16 फेब्रुवारी तुमचा रविवारचा दिवस कसा असेल IPO GMP | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी होईल मोठी कमाई, अशी संधी सोडू नका - IPO Watch
x

VIDEO पुरावे: भाजप समर्थकांचं चिमुकल्यांच्या आडून बालिश राजकारण, संरक्षणमंत्री सुद्धा करतात ट्विट

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाचा आयटी सेल देशभर का बदनाम झाला याचा अजून त्यांना साक्षात्कार झालेला दिसत नाही. कारण, मूळ व्हिडिओमध्ये मोडतोड करणे आणि मूळ फोटोमध्ये एडिटिंग करून त्यांना समाज माध्यमांना व्हायरल करणे हा त्यांचा पूर्णवेळ उद्योग असा इतिहास आहे. मग ते व्हिडिओ स्वतःच्या नेत्यांचे असो किंवा विरोधकांचे, ते वेगळ्यापद्धतीने तरुणाईपुढे आणून त्यांचा सऱ्हास राजकारणासाठी वापर केला. आता याच भाजप समर्थकांनी लहान मुलींच्या आडून ज्यांना मुख्यमंत्री, पंतप्रधान, राजकीय पक्ष, मोदी आणि राहुल गांधी म्हणजे कोण हे सुद्धा माहित नसताना, त्याच चिमुकल्या मुलींचे ठरवून आणि सूचना देण्यात आल्या प्रमाणे व्हिडिओ बनवून ते समाज माध्यमांवर पसरविण्यात येत आहेत.

त्याचा अजून एक कळस समोर आला आहे आणि तो म्हणजे ज्या मुलीला खेळण्यातील विमान कसं बनत याची कल्पना असेल, ती चिमुकली राफेल विमान कसं बनविण्यात आलं आहे आणि आधीच्या सरकारमध्ये त्याची किंमत का कमी होती आणि आता ती किंमत का वाढली याचं अत्यंत बालिश पद्धतीने रेकॉर्डिंग करण्यात आलं आहे. याच भाजपच्या समर्थकाने त्यात ऑफसेट करार आणि अनिल अंबानी यांना कसं आणि का निवडलं हे सुद्धा त्याच मुलीकडून रेकॉर्ड करून घेतलं असतं तर कदाचित देशाला ते अधिक सोप्या पद्धतीने समजलं असतं. परंतु, ४३ सेकंदात इतक्या अरबो रुपयांचा करार समजविण्याचा बालिश प्रकार केला आहे.

धक्कादायक म्हणजे देशाच्या संरक्षण मंत्री सीतारामन ज्या याच विषयावर विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर सविस्तर आणि मुद्देसूद उत्तर देण्याऐवजी राफेल विषयावरील माहिती विचारून काँग्रेस पाकिस्तानला मदत करत असल्याचा कांगावा करत होत्या. वास्तविक त्या हे सुद्धा विसरल्या होत्या की काँग्रेसच्या काळात अशीच बोफोर्स तोफांच्या खरेदी व्यवहारातील माहिती सार्वजनिक करण्याची मागणी भाजपने सुद्धा केली होती. त्याच आणि तत्कालीन अत्याधुनिक बोफोर्स तोफांचं महत्व कारगिल युद्धात सिद्ध झालं होतं. त्यात भर म्हणजे याच ४३ सेकंदाच्या व्हिडिओला पोस्ट करून आज देशाच्या संरक्षणमंत्री राफेल सौदा समजून देण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत निया मुलीला शाबासकी देत आहेत. यावरून देशाच्या संरक्षण मंत्र्यांकडे फेसबुक आणि ट्विटरवर ऑनलाईन राहण्यासाठी प्रचंड वेळ असल्याचं सुद्धा दिसत आहे. संरक्षण मंत्री सीतारामन आणि लहान मुलीच्या आडून संबंधित व्हिडिओ बनवणाऱ्या भाजप समर्थकांचा या मागील हेतू प्रथम दर्शनी हाच आहे की, ‘लहान मुलांना जे कळतं ते राहुल गांधींना कळत नाही’.

याआधी सुद्धा असे लहान मुलींच्या आड भाजप समर्थकांनी हे प्रयत्न केले आहेत. त्यात एका व्हिडिओमध्ये मोदींनीं एका लहान मुलीला उचलून श्लोक म्हणण्यास सांगितले होते. परंतु, भाजप समर्थकाने त्याचा मूळ ऑडिओ बदलून त्यात मोदी लहान मुलीला उचलतात आणि ती चिमुकली ‘राहुल गांधी पप्पू आहेत’ असा ऑडिओ त्यात टाकून, समाज माध्यमांवर राहुल गांधी यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला होता. तसेच एका भाजप समर्थक महिलेने स्वतःच्या लहान मुलीचा राहुल गांधी यांना लाथा मारतानाचा स्क्रिप्टेड व्हिडिओ बनवला होता आणि समाज माध्यमांवर व्हायरल केला होता. आता पुन्हा हा राफेलच्या नावाने केलेला तिसरा बालिश प्रयत्न आहे. याआधी सुद्धा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांनी उचललेल्या लहान मुलाचा मूळ व्हिडिओ बदलून बालिशपणे व्हायरल करण्यात आला होता.

VIDEO: राफेलच्या किंमतीवर बनवलेला ४३ सेकंदाचा व्हिडिओ

VIDEO: एका भाजप समर्थक आईने स्वतःच्या मुलीचा राहुल गांधींना लाथा मारतानाचा स्क्रिप्टेड व्हिडिओ बनवून समाज माध्यमांवर पसरवला होता.

VIDEO: मोदींनी उचललेल्या मुलीला श्लोक म्हणण्यास सांगितले होते तो खरा व्हिडिओ

VIDEO: भाजप समर्थकांनी मूळ व्हिडिओ बदलून त्यात राहुल गांधींची प्रतिमा मलिन करण्यासाठी पसरलेला व्हिडिओ

VIDEO: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका लहान मुलाला उचलल्यावर तो लहान मुलगा काय बोलला होता त्याचा खरा व्हिडिओ

VIDEO: भाजप समर्थक आणि भाजपचे आमदार राम कदमांनी पसरवलेला खोटा व्हिडिओ

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

BJP(447)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x