5 November 2024 10:02 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BEL Share Price | डिफेन्स कंपनीबाबत फायद्याची अपडेट, मल्टिबॅगर शेअर फोकसमध्ये, तुफान तेजीचे संकेत - NSE: BEL Penny Stocks | चिल्लर प्राईस पेनी शेअर श्रीमंत करणार, 30 दिवसात 103% परतावा दिला, स्टॉक खरेदीला गर्दी - Penny Stocks 2024 HUDCO Share Price | रॉकेट स्पीडने कमाई होणार, HUDCO शेअर फोकसमध्ये, मिळेल 65% परतावा - NSE: HUDCO RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, पुन्हा तेजीचे संकेत - NSE: RVNL SJVN Share Price | SJVN शेअर रॉकेट होणार, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SJVN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम- NSE: RELIANCE Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 3 मेटल शेअर्स 40% पर्यंत परतावा देणार, टार्गेट प्राईस नोट करा - TATASTEEL
x

मनोहर पर्रिकरांच्या निधनानंतर गोव्यात जोरदार राजकीय हालचाली

BJP, Congress, Goa, Manohar Parrikar

पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर गोव्यातील राजकीय घडामोडींनाही वेग आला आहे. मनोहर पर्रिकर यांचे रविवारी संध्याकाळी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर गोव्यात राजकीय संकट निर्माण झाले आहे. एकीकडे काँग्रेसने सत्तास्थापनेसाठी दावा करण्याची तयारी सुरु केली असतानाच भाजपानेही मुख्यमंत्रीपदासाठी हालचाली सुरु केल्या आहेत.

कॉंग्रेस नेते गिरीश चोडणकर व चंद्रकांत कवळेकर यांनी दुसऱ्यांदा गोवा राज्यपालांना निवेदन देऊन सत्ता स्थापन करण्याचा दावा केला आहे. आमदार मायकेल लोबो, गोवा उपसभापती, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे सुदिन ढवळीकरांना मुख्यमंत्रीपद हवे आहे. ते म्हणतात की भारतीय जनता पक्षाला पाठींबा देऊन त्यांनी अनेकदा या पदाचा त्याग केला, परंतु यावेळी ऐकणार नाही. तर दुसरीकडे २०१७ नंतर पुन्हा केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरींच्या यांच्या उपस्थितीत रात्रभर मित्र पक्षांशी बैठक पार पडली. मात्र या बैठकीत मुख्यमंत्रीपदाबाबत तोडगा निघू शकलेला नाही. त्यामुळे आता आज याबाबत पुन्हा एकदा बैठक होणार असल्याचे सूत्रांनी माहिती दिली आहे.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)#Nitin Gadkari(84)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x