15 January 2025 5:33 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांनो महिना 2000 रुपयांची गुंतवणूक करा, मिळाले 4 कोटी रुपये परतावा Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या NPS Calculator | तुमच्या पत्नीमुळे महिन्याला 44,793 रुपये पेन्शन मिळेल आणि 1 कोटी 12 लाख रुपये परतावा देईल ही योजना IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, मिळेल 45 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL RattanIndia Power Share Price | 12 रुपयाचा शेअर खरेदीला गर्दी, तुफान तेजी, यापूर्वी 502% परतावा दिला - NSE: RTNPOWER Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांना सुद्धा श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, डिटेल्स सेव्ह करून ठेवा
x

२०१९ च्या निवडणुकीत भाजपच्या जागा घटणार : रामदास आठवले

पिंपरी-चिंचवड : गुजरात आणि राज्यस्थानमधील निकालांचा हवाला देत आगामी निवडणुकीत भाजपच्या जागा कमी होतील अस भाकीत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे. भाजपच्या एकूण जागांचा आकडा घसरून २५० पर्यंत येईल परंतु पुन्हा भाजपच सत्तेत येईल अस ही ते म्हणाले.

रामदास आठवले पिंपरी चिंचवड दौऱ्यावर आले असता त्यांनी एक पत्रकार परिषद आयोजित केली असता त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

राज्यात नुकताच भीमा-कोरेगाव मधील घटनेतून प्रचंड जातीय तणाव निर्माण झाला होता. त्या संदर्भात प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, आम्ही सत्तेत असलो तरी गृहखातं माझ्याकडे नाही. मात्र या घटनेतील दोषींवर कारवाई सरकारची भूमिका आहे. भीमा-कोरेगाव मधील घटनेत दगडफेक करणाऱ्यांना सरकारने अटक केलं आहे.

पुढे शिवसेनेच्या स्वतंत्र निवडणूक लढविण्याच्या प्रश्नांना उत्तरं देताना आठवले म्हणाले की, “शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आज एक बोलतात आणि उद्या दुसरंच बोलतात. त्यामुळे आज जरी ते स्वतंत्र निवडणुका लढवू असं म्हणत असले तरी उद्या ते निर्णय बदलतील असा टोलाही त्यांनी उध्दव ठाकरे यांना लगावला.

हॅशटॅग्स

#Ramdas Athawale(45)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x