22 January 2025 9:12 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | नोकरदारांनो बँक FD विसरा, 'या' म्युच्युअल फंड योजना 31 टक्केपर्यंत परतावा देत पैशाने पैसा वाढवतील
x

उत्तर प्रदेशात भाजपला केवळ १८ जागा; मोदी-शहा जोडीला झटका बसणार: सर्वे

नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला यूपीत मोठा झटका बसण्याची शक्यता. इंडिया टुडे आणि कार्वी इनसाइट्सने यांनी एकत्रित केलेल्या जनमताच्या चाचणीतून हा धक्कादायक निष्कर्ष समोर आला आहे. त्यानुसार, आज लोकसभेच्या निवडणुका झाल्या तर राजकीय दृष्टया सर्वात महत्वाच्या असलेल्या युपी’त भारतीय जनता पक्षाला आणि त्यांचा मित्र पक्षाला म्हणजे अपना दलला मिळून केवळ १८ जागा मिळतील असा निष्कर्ष बाहेर आला आहे.

२०१४ लोकसभा निवडणुकीच्या निकालाची आकडेवारी पाहता यावेळी भारतीय जनता पक्षाला तब्बल ५३ जागांवर तडाखा बसेल. आणि त्यामुळे २०१९ मध्ये केंद्रातील भाजपाची सत्तास्थापनेची स्वप्नं भंग होतील यात काहीच शंका नाही. दरम्यान, युपी’त सपा आणि बसपा ही नवी आघाडी निर्माण झाली आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाला मोठा झटका बसणार असल्याचे चित्र सर्वेतून समोर येते आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या चिंतेत प्रचंड वाढ होण्याची शक्यता आहे.

त्यामुळे २०१४ लोकसभा निवडणुकीत युपी’त भाजपला मिळालेलं प्रचंड मोठं यश आगामी लोकसभा निवडणुकीत टिकण्याची शक्यता दिसत नाही.त्यावेळी निकालाअंती भाजपला एकूण ८० जागांपैकी तब्बल ७१ जागांवर निर्विवाद विजय प्राप्त केला होता. त्यावेळी अपना दल व भाजपने लोकसभेच्या एकत्रितपणे ७३ जागा जिंकल्या होत्या. दिल्लीतील सत्तेची चावी हातात हवी असेल तर यूपीतील लोकसभेच्या जास्तीत जास्त जागा जिंकणे महत्वाचे असते. परंतु इंडिया टुडे आणि कार्वी इनसाइट्सच्या सर्वेचा अंदाज म्हणजे भाजप तसेच मोदी-शहा जोडीची झोप उडवणारा आहे.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x
close ad x
Marathi Matrimony